अशा बना कुशल आणि यशस्वी

* पुष्पा भाटिया

एकाच वेळेला सगळी कामे करण्याच्या नादात आपण नैराश्याने ग्रस्त होऊ नये यासाठी या गोष्टींचा जीवनात अवश्य जरूर अवलंब करा :

प्रतिक्रिया द्यावी : जे काही आपल्या अवती-भोवती घडतंय, त्यासंबंधी आपली प्रतिक्रिया अवश्य व्यक्त करावी. सगळे काही गुपचूप रोबोटप्रमाणे स्वीकारू नये. बदलाच्या प्रक्रियेमुळे उत्पन्न आपल्या भावनांचा स्वीकार करावा. लक्षात ठेवा, आपल्या भावनांना तुमच्याहून चांगले अन्य कोणी समजू शकणार नाही.

क्षमतेहून अधिक काम करू नका : घर असो की ऑफिस चांगले बनण्याच्या फंदात पडू नका. लक्षात ठेवा जर आपण आपल्या क्षमतेहून अधिक काम केले तर आपल्याला कुठले मेडल तर मिळणार नाहीच. परंतु लोकांच्या अपेक्षा मात्र वाढतील. शिवाय होणाऱ्या चुकांचा परिणामही भोगावा लागेल. आजचा काळ टीम वर्कचा आहे.

पॉझिटिव विचार : चुकांना तुम्ही जबाबदार आहात ही भावना मनातून काढून टाका. अशाचप्रकारे ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट हातातून निघून गेला असेल तर, ‘‘हे काम मी करूच शकत नाही.’’ किंवा ‘‘मी या कामासाठी योग्यच नाही.’’ असे नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका.

निर्भय बना : अनेकदा आई-वडिलांकडून मिळालेल्या वर्तनाची मुळे एवढया खोलवर रुजलेली असतात की प्रौढ झाल्यावरही त्यांच्यापासून मुक्ती मिळणे अवघड होऊन जाते. काही महिला असमाधानी नात्यांना जीवनभर टिकवून ठेवतात कारण की त्यांना भीती वाटत असत की नाती तोडली तर समाजात त्यांची बदनामी होईल. परंतु सत्य तर हे आहे की आजच्या यंत्र युगात कुणालाही एवढी फुरसत नाही की जो दुसऱ्यांविषयी विचार करेल. सगळे आपापल्या जगात व्यस्त आहेत.

निसर्गाशी नाते जोडा : सकाळी सूर्योदयापूर्वी उठा आणि फिरायला जा. फिरण्यासाठी असे ठिकाण निवडा, जेथे हिरवळ असेल, नदी, तलाव, धबधबा, समुद्र व बगीचा असेल. अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरल्यामुळे मेंदूला ताण-तणावापासून दिलासा मिळतो.

उपाय शोधा : समस्या कशीही असो, ती सहजतेने हाताळा. घाईगडबडीने समस्या अजून वाढते. धैर्याने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा. त्या पैलूंचा विचार करावा, ज्यामुळे आपल्या समस्येवर उपाय मिळू शकेल.

दिनक्रम बदलावा : प्रत्येक दिवशी एकच एक काम केल्याने आपण थकला आहात, ऑफिसमध्येही कंटाळा अनुभवताहेत, तर मग काही दिवस बाहेर फिरून यावे किंवा परिवाराबरोबर पिकनिकला जावे. स्पा घ्या, पार्लरला जाऊन.

चांगल्या श्रोता बना : जर आपण दुसऱ्यांच्या बोलण्याशी सहमत नसाल तरीही निर्णय न घेता दुसऱ्यांचे बोलणे ऐका. तो काय म्हणतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याला हे वाटायला हवे की तुम्ही त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत आहात.

जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहावे : आरोग्यासंबंधी कुठल्याही समस्येला दुर्लक्ष्य करू नका. आपले रुटीन चेकअप करत राहिल्यास आपण बऱ्याच समस्यांपासून वाचू शकाल.

शेवटी सर्व कामे केली जावू शकतात, परंतु सर्व कामे एकाच वेळेला केली जाऊ शकत नाहीत. स्त्री कुटुंबाची केंद्रही आहे आणि परिघही. तिला आई, पत्नी आणि वर्किंग वुमन बनण्याची गरज आहे, सुपर वुमन बनण्याची नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें