मदर्स डे स्पेशल : ९ ब्युटी गिफ्ट्स मदर्स डे बनवा संस्मरणीय

* भारती तनेजा, ब्यूटी एक्स्पर्ट

आपला उजळलेला चेहरा आणि इतरांनी केलेले सौंदर्याचे कौतुक आवडणार नाही, अशी महिला असूच शकत नाही. नोकरदार महिला असो किंवा गृहिणी, आपण चांगले दिसावे यासाठी सर्वच सजग असतात.

म्हणूनच या मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईचे सौंदर्य परत मिळवून देण्यासाठी या ब्युटी गिफ्ट्स देऊन तिला खुश करू शकता :

क्ले मास्क / कोलोजन मास्क : सध्या क्ले मास्क खूपच फेमस आहे. हा तुमच्या आईच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेऊन घाण आणि मृत त्वचा काढून टाकेल. सोबतच ते रक्तप्रवाह वाढवून त्वचेला कोमल बनवेल. कोलोजन मास्क त्वचेचा सैलसरपणा दूर करतो. शिवाय वाढत्या वयाच्या खुणा दिसण्यापासून त्वचेचे रक्षण करते. तुमची आई हा मास्क कुठल्याही चांगल्या कॉस्मॅटिक क्लिनिकमध्ये जाऊन लावू शकते. या मास्कचा वापर लेझरसोबत केल्यास परिणाम जास्त चांगला होतो. लेझरमुळे मृत त्वचेला नवसंजीवनी मिळते. सोबतच मास्कमध्ये ९५ टक्के कोलोजन असल्यामुळे त्वचेला पोषक द्र्व्ये मिळतात. डोळयांभोवतालची काळी वर्तुळे आणि सुरकुत्या घालवण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठला चांगला उपाय असूच शकत नाही.

सीरम प्रोटेक्शन : दररोज सकाळी फेस क्लीन आणि लाइट स्क्रब केल्यानंतर वापरण्यासाठी आईला कोलोजन सीरम द्या. सीरम असल्याने ते फारच कमी प्रमाणात लागते. याचा नियमित वापर केल्याने ते त्वचेचे झालेले नुकसान भरुन काढून तिचे संरक्षण करेल, त्वचेला हायडेट करेल. सोबतच चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर करेल.

व्हॅल्युमायजिंग मस्करा / लेंथनिंग मस्करा : खोल गेलेल्या आणि थकलेल्या डोळयांच्या पापण्यांवर मस्करा लावता येईल. यामुळे डोळे लगेचच सुंदर दिसू लागतील. वाढत्या वयासोबतच मस्कराचा पॅटर्नही बदलायला हवा. गरजेनुसार व्हॅल्युमायजिंग मस्करा वापरण्याऐवजी लैंथनिंग मस्करा वापरावा.

एएचए म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड क्रीम : नेहमी रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करणे गरजेचे आहे, जेणेकरुन त्वचेवरील मेकअप किंवा धूळमाती चांगल्या प्रकारे निघून जाईल. चेहरा स्वच्छ केल्यानंतर एएचए क्रीमने चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे सुरकुत्या पडणार नाहीत. हे क्रीम डोळयांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठीही उपयोगी आहे. याच्या वापरामुळे एक्सफॉलिएशन आणि नवीन सेल्स तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते. यामुळे त्वचा उजळलेली दिसू लागते.

फेशियल किट : वाढत्या वयामुळे त्वचा सैल पडू लागते. त्वचेवरील चमक कमी होते. अशावेळी ठराविक अंतराने फेशियल करत राहिल्यास चेहऱ्यावरील मसल टोन सुधारून सुरकुत्यांपासून दूर राहण्यास मदत होते.

कलर करेक्शन क्रीम : रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, तासन्तास कॅम्प्युटरवर काम करणे आणि उन्हात फिरल्यामुळे डोळयांभोवती काळी वर्तुळे, एक्नेसारख्या समस्यांचा सामना करायला लागणे स्वाभाविक आहे. अशावेळी तुम्ही ही समस्या फाऊंडेशनऐवजी कलर करेक्शन क्रीम म्हणजे सीसी क्रीमच्या मदतीने लपवू शकता. कारण फाऊंडेशनमुळे चेहऱ्यावरील या खुणा पूर्णपणे लपू शकत नाहीत, पण सीसी क्रीम त्यांना पूर्णपणे लपवून चेहऱ्याला चांगला लुक देते.

मिरॅकल ऑइल : रोज केलेली वेगवेगळी स्टाईल आणि केमिकलच्या वापरामुळे वयानुसारच सर्वांचेच केस रुक्ष होतात. अशा केसांमुळे सौंदर्यात बाधा येते. अशावेळी केसांची चमक पुन्हा मिळविण्यासाठी तुम्ही या मिरॅकल ऑइलसारखे ऑर्गन ऑइल किंवा मॅकाडामिया ऑइल गिफ्ट म्हणून आईला देऊ शकता. हे तेल केसांना मुळांपासून पोषण देते, सोबतच त्यांना मजबूत करते, चमक मिळवून देते. हे सहजतेने पसरते. त्यामुळे त्याचे काही थेंब बोटांवर घासून नंतर संपूर्ण केसांवर फणी फिरवतो त्याप्रमाणे बोटांनी लावा. यामुळे चांगला परिणाम मिळतो.

ट्रिपल आर किंवा फोटो फेशियल : जर आईने ट्रिपल आर किंवा फोटो फेशियल केले तर ते जास्त चांगले होईल. ट्रिपल आर हे त्वचेची चमक पुन्हा मिळवून देत तिला टवटवीत ठेवते. वय जास्त झाल्याने आईची त्वचा सैल झाली असेल किंवा त्वचेतील लवचिकता कमी असेल तर ही ट्रीटमेंट खूपच उपयुक्त ठरेल. फोटो फेशियलमुळे वाढत्या वयाच्या खुणा जसे की, फाइन लाईन्स, सुरकुत्या कमी होतात. त्वचेचा सैलसरपणा कमी होऊन ती घट्ट होते. या फेशियलमध्ये असलेल्या प्रोडक्ट्समुळे त्वचेत कोलोजन तयार होण्याची प्रक्रिया वाढते, जी त्वचेला सुरकुत्यांपासून दूर ठेवते. याशिवाय यामुळे एक्सफॉलिएशन आणि नवीन सेल्स बनण्याची प्रक्रिया वेगाने होते, ज्यामुळे त्वचा उजळलेली दिसू लागते.

या ट्रीटमेंटमध्ये मायक्रो मसाजर किंवा अपलिफ्टिंग मशीनने चेहऱ्याला लिफ्ट केले जाते, ज्यामुळे सैलसर पडलेली त्वचाही अपलिफ्ट होते आणि घट्ट झाल्यामुळे सुंदर दिसू लागते.

सर्वात शेवटी या ट्रीटमेंटमध्ये एक विशिष्ट प्रकारचे मास्क लावण्यात येते, ज्याला यंग स्किन मास्क असे म्हणतात. या मास्कच्या आत ९५ टक्के कोलोजन असते. हा मास्क लावल्यामुळे त्वचेला आवश्यक पौष्टिक द्र्रव्ये मिळतात.

ग्लाईकोलिक पिल आणि डर्माब्रेशन टेक्निक : जर तुमच्या आईच्या चेहऱ्यावर पिग्मेंटेशन असेल तर तिला एखाद्या चांगल्या पार्लरमध्ये नेऊन तुम्ही तिला ग्लाईकोलिक पिल आणि डर्माब्रेशन टेक्निकच्या मदतीने पिग्मेंटेशनवरील उपचाराचे चांगले गिफ्ट देऊ शकता. बऱ्याच सिटिंग्स केल्यानंतर ही ट्रीटमेंट पूर्ण होते.

बायोडर्माचं अँटी एक्ने सेबियम फेस वॉश

* पारुल भटनागर

समस्यामुक्त त्वचा ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण असं असलं तरी कधी तेलकट त्वचा तर कधी त्वचेवर मुरुमं येण्याची समस्या उद्भवते, जे चेहऱ्याचे सौंदर्य आणि तजेलपणा नाहीसे करण्याचे काम तर करतातच शिवाय त्यांच्यामुळे त्वचेवर खूप जळजळ आणि खाज सुटते. अगदी इतके की कधीकधी ती सहन करणेदेखील कठीण होते. ही समस्या तशी तर कोणत्याही ऋतूत उद्भवू शकते, परंतु उन्हाळयात तेलकट त्वचा आणि त्यावर मुरुमांची समस्या अधिक दिसून येते, कारण उन्हाळयात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी सेबेशियस ग्रंथी अधिक सेबम तयार करू लागतात, ज्यामुळे मुरुमं होतात. अशा परिस्थितीत तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेची कारणे कोणती?

आज तेलकट त्वचेची समस्या सामान्य झाली आहे. तेलकट त्वचेमध्ये लिपिड पातळी, पाणी आणि चरबीचे प्रमाण खूप जास्त असते आणि जेव्हा सेबेशियस ग्रंथी आवश्यकतेपेक्षा जास्त सेबम तयार करू लागतात तेव्हा मुरुमं, ब्रेकआउट्स, व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्सच्या समस्या उद्भवतात आणि ब्रेकआउट्समुळे सेबम त्वचेच्या मृत पेशींसह छिद्रे अवरोधित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करते, ज्यामुळे त्वचेची स्थिती आणखी बिघडते. दुसरीकडे कॉम्बिनेशन त्वचेत कपाळ, नाक आणि हनुवटी यांसारख्या टी-झोनमधील तेल ग्रंथी अतिक्रियाशील होतात, तर उर्वरित चेहरा सामान्य आणि कोरडा असतो. त्यामुळे अशा त्वचेचे संतुलन न राहिल्याने अशा त्वचेला इजा होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्याची विशेष गरज आहे.

  • तेलकट त्वचा असण्याचे एक कारण अनुवांशिकदेखील आहे, ज्यामुळे सेबेशियस ग्रंथी नेहमी जास्त सक्रिय होऊन जास्त सेबम तयार करतात, ज्यामुळे मुरुमं होतात.
  • हायपरकेराटिनायझेशन आणि बॅक्टेरियाचा प्रसार, तारुण्यादरम्यान सुरू झालेल्या हार्मोनल क्रियाकलापांचा परिणाम म्हणून सेबमचे जास्त उत्पादन करते, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट आणि चमकदार दिसू लागते, तसेच निरोगी सेबमपेक्षा तिची रचना वेगळीदेखील असते, ज्यामुळे ती अधिक जाड असल्याने तिला कूपातून बाहेर येण्यास अडचण होते. यामुळे कॉमेडम होण्याचा धोका वाढतो.
  • हायपरकेराटीनायझेशनमध्ये त्वचेच्या पेशींची झपाटयाने होणारी वाढ छिद्रे अडकवून सेबमला बाहेर पडण्यास प्रतिबंध करते, जे कॉमेडोमचे कारण बनते, ज्यामुळे त्याच्या सभोवतालची त्वचा पिगमेंट नजर येऊ लागते.
  • मुरुमांच्या जीवाणूंच्या वाढीसाठी सेबम पोषक म्हणून कार्य करते, ज्यामुळे कॉमेडोम लाल मुरुमांमध्ये बदलतो आणि जळजळ व वेदना होतात.
  • काहीवेळा मोठी छिद्रे, ज्यांचे कारण वय आणि जुने ब्रेकआउट असतात, ज्यामुळे त्यात जास्त तेल तयार होऊ लागते. अशा स्थितीत छिद्रे आकुंचन पावणे शक्य नसले तरी त्वचेची विशेष काळजी घेऊन त्यावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवता येते.
  • अनेकवेळा आपण इतरांचे बघून किंवा मग विचार न करता आपल्या त्वचेवर चुकीचे स्किन केयर प्रोडक्ट्स वापरतो, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट होते, ज्यामुळे मुरुमांसह त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत जेव्हा पण तुम्ही पुरळ आणि कॉम्बिनेशन स्किनचे स्किन केअर उत्पादने वापरता तेव्हा तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अशी त्वचा असलेल्यांसाठी लाइटवेट मॉइश्चरायझर आणि जेल आधारित क्लिन्झर वापरणे अधिक योग्य आहे.

काय आवश्यक आहे

सूर्य टाळा : खरं तर सूर्याची हानिकारक किरणं त्वचा कोरडी करतात. अगदी तेलकट त्वचेलाही मॉइश्चरायझरची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत सेबेशियस ग्रंथी अधिक सक्रिय होते, ज्यामुळे अधिक सेबम तयार होते आणि त्वचेवर डाग पडतात. इतकेच नाही तर त्वचेच्या कोरडेपणामुळे हे त्वचेच्या मृत पेशी नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यापासून रोखण्याचे काम करते, ज्यामुळे सेबम छिद्र्रांमधून बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे शक्यतो कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाणे टाळा आणि जर बाहेर गेलातच तर शरीर झाकून ठेवा.

 नियमित ट्रीटमेंट फॉलो करा : कोणत्याही उपचाराचा त्वचेवर तात्काळ परिणाम होत नाही, तर नियमित उपचारांसोबतच त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे जसे की दिवसा आणि रात्री स्वच्छतेचे नियम पाळण्याबरोबरच औषधोपचार घेणे. असे केल्याने तुम्हाला ५-६ आठवडयांत परिणाम दिसू लागतील.

मुरुमांना हात लावू नका : जर तुम्हाला मुरुमं होण्याबरोबरच वेदना ही होत असतील तर ही स्थिती बरीच गंभीर आहे. त्यामुळे चिडचिड होत असताना पिंपल्सला हात लावू नका, कारण याने संसर्ग पसरण्यासोबतच डाग पडण्याची ही भीती असते.

क्लिंजिंग इज मस्ट-बायोडर्माचे सेबियम फेस वॉश : कॉम्बिनेशनमुळे तेलकट त्वचेची गोष्ट असो किंवा मग मुरुम-प्रवण त्वचेची, क्लिंजिंग ही एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत केवळ क्लिंजिंग करणेच नव्हे तर योग्य क्लिंजर वापरण्याची ही गरज आहे. त्यामुळे बायोडर्माचे सेबियम फेस वॉश, जे चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्याबरोबरच सीबमचे जास्त उत्पादन रोखण्यासाठी तसेच छिद्रे अडकण्यापासून रोखण्यासाठी सौम्य क्लिंजर म्हणून काम करते. यामुळे त्वचा हळूहळू समस्यामुक्त होऊ लागते. ते त्वचा कोरडी होऊ देत नाही.

त्यातील झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट एपिडर्मिस साफ करून आणि सेबम स्राव कमी करून डाग कमी करण्यास मदत करते. तसेच, त्याचा साबणमुक्त  फॉर्म्युला त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवण्याचे काम करते. हे अप्लाय केल्यानंतर काही दिवसांतच तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. तर मग आता तेलकट आणि पुरळ त्वचेला म्हणा बाय.

जशी त्वचा टोन तशी नेल पॉलिश

* पारुल भटनागर

आमच्या मैत्रिणीने अतिशय गडद रंगाची नेलपॉलिश लावली, हे पाहून तुम्ही तिच्या हाताचे वेडे झाले आहात आणि काहीही विचार न करता तुम्हीही ती विकत घेण्याचे ठरवले. पण जेव्हा तुम्ही तुमच्या नखांवर ट्राय केला तेव्हा ना तुम्हाला कोणतीही प्रशंसा मिळाली आणि ना तुमच्या हातांची शोभा वाढली, जे पाहून तुमची निराशा झाली.

पण तुमच्यासोबत असं का झालं याचा तुम्ही विचार केला आहे का? याचे कारण म्हणजे ज्याप्रमाणे त्वचेचा टोन आणि त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन क्रीम्सची निवड केली जाते, अगदी तशीच नेल पॉलिशचीही निवड केली जाते. जेणेकरून ती तुमचे हात कुरूप न बनवता त्यांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करेल. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या प्रकारची नेलपॉलिश कोणत्या स्किन टोनवर चांगली दिसेल :

त्वचेचा टोन लक्षात ठेवा

* जर तुमची त्वचा पांढरी असेल आणि तुम्हाला खूप गडद शेड्स लावायचे असतील, तर गडद निळा, लाल, मार्जेन्टा, केशरी, रुबी शेड्स तुमच्या हातांवर खूप चांगले उठून दिसतील, कारण ते तुमचे हात अधिक उजळ बनवण्याचे काम करतात. तुम्ही पारदर्शक शेड्स वापरून पाहू नका, कारण ते तुमच्या त्वचेशी मिसळल्यामुळे तुमचे हात निस्तेज दाखवायचेच काम करतील.

* जर तुमचा त्वचेचा टोन डस्की म्हणजे सावळा असेल तर तुम्ही बहुतेक नेल पेंट्स वापरून पाहू शकता, कारण डस्की ब्युटीशी कुठली स्पर्धाच नाही. बहुतेक गोष्टी त्याच्यावर शोभून दिसतात. त्यावर गुलाबी, पिवळा, केशरी यांसारख्या तेजस्वी आणि चमकदार रंगांसह धातूचे रंग जसे गोल्ड आणि सिल्वर रंगदेखील छान दिसतात.

* जर तुमच्या त्वचेचा टोन गडद असेल आणि तुम्ही असा विचार करत असाल की कोणतीही नेलपॉलिश माझ्या नखांना शोभणार नाही, तर तुमचा हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, कारण जर तुम्ही तुमच्या नखांवर डीप रेड, गुलाबी आणि निऑन रंग लावले तर हे रंग चांगले मिसळून तुमच्या त्वचेला व्हायब्रेन्ट लुक देण्याचे काम करतात.

नेल पॉलिश कसे लावायचे

तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार नेलपॉलिश निवडली असली तरी ती योग्य प्रकारे लावली नाही तर तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते.

त्यामुळे जेव्हाही तुम्ही नेलपॉलिश लावाल तेव्हा सर्वप्रथम नखांना व्यवस्थित फाईल करा जेणेकरून नेलपॉलिश उठून दिसू शकेल. तसेच नेलपॉलिश नेहमी कोरडया नखांवरच लावा, कारण यामुळे ती निघण्याची भीती नसते, नेलपॉलिशचे फिनिशिंग नखांवर नेहमीच दिसून यावे, यासाठी तुम्ही प्रथम एकच कोट लावा. मग ते सुकल्यानंतरच दुसरा कोट लावा, नेल पेंट लावल्यानंतर क्यूटिकल ऑइल अवश्य वापरा, कारण ते नखे हायड्रेट ठेवते.

नेहमी बँडेड नेल पॉलिश खरेदी करा

त्वचेच्या टोननुसार नेलपॉलिश खरेदी करणे जितके आवश्यक आहे तितकेच बँडेड नेलपॉलिश खरेदी करणे देखील महत्त्वाचे आहे, कारण जरी तुम्हाला लोकल नेलपॉलिश स्वस्त दरात आणि वेगवेगळया रंगात उपलब्ध होत असल्या तरी त्या नखे कमकुवत बनवण्यासोबतच त्यांचा ओलावाही चोरतात. तसेच जास्त केमिकल्स असलेल्या नेलपॉलिश वापरल्याने नखे पिवळी होऊ लागतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही नेलपॉलिश खरेदी कराल तेव्हा नेहमी फक्त बँडेड खरेदी करा.

सेन्सिटिव त्वचेला हवंय खास क्लिंजर

 – पारुल भटनागर

प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की तिची स्किन म्हणजेच त्वचा उजळ, आकर्षक होण्याबरोबरच विविध प्रकारच्या समस्यांपासून मुक्त असावी. परंतु कितीही विचार केला तरी हे गरजेचं नाही की प्रत्येक स्त्रीची त्वचा छान असायला हवी, कारण त्वचा एक संरक्षित थराने बनलेली असते. परंतु वातावरणात झाकलेले बदल, केमिकल असणारी त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं, धूळ माती व कचरा यांच्या संपर्कात जेव्हा आपण येतो तेव्हा हे आपल्या त्वचेला सेन्सिटिविटीचे कारण बनतात. यामध्ये आपल्याला विविध त्वचेच्या समस्यांशी असा सामना करावा लागतो.

अशावेळी गरजेचा आहे योग्य त्वचेची काळजी घेण्याबरोबरच स्किन केअर प्रॉडक्ट वापरणं म्हणजे आपली त्वचा नेहमी चमकदार राहील. अशा वेळी बायोडर्माचं सेंसीबायो H20 क्लिंजर एक असं प्रॉडक्ट आहे जे तुमच्या त्वचेची खास काळजी घेण्याचं काम करतं.

तर चला, जाणून घेऊया ही कशी घ्यायची त्वचेची काळजी :

स्किन सेन्सिटिविटीची कारणं

हार्मफुल इन्ग्रेडियंटस : दीर्घकाळापर्यंत स्किन केयर प्रोडक्टचा वापर केल्याने ज्यामध्ये, मिनरल ऑइल सिलिकॉन्स व त्वचेचं नुकसान करणारे इन्ग्रेडियंटस असतात, याचा वापर केल्याने छिद्रे बंद होण्याबरोबरच त्वचेवर मुरुमं, जळजळसारखी समस्या निर्माण होऊ लागते. त्याच्या समाधानासाठी या गोष्टीची काळजी घ्यावी लागते की तुम्ही स्किन केअर प्रॉडक्टमध्ये इन्ग्रेडियंटस पाहून प्रॉडक्ट विकत घ्या. प्रयत्न करा, नॅचरल इन्ग्रेडियंट बनलेले व माईल्ड प्रोडक्टसचा वापर करा. त्याबरोबरच रात्री झोपतेवेळी मेकअप काढायला विसरू नका.

प्रदूषण : आपण जरी घरात राहत असो वा बाहेर पडत असू, आपल्या चहूबाजूंनी प्रदूषणाने घेरलेलो असतो. याचं कारण फक्त आपल्या त्वचेला लागलेली घाण नाही तर प्रदूषणाच्या कणांची निगडित काही केमिकल्स त्वचेच्या बाहेरून प्रवेश करतात, जे ऑक्सिडेशन स्ट्रेसचं कारण बनतात. कारण आपल्या त्वचेची बॅरियरला क्षीण करण्याबरोबरच सोबत सूज, एजिंगचं कारणदेखील बनतात. ज्यामुळे सेंसीबायो H20 क्लिंजर तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देण्याचं काम करतं.

मळ : तुमची त्वचा केमिकल्स व रोगजन्यकांच्या विरुद्ध एक नॅचरल बॅरियरचं काम करते. अशा वेळी तुमच्या त्वचेला हायजिन म्हणजेच ती दररोज व्यवस्थित स्वच्छ करत असाल तर त्वचेच्या थरावर डेड स्किन सेल्स मळ व रोगजंतू काढण्यासाठी सक्षम बनते.

टॅप वॉटर : टॅप वॉटर बॅक्टेरिया, कॅल्शियम व इतर आवशेषांनी भरलेलं असतं, जे आपल्या त्वचेच्या बाहेरच्या थरावर असणाऱ्या एपिडर्मिसचं नुकसान करतो.   यामुळे त्वचेत जळजळ, अॅलर्जीसारखी समस्या निर्माण होते. अशावेळी योग्य फेस क्लींजरचा वापर करून तुम्ही सेन्सिटिव स्किनशी लढून या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

फेस मास्क : कोविड -१९ व्हायरसमुळे स्वत:ला प्रोटेक्ट करण्यासाठी मास लावणे गरजेचे झालं आहे तिथे त्वचेसाठीदेखील मुश्किल झालं आहे. कारण यामुळे चेहऱ्याच्या खालच्या भागात ही समस्या निर्माण होते सोबतच ही सेन्सिटिव स्किन असणाऱ्यांना स्किनमध्ये जळजळ, त्वचा लाल होणे आणि अगदी एक्किमाची समस्यादेखील निर्माण होते. यासाठी त्वचा क्लीन राहण्याबरोबरच गरजेचं आहे त्वचेला थंडावा मिळणे.

काय आहे बायोडर्माचं सेंसीबायो H20 क्लिंजर

२५ वर्षापूर्वी बायोडर्माने एका नव्या उत्पादनाच्या रूपात मिसेलर टेक्नॉलॉजीचा शोध लावला, जो आज एक प्रतिष्ठित उत्पादनाच्या रुपात स्थापित झाला आहे. सेंसीबायो H20 एक डर्मेटोलॉजिकल वॉटर आहे जे सेन्सिटिव त्वचेची काळजी घेतं. याचा युनिक फॉर्म्युला स्क्रीनच्या पीएच लेवलला कायम ठेवून त्वचेला स्वच्छ व मुलायम ठेवण्याचं काम करतो. मिसेलर टेक्नॉलॉजी प्रत्येक प्रकारच्या अशुद्ध आणि प्रदूषणाच्या कणांच्या प्रभाविपणे  हटवून त्वचेला स्वच्छ करण्यात सक्षम आहे. यासाठी तुम्हाला हे थोडया प्रमाणात कॉटनवर घेऊन सकाळी आणि संध्याकाळी चेहरा स्वच्छ करायचा आहे. याची खास बाब म्हणजे हे चेहऱ्यावर घासायचं नाहीए आणि ना ही यानंतर चेहरा स्वच्छ करायची गरज आहे. मग झालं ना इफेक्टिव्ह व सहज पद्धत, सोबतच सहजपणे उपलब्ध होणारं देखील.

बेसिक रूल्स फॉर स्किन सेन्सिटिवीटी

  • त्वचा दिवसा पर्यावरणाच्या विरुद्ध सुरक्षात्मक भूमिका साकारण्यासाठी स्वत:ला तयार करते. यासाठी गरजेचे आहे की रात्रभराची अशुद्धी दूर करण्यासाठी त्वचेला जेंटल क्लिंजरने स्वच्छ करा. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरची दिवसभराची अशुद्धी दूर करणं गरजेचं आहे. अन्यथा चेहऱ्यावर घाण जमा होऊन, त्वचेत प्रवेश करून त्याचं नुकसान करू शकते. यासाठी त्वचेला दिवसा व रात्री सेंसीबायो H20 क्लिंजरने क्लीन करायला विसरू नका.
  • सेन्सिटिव स्किन असणाऱ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की जर चेहऱ्याला कोणत्याही प्रोडक्टने स्वच्छ केल्यानंतर चेहऱ्यावर टाईटनेस येत असेल तर याचा अर्थ समजून जा कि हे उत्पादन तुमच्या त्वचेसाठी योग्य नाही आहे.
  • तुमचं सनस्क्रीन मेकअप क्रीम कधीही चेहऱ्यावर ओवरनाईट लावून झोपू नका, या उलट क्लिंजरने स्वच्छ करून त्वचेला डिटॉक्स करा.

                                        

मान्सून स्पेशल : मान्सून हेअर अँड स्किन केअर

* डॉ. अप्रतिम गोयल

पावसात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवत असतात. हवेतील आर्द्रतेमुळे त्वचेवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, फंगस तसेच इतर संसर्ग यांची लागण होते. त्याचबरोबर पहिल्या पावसाच्या सरीमध्ये भरपूर प्रमाणात आम्ल असते, ज्यामुळे सर्वात जास्त त्वचा आणि केसांचे नुकसान होते. अशात या मोसमात काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून संरक्षण मिळते.

मान्सूनमध्ये त्वचेची देखभाल

सफाई किंवा क्लिंजिंग : पावसाच्या पाण्यात रसायने मोठया प्रमाणात असतात. त्यामुळे मान्सूनमध्ये त्वचेची योग्य प्रकारे सफाई होणे जरूरी असते. मेकअप काढायला मिल्क क्लिंजर किंवा मेकअप रिमूव्हरचा वापर केला गेला पाहिजे. त्वचेतील अशुद्धता धुऊन काढल्यामुळे त्वचेवरील रोम उघडले जातात. साबण वापरण्याऐवजी फेशिअल, फेस वॉश, फोम इ. अधिक परिणामकारक असते.

टोनिंग : क्लिंजिंगनंतर हे केले पाहिजे. मान्सूनदरम्यान वायू आणि जल याद्वारे अनेक मायक्रोब्स निर्माण होतात. यामुळे स्किन इन्फेक्शन तसेच त्वचा फाटण्यापासून वाचण्यासाठी अँटी बॅक्टेरियल टोनर अधिक उपयुक्त असतो. कॉटन बडचा वापर करून त्वचेवर हळुवार टोनर फिरवा. जर त्वचा अधिकच शुष्क असेल तर टोनरचा वापर टाळला पाहिजे. होय, अतिशय सौम्य टोनरचा वापर करू शकता. तेलकट आणि मुरूम असेलल्या त्वचेवर टोनर चांगला परिणाम करतो.

मॉइश्चरायजर : उन्हाळ्याप्रमाणेच पावसातही मॉइश्चरायझिंग आवश्यक असते. मान्सूनमुळे शुष्क त्वचेवर डिमॉश्चरायजिंग प्रभाव पडू शकतो तसेच तेलकट त्वचेवर याचा ओव्हर हायड्रेटिंग प्रभाव पडतो. पावसात हवेत आर्द्रता असतानाही त्वचा पूर्णपणे डिहायड्रेट होऊ शकते. परिणामी त्वचा निस्तेज होऊन आपली चमक हरवून बसते.

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी दररोज मॉश्चराइज करणे खूप आवश्यक असते. जर असे केले नाही तर त्वचेला खाज सुटू लागते. जर तुम्ही पाण्यात वारंवार भिजत असाल तर नॉन वॉटर बेस्ड मॉइश्चरायजरचा वापर करा. लक्षात ठेवा की जरी तुमची त्वचा तेलकट असली तरी रात्री तुम्ही वॉटर बेस्ड लोशनच्या पातळ थराचा वापर केला पाहिजे.

सनस्क्रीन : सनस्क्रीनचा वापर न करता घरातून बाहेर पडू नका. असेपर्यंत ऊन तुमच्या त्वचेला युवीए तसेच युवीबी किरणांपासून संरक्षणाची गरज भासेल. घरातून बाहेर पडताना कमीतकमी २० मिनिटे आधी २५ एसपीएफ असेलेले सनस्क्रीन लावा आणि दर ३ ते ४ तासांनी हे लावत राहा. सर्वसाधारणपणे हा चुकीचा समज असतो की सनस्क्रीनचा वापर फक्त तेव्हाच करावा, जेव्हा ऊन असते. ढगाळ/पावसाळी दिवसातील वातावरणामधील अल्ट्राव्हायोलेट किरणांना कमी लेखू नका.

शरीर कोरडे ठेवा : पावसात भिजल्यावर शरीर कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्द्रता असलेल्या हवेत शरीरावर अनेक प्रकारचे किटाणू वाढीस लागतात. जर तुम्ही पावसाच्या पाण्यात भिजला असाल तर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. घरातून बाहेर पडताना पावसाचे पाणी पुसायला जवळ काही टिश्यू किंवा छोटा टॉवेल बाळगा.

त्वचेची देखभाल : चमकत्या तसेच डागविरहित त्वचेसाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्किन ट्रीटमेंट घेत राहा. पील्स तसेच लेजर ट्रीटमेंटसाठी मान्सून हा सर्वात चांगला मोसम असतो, कारण सूर्याची किरणे बहुतांशवेळा नसल्यामुळे उपचार केल्यानंतर विशेष देखभाल करावी लागत नाही.

मान्सूनमध्ये केसांची देखभाल

* जर पावसात केस भिजले असतील तर जितक्या लवकर शक्य होईल तेवढे माइल्ड शॅम्पूने केस धुवा. केसांना जास्त काळ पावसाच्या पाण्याने ओले ठेवू नका, कारण त्यात रसायनांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.

* डोक्याचे सुकेच मालिश करा जेणेकरून रक्ताभिसरण व्यवस्थित होईल. आठवडयातून एकदा कोमट तेलाने डोक्याला मसाज करणे चांगले असते, पण जास्त वेळ तेल केसांत राहू देऊ नका म्हणजे काही तासांतच ते धुवून टाका.

* दर दुसऱ्या दिवशी केस धुवावेत. जर लहान केस असतील तर तुम्ही ते रोज धुवू शकता. केस धुण्यासाठी अल्ट्राजेंटल किंवा बेबी शॅम्पू वापरणे अधिक चांगले असते. हेअर शॉफ्ट्सवर कंडिशनर लावल्याने केस मजबूत होतात.

* मान्सूनमध्ये हेअर स्प्रे किंवा जेलचा वापर करू नका, कारण हे स्कॅल्पला चिकटू शकतात आणि त्यामुळे कोंडा होऊ शकतो. ब्लो ड्राय करणेही या दिवसांत टाळा. जर रात्री केस ओले असतील तर त्यांना कंडिशनर लावून ब्लोअरच्या थंड हवेने सुकवा.

* पातळ, वेव्ही आणि कुरळया केसांत अधिक ओलावा शोषला जातो. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे स्टायलिंग करण्याआधी ह्युमिडिटी प्रोटेक्टिव्ह जेल वापरावे.

* आपल्या केसांच्या प्रकारानुसार हेअर केअर उत्पादनांची निवड करा. साधारणपणे गुंतलेले, कोरडे आणि रफ केस हे हेअर क्रीम लावून सरळ करता येतात.

* मान्सूनमध्ये हवेत अधिक आर्द्रता आणि ओलावा असल्याकारणाने कोंडा ही एक कॉमन समस्या असते. त्यामुळे आठवडयातून एकदा चांगल्या अँटी डँड्रफ शॅम्पूचा वापर करावा.

* मॉन्सूनमध्ये पाण्यात क्लोरिनचे प्रमाणही अधिक असते, जे केसांना ब्लीच करून खराब करू शकते. त्यामुळे शक्य असल्यास केस पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

* पावसाचा मोसम हा केसांत उवा होण्यासाठीही अनुकूल असतो. जर केसांत उवा झाल्या असतील तर परमाइट लोशन वापरा. १ तास डोक्याला लावून ठेवा आणि मग धुऊन टाका. ३-४ आठवडे असे करत रहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें