केसांची नैसर्गिक काळजी

* पारुल भटनागर

सुंदर केस सौंदर्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्यासोबतच नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्याची गरज असते. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शाम्पूमध्ये कोणते घटक असावेत, जे तुमच्या केसांच्या आरोग्याची काळजी घेतील.

आवळा केसांना करतो मजबूत

आवळा क जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पाचन तंत्र आणि यकृताचे आरोग्य सुधारते सोबतच केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठीही ते खूप महत्वाचे मानले जाते, कारण आवळयामध्ये असलेले फॅटी अॅसिड केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते आणि केसांना मुलायम, चमकदार बनवते. याशिवाय त्यातील लोह आणि कॅरोटीनचे प्रमाण केसांच्या वाढीसाठी उपयुक्त मानले जाते, ज्यामुळे केस मजबूत होतात.

शिककाई देते पोषण

शिककाईचा वापर केसांच्या काळजीसाठी वर्षानुवर्षे केला जात आहे, तो त्यात असलेली जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, अँटीफंगल, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या पदार्थ गुणधर्मांमुळेच होत आहे. ते संक्रमण बरे करण्यास, कोंडा दूर करण्यास, केसांच्या मुळांना पोषण देण्यास आणि केसांना मऊ, चमकदार बनविण्यास मदत करते. याशिवाय केसही मजबूत होतात.

हिरवे सफरचंद थांबवते केस गळती

हिरव्या सफरचंदात जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असल्यामुळे ते केसांची मुळे मजबूत करते आणि केस गळणे थांबवते. केसांना योग्य पोषण मिळाल्यास केस घनदाट, लांब आणि चमकदार बनतात. यातील उच्च फायबरमुळे ते केसांची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे केसांचा हरवलेला रंग हळूहळू परत येऊ लागतो.

गव्हातील प्रथिने देतात ओलावा

शाम्पूमधील गव्हातील प्रोटीन घटक केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे केस अधिक चमकदार दिसतात आणि त्यांना व्हॉल्यूम मिळतो. जर तुमचे केस निस्तेज, निर्जीव झाले असतील आणि जास्त हेअर स्टाइलिंग प्रोडक्ट्स वापरल्यामुळे त्यांचा नैसर्गिक मुलायमपणा हरवला असेल तर तुम्ही गव्हाच्या प्रथिनयुक्त शाम्पूचा वापर करा, कारण केस मऊ बनवण्यासोबतच ते केसांचा कुरळेपणा टाळण्याचेही काम करतो. सुंदर केसांसाठी, तुम्ही रोजा हर्बल शाम्पू निवडू शकता, ज्यामध्ये हे घटक आहेत.

हर्बल शाम्पू बनवतात केस मजबूत

शाम्पूबद्दल बोलायचे झाल्यास, रोजा हर्बल केअर शाम्पूचे नाव घ्यावेच लागेल. हर्बल शाम्पू शुद्ध आणि सेंद्रिय घटकांपासून बनवलेला असल्यामुळे तो केसांचे कोणतेही नुकसान करत नाही. तो त्वचेसाठीही अनुकूल असतो. हर्बल शाम्पू नैसर्गिक तेले, खनिजे आणि हर्बल अर्क घटकांपासून बनलेले असल्याने केसांची मुळे निरोगी होतात आणि केसांची वाढ होऊ लागते. यामुळे, टाळूतील नैसर्गिक तेल आणि पीएच पातळी संतुलित राहाते, ज्यामुळे केस सुंदर, निरोगी आणि मजबूत होतात. म्हणूनच हर्बल शॅम्पूने तुमच्या केसांची खास काळजी घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें