श्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या

* सोमा घोष

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली. या सोहळ्याला कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज, इतिहासकार जयसिंगराव पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, सोनी मराठीचे बिझनेस हेड श्री. अजय भाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर, आनंद काळे हे उपस्थित होते. मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून १५  नोव्हेंबरपासून , सोम.-शनि. संध्या.  ७:३०  प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

करारी नजर, स्पष्ट शब्दोच्चार, पहाडी आवाज आणि शिवकुळातले जाज्वल्य तेज यांमुळे स्वरदाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा लाभते आहे. स्वरदाच्या आजवरच्या अभिनय प्रवासातले हे एक वेगळे आव्हानात्मक रूप आहे.             डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य आत्मविश्वास, स्वराज्याप्रती अढळ निष्ठा, स्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्‍या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडणार आहे.

जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे स्वराज्याबद्दलची जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे ताराराणींचे शब्द आणि युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे; हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. ‘मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी खेळतात, त्याच हाताने गर्दनही मारू शकतात!’ ह्या उद्गारातून महाराणी ताराराणींची लढवय्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली आहे.

१५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे, म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे! पहायला विसरू  नका स्वराज्य सौदामिनी ताराराणी , सोम.-शनि.संध्या. ७:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

प्रमुख उपस्थिती

डॉ. अमोल कोल्हे – (मालिकेचे निर्माते)

श्री. अजय भाळवणकर – (बिझनेस हेड, सोनी मराठी)

उपस्थित कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा

स्वरदा थिगळे – स्वराज्य सौदामिनी ताराराणी

यतीन कार्येकर- औरंगजेब

संग्राम समेळ- छत्रपती राजाराम राजे

संताजी घोरपडे – अमित देशमुख

धनाजी जाधव – रोहित देशमुख

हंबीरराव मोहिते – आनंद काळे

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी देणार इतिहासातील बलाढ्य शत्रूला टक्कर

* प्रतिनिधी

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली.

मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी. एक वाघ तर दुसरा सिंह. चारही दिशांना विखुरलेले अवघे मराठी लष्कर या दोन सेनानींच्या नेतृत्वाखाली आणि ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात एकवटले आणि मराठी साम्राज्यात देदीप्यमान इतिहास घडला.

संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती की, मोगली घोडे मराठी मुलखाचे पाणी प्यायला बिचकू लागले. तुम्हांला पाण्यात काय संताजी-धनाजी दिसतात का….असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले.

स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांच्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या तालमी सुरू आहेत. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी हे

दोन्ही कलाकार अतिशय कसून मेहनत घेत आहेत.

मराठ्यांना धुळीस मिळवायचे, भगवा ध्वज कायमचा उखडून फेकायचा, या ईर्षेने आपल्या अफाट सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या सर्वसत्ताधीश औरंगजेबाला ताराराणींनी आपल्या पराक्रमाने दख्खनच्या मातीत गाडला. त्याची कबर औरंगाबादेत, मुलखातच खोदली गेली.

ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मालिकेत औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. व्यक्तिरेखेचा प्रचंड अभ्यास करणारा यतीन कार्येकरांसारखा सामर्थ्यशाली अभिनेता या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रोमोमधला औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावा, असा अभिनय त्यांनी केला आहे.

इतिहासातला सर्वांत क्रूर, संशयी, जुलमी, कपटी बादशाह असलेल्या औरंगजेबाची भूमिका शब्दश: जिवंत झाल्याचा भास त्यांच्याकडे पाहून होतो. त्यांचा हा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. १५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे, म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे!

स्वरदा ठिगळे साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’!

* सोमा घोष

सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा टिझर गेले काही आठवडे चर्चेचा विषय ठरला असून या मालिकेतली मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यासंदर्भात सोशल मिडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.

‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अश्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समधून, ज्यात अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्या, स्वरदा ठिगळे ह्या अभिनयसंपन्न अभिनेत्रीची निवड ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी करण्यात आली.

मराठी मनोरंजनक्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारी स्वरदा, अभिनयाबरोबरच घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण असून या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा कसून सरावाला सुरुवात केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या अपरिचित जाज्वल्य इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून हा इतिहास सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें