रेजिना कॅसांड्रा हिने समाजसेवेचं काम घेतलं हाती !

* सोमा घोष

अभिनेत्री रेजिना कॅसांड्रा तिच्या कलात्मक अभिनयासाठी प्रसिद्ध आहेच तिच्या परफॉर्मन्ससाठी तिच्यावर अनेक बातम्यादेखील झाल्या. IMDB मधे जानबाज हिंदुस्तान के, फर्झी, रॉकेट बॉइज 2 अश्या अनेक अफलातून कामासाठी तिची ख्याती आहे. ही अभिनेत्री आता फिलांथरोपिस्ट या नव्या क्षेत्राकडे वळली असून तिने सहसंस्थापक डेमॉक्रॅटिक संघाचं सहसंस्थापक पद स्वीकारून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी ती आता काम करणार आहे.

तेलंगणातील चकलीगुडा गावात महिलांचं प्रजनन आरोग्य आणि मासिक पाळी या संबंधित विषयांवर सत्र नुकतंच पार पडलं. तळागाळात ग्रामीण महिलांचं नेतृत्व प्रस्थापित व्हावं हा याचा उद्देश आहे. गावात बदल करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी हा खास कार्यक्रम नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 12 महत्त्वाच्या विषयावर आधारित हा कार्यक्रम असून ग्रामीण महिलांना 12 महिन्यांसाठी खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

IMDB च्या भारतीय प्रसिद्ध अभिनेत्री चौथ्या क्रमांकावर या अभिनेत्रीच नाव येतं ! फ्लॅशबॅक हा चित्रपट तिच्या कीटीमध्ये असून तिच्या लूक आणि ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेक्षकसुद्धा तिच्या या कामासाठी उत्सुक आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें