सावत्र नाते निरूपयोगी नसतात

* दीपा पांडे

मनोजच्या मनातला राग दिवसेंदिवस वाढत चालला होता. गेली १० वर्षे त्याने आजोळी घालवले होते. इथे आल्यावर आपल्या वडिलांना सावत्र आईवर प्रेमाचा वर्षाव करताना आणि २ लहान सावत्र भावांचे लाड करतांना पाहणे त्याच्यासाठी खूप कठीण होते. तो १६ वर्षांचा किशोर आहे. मागील काही दिवसांत नानीचे निधन झाल्यानंतर तो बऱ्याच वर्षांनंतर आपल्या घरी परतला आहे.

पण घरात दुसऱ्या स्त्रीचा आणि तिच्या मुलांचा हक्क त्याला सहन होत नव्हता. त्याच्या मामाच्या गावी प्रत्येकजण त्याला सावत्र आईपासून सावध राहावे लागेल असे बजावत असे. बिचारे माताहीन मूल. सावत्र आई ती सावत्रच राहील. या गोष्टींनी त्यांच्या मनात घर केले. परिणामी तो सावत्र आईच्या प्रत्येक गोष्टीचा उलट विचार करत असे, धाकट्या भावांना कारण नसतांना मारहाण व्हायची.

एके दिवशी त्याच्या वडिलांनी याबद्दल त्याला फटकारले असता त्याने वडिलांच्या पलंगावर रॉकेल शिंपडून पेटवून दिले. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु सर्वजण अवाक् झाले.

४० वर्षीय अविवाहित अलकाने ज्या विधुराशी लग्न केले त्याची पत्नी कर्करोगाने ग्रस्त होऊन ४ मुलांना सोडून देवाघरी गेली. घरात १०, १२ आणि १४ वर्षांच्या मुली व ५ वर्षांच्या मुलाव्यतिरिक्त वृद्ध आई-वडीलही होते.

अलकाकडून सगळयांना खूप अपेक्षा होत्या. पण २ मोठया मुली त्यांच्या सावत्र आईच्या प्रत्येक कामात व्यर्थ टीका टिपण्णी करत असत.

लहान मुलगा तिच्या मांडीत येऊन लपण्याचा क्षण वगळता अलकाला आपण लग्नाला होकार का दिला हे समजत नव्हते.

पूर्वग्रह ठेवू नका

सावत्र आईवर लिहिलेल्या कथांमधली सिंड्रेला किंवा राखीसारखी पात्रे अनेकदा आपल्या बालमनामध्ये अचेतनपणे विद्यमान असतात. काही नातेवाईक किंवा शेजारी त्याला आपले सल्ले देऊन जणू आगीत तेल टाकण्याचे काम करतात.

नवीन नातेसंबंधांचे महत्त्व समजून घ्या

तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचे महत्त्व समजून घ्या. या नवीन नातेसंबंधाच्या फायद्यांकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ, नवीन आई आल्याने घराची चोख व्यवस्था, घरातील लहान मुलाचे योग्य संगोपन, घरातील वृद्धांच्या तब्येतीची काळजी घेणे यासारख्या गोष्टी अगदी सहजपणे घडू लागतात. घराची आर्थिक व्यवस्था, सुरक्षा या बाबी दुर्लक्षित करता येणार नाहीत.

ज्येष्ठांचा दृष्टीकोन समजून घ्या

स्वत:ला वडिलांच्या जागी ठेवा आणि त्यांच्यासाठी हे नाते किती महत्त्वाचे आहे याचा विचार करा. उद्या तुम्हीसुद्धा तुमच्या ध्येयापोटी घरापासून दूर जाल किंवा मग याच घरात तुमच्या गृहस्थीत रमून जाल. त्यावेळी आजचा निर्णय योग्य वाटेल.

भावनिक होऊ नका

घरातील तुमच्या आईची वस्तू दुसरी स्त्री वापरताना पाहून किंवा वडिलांना नवीन नातेसंबंध जोडताना पाहून भावूक होऊ नका. असा विचार करा की घरातील नवीन सदस्य त्याचे जुने घर सोडून आणि तुमच्यातील सर्वांची उपस्थिती स्वीकारून स्वत:ला साचेबद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे, मग त्याला देखील कंफर्ट होण्याची संधी द्या.

वर्तमान स्वीकारा

जे समोर आहे तेच सत्य आहे. पालकही त्यांच्या नवीन नात्याला महत्त्व देतील, भूतकाळाला कोण पकडू शकला आहे.

पूर्वी संयुक्त कुटुंबात मोठया संख्येने सदस्य असल्यामुळे विधवा, विधुर किंवा आजीवन कुंवाऱ्या व्यक्ती यांच्या सुखसोयींमध्ये कोणतीही घट होत नव्हती. ते आपले जीवन आरामात जगत असत. त्यांना आर्थिक, सामाजिक किंवा वेळेवर जेवण, आजारपणात सेवेचा लाभ अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळायच्या.

आता जेव्हा विभक्त कुटुंबांमुळे तुमची अपूर्ण गृहस्थी सांभाळणे कठीण होते तेंव्हा व्यक्ती पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेते. अशा वेळी मुलांनीही नातेसंबंधांचे महत्त्व समजून ते मनापासून स्वीकारावे अशी अपेक्षा केली जाते.

दूरवर बसलेले नातेवाईक आपली घरगृहस्थी सोडून कायमचे येऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत मुलांनीही सत्याचा स्वीकार करून आपले भविष्य सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें