वाढत्या वयातही दिसा तरूण

* अनुराधा गुप्ता

आपल्या वयापेक्षा कमी वयाचं दिसायला कोणाला नाही आवडत? महिलांबाबत बोलायचं झालं तर त्या आपलं वय लपवण्यासाठी काहीही ट्राय करायला मागेपुढे पाहात नाहीत.

म्हणूनच कॉस्मेटीक इंडस्ट्रीने वाढत्या वयावर नियंत्रण ठेवणारी बरीच उत्पादनं बाजारात आणली आहेत. यामुळे चेहऱ्यावरच्या वयाच्या खुणा लपवण्यासाठी महिलांना मदत होते. पण ही उत्पादनं वापरण्यापूर्वी त्याविषयी संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे, नाहीतर या उत्पादनांचा चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

कॉस्मेटोलॉजिस्ट अवलीन खोखर म्हणतात, ‘‘सौंदर्य प्रसाधनं सौंदर्य वाढवण्यासाठी असतात. यांच्या वापराने चेहऱ्यावरची कमतरता भरून काढली जाऊ शकते. पण ती कमतरता आणि त्यासाठी असलेलं योग्य उत्पादन यांचं योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे, नाहीतर वय कमी दिसण्यापेक्षा जास्त दिसू लागेल.’’

त्वचेला मेकअपसाठी करा तयार

अवलीनच्या म्हणण्यानुसार त्वचेवर कोणतंही सौंदर्य प्रसाधन लावण्यापूर्वी त्याचा प्रकार जाणून घ्या. कारण त्वचेला अनुरूप निवड केल्यास योग्य लुक मिळतो. बाजारात ड्राय, ऑयली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी वेगवेगळी उत्पादनं उपलब्ध आहेत. योग्य निवडीसह त्वचेला मेकअपसाठी तयार करणंही महत्त्वाचं आहे. त्वचा स्वच्छ केली नाही तर धुलीकण त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकून राहतात आणि मेकअपच्या थरामुळे छिद्र बंद होतात. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मेकअपच्या आधी त्वचेचं क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग नक्की करा. यामुळे मेकअपमध्ये स्मूदनेस येतो.

कंसीलरचा वापर टाळा

कंसीलरचा उपयोग काळे डाग लपवण्यासाठी केला जातो. चेहऱ्यावर काळे डाग असणाऱ्या भागातच कंसीलर लावलं जातं. पण काही महिला हे पूर्ण चेहऱ्यावर लावतात. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ठळक होतात. अवलीनच्या म्हणण्यानुसार कंसीलर जाडसर असतं आणि थोडं लावल्यानंतरही परिणाम दिसू लागतो. जास्त लावल्यामुळे चेहऱ्यावर ओरखडे दिसतात. काही महिला काळी वर्तुळं लपवण्यासाठी कंसीलरचा वापर करता. पण हे चुकीचं आहे. डोळ्यांखाली कंसीलर फक्त इनर कॉर्नरवरच लावावं. अधिक प्रमाणात कंसीलर लावल्यास डोळे चमकदार दिसतात जेणेकरून कळून येतं की डोळ्यांवर कंसीलर लावलं आहे.

जास्त फाउंडेशन लावू नका

फाउंडेशनची निवड आपल्या स्किन टाइपप्रमाणे करा. उदाहरणार्थ : नॉर्मल त्वचा असणाऱ्या महिला मिनरल बेस्ड किंवा मॉइश्चराइजरयुक्त फाउंडेशन वापरू शकतात. तर कोरड्या त्वचेसाठी हायडे्रटिंग फाउंडेशन योग्य ठरेल. सेम स्किन टोनचं फाउंडेशनच घ्या. नाहीतर त्वचा ग्रे दिसू लागेल. ऑयली त्वचेसाठी पावडर डबल फाउंडेशन वापरा. हे त्वचेला मेटीफाय करतं.

फाउंडेशनच्या योग्य निवडीसह त्याचा योग्य वापरही आवश्यक आहे. काही महिला संपूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन लावतात. हे चुकीचं आहे. फाउंडेशन चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत म्हणजे थोडंसं फाउंडेशन बोटावर घेऊन डॅब करत योग्यप्रकारे चेहऱ्यावर लावावं. यामुळे वयानुसार त्वचेमध्ये झालेलं डिस्कलरेशन निघून जातं.

कॉम्पॅक्टने द्या फिनिशिंग

बऱ्याच महिला फाऊंडेशननंतर कॉम्पॅक्ट पावडर लावत नाहीत. अवलीन याला मेकअप ब्लंडर म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की कॉम्पॅक्ट पावडर मेकअपला फिनिशिंग देतं. पण याचाही अतिवापर करू नये. त्यामुळे ओरखडे उठतात.

याची निवडही काळजीपूर्वक करावी. मुख्य म्हणजे स्किनकलर टोनप्रमाणेच शेड निवडा. आपल्या स्किन टाइपचाही विचार करा. उदारणार्थ, ऑयली त्वचेसाठी ऑइल कंट्रोल मॅट फिनिशिंग कॉम्पॅक्ट पावडर तर कोरड्या त्वचेसाठी क्रिमी कॉम्पॅक्ट घ्या. यामुळे त्वचा निरोगी दिसते. सेन्सिटिव्ह स्किनसाठी इमोलिएंट ऑइल आणि वॅक्सयुक्त कॉम्पॅक्ट सर्वात चांगला पर्याय आहे.

आय मेकअप काळजीपूर्वक करा

तरूण दिसण्यासाठी आय मेकअप योग्यप्रकारे करणं आवश्यक आहे. बऱ्याच महिलांचा गैरसमज असतो की डोळ्यांना गडद मेकअप केल्याने तरूण दिसता येतं. पण अवलीनचं म्हणणं आहे की एशियन स्कीन आणि रस्ट कलरमुळे वय कमी दिसतं. आयशेड्समध्ये हेच रंग वापरावेत. क्रिमी ऑयशेड्समुळे निवडू नका. यामुळे डोळ्यांच्या चुण्या लपल्या जात नाहीत. आयशेड्सह आयलायनरही ब्राउन निवडा.

काजळ आणि मस्काराशिवाय डोळ्यांचा मेकअप अपूर्ण असतो. काजळामुळे डोळे   उठून दिसतात. सध्या स्मजप्रूफ काजळ फॅशनमध्ये आहे. त्यामुळे आपल्यासाठी हेच काजळ निवडा. मस्कारा निवडतानाही काळजी घ्या. वाढत्या वयानुसार पापण्यांचे केस गळू लागतात. चुकीचा मस्कारा लावल्याने गळती वाढू शकते. पण हायडे्रटिंग मस्कारामुळे पापण्यांचे केस मजबूत होतात. मस्काराची योग्य निवड आणि योग्य वापर केल्यानेच तरूण दिसता येते. म्हणून मस्कारा नेहमी अपर आणि लोअर लॅशेजवर लावा. यामुळे डोळ्यांना छान लुक मिळतो.

लिपस्टिकच्या ब्राइट शेड निवडा

शास्त्रीयदृष्ट्या ब्राइट शेडमुळे कोणतीही गोष्ट छोटी दिसते. पण ओठांच्या बाबतीत उलट परिणाम दिसतो. डार्क शेड्समुळे ओठ मोठे दिसतात. आपल्या वयापेक्षा तरूण दिसायचं असेल तर न्यूड आणि ग्लॉसी लिपस्टिक निवडा. लिपलायनवर लिपस्टिकच्या शेडशी मॅच होईल याची काळजी घ्या. फाटलेल्या ओठांवर लिपस्टिक लावू नका. ओठ फाटले असतील तर पेट्रोलिअम जेली लावून स्मूद करा.

अशाप्रकारे मेकअपचे बारकावे माहीत असतील तर तुम्ही वाढत्या वयातही तरूण दिसू शकता.

बायोडर्माचं अँटी एक्ने सेबियम फेस वॉश

* पारुल भटनागर

समस्यामुक्त त्वचा ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण असं असलं तरी कधी तेलकट त्वचा तर कधी त्वचेवर मुरुमं येण्याची समस्या उद्भवते, जे चेहऱ्याचे सौंदर्य आणि तजेलपणा नाहीसे करण्याचे काम तर करतातच शिवाय त्यांच्यामुळे त्वचेवर खूप जळजळ आणि खाज सुटते. अगदी इतके की कधीकधी ती सहन करणेदेखील कठीण होते. ही समस्या तशी तर कोणत्याही ऋतूत उद्भवू शकते, परंतु उन्हाळयात तेलकट त्वचा आणि त्यावर मुरुमांची समस्या अधिक दिसून येते, कारण उन्हाळयात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी सेबेशियस ग्रंथी अधिक सेबम तयार करू लागतात, ज्यामुळे मुरुमं होतात. अशा परिस्थितीत तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेची कारणे कोणती?

आज तेलकट त्वचेची समस्या सामान्य झाली आहे. तेलकट त्वचेमध्ये लिपिड पातळी, पाणी आणि चरबीचे प्रमाण खूप जास्त असते आणि जेव्हा सेबेशियस ग्रंथी आवश्यकतेपेक्षा जास्त सेबम तयार करू लागतात तेव्हा मुरुमं, ब्रेकआउट्स, व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्सच्या समस्या उद्भवतात आणि ब्रेकआउट्समुळे सेबम त्वचेच्या मृत पेशींसह छिद्रे अवरोधित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करते, ज्यामुळे त्वचेची स्थिती आणखी बिघडते. दुसरीकडे कॉम्बिनेशन त्वचेत कपाळ, नाक आणि हनुवटी यांसारख्या टी-झोनमधील तेल ग्रंथी अतिक्रियाशील होतात, तर उर्वरित चेहरा सामान्य आणि कोरडा असतो. त्यामुळे अशा त्वचेचे संतुलन न राहिल्याने अशा त्वचेला इजा होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्याची विशेष गरज आहे.

  • तेलकट त्वचा असण्याचे एक कारण अनुवांशिकदेखील आहे, ज्यामुळे सेबेशियस ग्रंथी नेहमी जास्त सक्रिय होऊन जास्त सेबम तयार करतात, ज्यामुळे मुरुमं होतात.
  • हायपरकेराटिनायझेशन आणि बॅक्टेरियाचा प्रसार, तारुण्यादरम्यान सुरू झालेल्या हार्मोनल क्रियाकलापांचा परिणाम म्हणून सेबमचे जास्त उत्पादन करते, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट आणि चमकदार दिसू लागते, तसेच निरोगी सेबमपेक्षा तिची रचना वेगळीदेखील असते, ज्यामुळे ती अधिक जाड असल्याने तिला कूपातून बाहेर येण्यास अडचण होते. यामुळे कॉमेडम होण्याचा धोका वाढतो.
  • हायपरकेराटीनायझेशनमध्ये त्वचेच्या पेशींची झपाटयाने होणारी वाढ छिद्रे अडकवून सेबमला बाहेर पडण्यास प्रतिबंध करते, जे कॉमेडोमचे कारण बनते, ज्यामुळे त्याच्या सभोवतालची त्वचा पिगमेंट नजर येऊ लागते.
  • मुरुमांच्या जीवाणूंच्या वाढीसाठी सेबम पोषक म्हणून कार्य करते, ज्यामुळे कॉमेडोम लाल मुरुमांमध्ये बदलतो आणि जळजळ व वेदना होतात.
  • काहीवेळा मोठी छिद्रे, ज्यांचे कारण वय आणि जुने ब्रेकआउट असतात, ज्यामुळे त्यात जास्त तेल तयार होऊ लागते. अशा स्थितीत छिद्रे आकुंचन पावणे शक्य नसले तरी त्वचेची विशेष काळजी घेऊन त्यावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवता येते.
  • अनेकवेळा आपण इतरांचे बघून किंवा मग विचार न करता आपल्या त्वचेवर चुकीचे स्किन केयर प्रोडक्ट्स वापरतो, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट होते, ज्यामुळे मुरुमांसह त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत जेव्हा पण तुम्ही पुरळ आणि कॉम्बिनेशन स्किनचे स्किन केअर उत्पादने वापरता तेव्हा तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अशी त्वचा असलेल्यांसाठी लाइटवेट मॉइश्चरायझर आणि जेल आधारित क्लिन्झर वापरणे अधिक योग्य आहे.

काय आवश्यक आहे

सूर्य टाळा : खरं तर सूर्याची हानिकारक किरणं त्वचा कोरडी करतात. अगदी तेलकट त्वचेलाही मॉइश्चरायझरची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत सेबेशियस ग्रंथी अधिक सक्रिय होते, ज्यामुळे अधिक सेबम तयार होते आणि त्वचेवर डाग पडतात. इतकेच नाही तर त्वचेच्या कोरडेपणामुळे हे त्वचेच्या मृत पेशी नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यापासून रोखण्याचे काम करते, ज्यामुळे सेबम छिद्र्रांमधून बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे शक्यतो कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाणे टाळा आणि जर बाहेर गेलातच तर शरीर झाकून ठेवा.

 नियमित ट्रीटमेंट फॉलो करा : कोणत्याही उपचाराचा त्वचेवर तात्काळ परिणाम होत नाही, तर नियमित उपचारांसोबतच त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे जसे की दिवसा आणि रात्री स्वच्छतेचे नियम पाळण्याबरोबरच औषधोपचार घेणे. असे केल्याने तुम्हाला ५-६ आठवडयांत परिणाम दिसू लागतील.

मुरुमांना हात लावू नका : जर तुम्हाला मुरुमं होण्याबरोबरच वेदना ही होत असतील तर ही स्थिती बरीच गंभीर आहे. त्यामुळे चिडचिड होत असताना पिंपल्सला हात लावू नका, कारण याने संसर्ग पसरण्यासोबतच डाग पडण्याची ही भीती असते.

क्लिंजिंग इज मस्ट-बायोडर्माचे सेबियम फेस वॉश : कॉम्बिनेशनमुळे तेलकट त्वचेची गोष्ट असो किंवा मग मुरुम-प्रवण त्वचेची, क्लिंजिंग ही एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत केवळ क्लिंजिंग करणेच नव्हे तर योग्य क्लिंजर वापरण्याची ही गरज आहे. त्यामुळे बायोडर्माचे सेबियम फेस वॉश, जे चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्याबरोबरच सीबमचे जास्त उत्पादन रोखण्यासाठी तसेच छिद्रे अडकण्यापासून रोखण्यासाठी सौम्य क्लिंजर म्हणून काम करते. यामुळे त्वचा हळूहळू समस्यामुक्त होऊ लागते. ते त्वचा कोरडी होऊ देत नाही.

त्यातील झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट एपिडर्मिस साफ करून आणि सेबम स्राव कमी करून डाग कमी करण्यास मदत करते. तसेच, त्याचा साबणमुक्त  फॉर्म्युला त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवण्याचे काम करते. हे अप्लाय केल्यानंतर काही दिवसांतच तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. तर मग आता तेलकट आणि पुरळ त्वचेला म्हणा बाय.

जशी त्वचा टोन तशी नेल पॉलिश

* पारुल भटनागर

आमच्या मैत्रिणीने अतिशय गडद रंगाची नेलपॉलिश लावली, हे पाहून तुम्ही तिच्या हाताचे वेडे झाले आहात आणि काहीही विचार न करता तुम्हीही ती विकत घेण्याचे ठरवले. पण जेव्हा तुम्ही तुमच्या नखांवर ट्राय केला तेव्हा ना तुम्हाला कोणतीही प्रशंसा मिळाली आणि ना तुमच्या हातांची शोभा वाढली, जे पाहून तुमची निराशा झाली.

पण तुमच्यासोबत असं का झालं याचा तुम्ही विचार केला आहे का? याचे कारण म्हणजे ज्याप्रमाणे त्वचेचा टोन आणि त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन क्रीम्सची निवड केली जाते, अगदी तशीच नेल पॉलिशचीही निवड केली जाते. जेणेकरून ती तुमचे हात कुरूप न बनवता त्यांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करेल. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या प्रकारची नेलपॉलिश कोणत्या स्किन टोनवर चांगली दिसेल :

त्वचेचा टोन लक्षात ठेवा

* जर तुमची त्वचा पांढरी असेल आणि तुम्हाला खूप गडद शेड्स लावायचे असतील, तर गडद निळा, लाल, मार्जेन्टा, केशरी, रुबी शेड्स तुमच्या हातांवर खूप चांगले उठून दिसतील, कारण ते तुमचे हात अधिक उजळ बनवण्याचे काम करतात. तुम्ही पारदर्शक शेड्स वापरून पाहू नका, कारण ते तुमच्या त्वचेशी मिसळल्यामुळे तुमचे हात निस्तेज दाखवायचेच काम करतील.

* जर तुमचा त्वचेचा टोन डस्की म्हणजे सावळा असेल तर तुम्ही बहुतेक नेल पेंट्स वापरून पाहू शकता, कारण डस्की ब्युटीशी कुठली स्पर्धाच नाही. बहुतेक गोष्टी त्याच्यावर शोभून दिसतात. त्यावर गुलाबी, पिवळा, केशरी यांसारख्या तेजस्वी आणि चमकदार रंगांसह धातूचे रंग जसे गोल्ड आणि सिल्वर रंगदेखील छान दिसतात.

* जर तुमच्या त्वचेचा टोन गडद असेल आणि तुम्ही असा विचार करत असाल की कोणतीही नेलपॉलिश माझ्या नखांना शोभणार नाही, तर तुमचा हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, कारण जर तुम्ही तुमच्या नखांवर डीप रेड, गुलाबी आणि निऑन रंग लावले तर हे रंग चांगले मिसळून तुमच्या त्वचेला व्हायब्रेन्ट लुक देण्याचे काम करतात.

नेल पॉलिश कसे लावायचे

तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार नेलपॉलिश निवडली असली तरी ती योग्य प्रकारे लावली नाही तर तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते.

त्यामुळे जेव्हाही तुम्ही नेलपॉलिश लावाल तेव्हा सर्वप्रथम नखांना व्यवस्थित फाईल करा जेणेकरून नेलपॉलिश उठून दिसू शकेल. तसेच नेलपॉलिश नेहमी कोरडया नखांवरच लावा, कारण यामुळे ती निघण्याची भीती नसते, नेलपॉलिशचे फिनिशिंग नखांवर नेहमीच दिसून यावे, यासाठी तुम्ही प्रथम एकच कोट लावा. मग ते सुकल्यानंतरच दुसरा कोट लावा, नेल पेंट लावल्यानंतर क्यूटिकल ऑइल अवश्य वापरा, कारण ते नखे हायड्रेट ठेवते.

नेहमी बँडेड नेल पॉलिश खरेदी करा

त्वचेच्या टोननुसार नेलपॉलिश खरेदी करणे जितके आवश्यक आहे तितकेच बँडेड नेलपॉलिश खरेदी करणे देखील महत्त्वाचे आहे, कारण जरी तुम्हाला लोकल नेलपॉलिश स्वस्त दरात आणि वेगवेगळया रंगात उपलब्ध होत असल्या तरी त्या नखे कमकुवत बनवण्यासोबतच त्यांचा ओलावाही चोरतात. तसेच जास्त केमिकल्स असलेल्या नेलपॉलिश वापरल्याने नखे पिवळी होऊ लागतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही नेलपॉलिश खरेदी कराल तेव्हा नेहमी फक्त बँडेड खरेदी करा.

ग्लोइंग आणि हेल्दी त्वचेसाठी ड्राय ब्रशिंग

* प्रतिनिधी

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी ड्राय ब्रशिंग सर्वात उत्तम पर्याय आहे, ज्याचा वापर आज अनेक स्त्रिया करत आहेत. याबाबत मेहरीन मेक ओवरर्सच्या तज्ज्ञ मेहरीन कौसर सांगतात की ड्राय ब्रशिंग जगातील सर्वात मोठया ब्युटी ट्रेण्डसपैकी एक आहे, ज्यामुळे बॉलीवूड तारकांपासून ते सर्वसाधारण महिलादेखील याचा वापर करत आहेत. काय आहे हे ड्राय ब्रशिंग, कसं असतं हे आणि याचे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया :

ड्राय ब्रशिंग काय आहे

ड्राय ब्रशिंग म्हणजे कोरडया त्वचेला ब्रश करणं. ड्राय ब्रशचा वापर फक्त शरीरावरची मृत त्वचा काढण्यासाठी नाही तर चेहऱ्यावरची मृत त्वचा काढण्यासाठीदेखील केला जातो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा साबण आणि पाण्याची गरज नसते.

ड्राय ब्रशचा वापर कसा करावा

अंघोळ करण्यापूर्वी त्वचेवर १०-१५ मिनिटापर्यंत ब्रश हळूहळू चोळावा. ड्राय ब्रशचा वापर टाचांपासून सुरू करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचं पोट आणि गळयावरदेखील ब्रश करू शकता. ब्रशला सर्क्युलेशन मोशनमध्ये चालवा. अशा प्रकारे पूर्ण शरीरावर ड्राय ब्रशिंग करा. शरीरावर ब्रशचा वापर अधिक वेगाने करू नका, कारण यामुळे तुम्हाला जळजळ व खाजदेखील उठू शकते.

कसा निवडाल ब्रश

ड्राय ब्रश करण्याचे अनेक फायदे आहेत जसं की :

* ड्राय ब्रशने त्वचेवरील मृत पेशी म्हणजेच डेड स्किन सेल्स निघून जातात आणि त्वचा अधिक उजळते.

* ड्राय ब्रशिंगने त्वचेतील बंद रोमच्छिद्रे मोकळी होतात आणि त्वचा श्वास घेऊ शकते.

* ब्रशिंगने रक्त प्रवाहामध्ये सुधारणा होते, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळतो, तो सोबतच त्वचा तरुण आणि कोमल दिसू लागते.

* ड्राय ब्रशिंगने चेहऱ्यावरची मृत त्वचा पेशी आणि इतर अशुद्ध घटक निघून जातात, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम व पुटकुळया व ब्लॅकहेड्स दिसत नाहीत.

* जेव्हा ड्राय ब्रशिंगचा वापर तुमच्या दररोजच्या नित्यक्रमात  कराल तेव्हा केसांची वाढदेखील कमी होईल.

* जर तुम्ही दररोज केवळ पाच मिनिटे ड्राय ब्रशिंग करत असाल तर शरीरामधील जमा फॅट कमी व्हायला सुरुवात होते.

या गोष्टीचीदेखील काळजी घ्या

* या गोष्टीची काळजी घ्या की तुमचा ब्रश कोणासोबत वापरू नका.

* जर तुम्हाला  त्वचेशी संबंधित एखादी समस्या असेल तर याचा वापर करण्यापूर्वी एकदा त्वचा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

* ब्रशिंगसाठी नेहमी सॉफ्ट ब्रशचा वापर करा. जसा की लांब हँडलवाला ब्रश वा लुफाह.

* ब्रश कधीही पाण्याने भिजवू नका. कायम कोरडया ब्रशचा वापर करा.

* कमीत कमी आठवडयातून एकदा पाणी वा साबणाने व्यवस्थित स्वच्छ करा.

त्वचेनुसार काळजी घेण्याच्या २० टीप्स

* सलोनी उपाध्याय

बहुतेक स्त्रियांना त्यांच्या त्वचेचा प्रकार माहित नसतो. त्या चेहऱ्यावर कोणतीही फेस क्रीम लावतात. बाजारात नवीन काही आले किंवा टीव्हीवर नवीन क्रीमची एखादी जाहिरात दिसली नाही की तो विकत घेतला आणि लावला. परिणाम म्हणजे डागांनी भरलेली त्वचा बनते. कुठे चेहरा कोरडा तर कुठे तेलकट दिसू लागतो, सुरकुत्या, चट्टे आणि काळेपणा चेहऱ्यावर दिसू लागतो.

जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्या त्वचेबरोबर ही असे होऊ नये तर सर्वप्रथम आपल्या त्वचेचा प्रकार काय आहे ते जाणून घ्या. नंतर त्यानुसारच कॉस्मेटिक उत्पादने निवडा. यासाठी कोणत्याही त्वचेच्या डॉक्टरांकडे जाण्याची किंवा ब्युटीशियनची आवश्यकता नाही. चला, आपल्या त्वचेचा प्रकार कसा जाणायचा हे आम्ही आपल्याला सांगत आहोत :

त्वचेचा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी, सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम आपला चेहरा टिश्यू पेपरने पुसून टाका.

नॉर्मल स्किन : जर टिश्यू पेपरवर कोणताही डाग दिसत नसेल, म्हणजे टिश्यू पेपर पूर्वीसारखाच स्वच्छ असेल तर याचा अर्थ तुमची त्वचा सामान्य म्हणजेच नॉर्मल आहे.

तेलकट त्वचा : जर टिश्यू पेपरने आपला चेहरा पुसल्यानंतर तुम्हाला टिशू पेपरवर तेल दिसले तर याचा अर्थ तुमची त्वचा तेलकट आहे. अशा त्वचेवर सुरकुत्या किंवा वृद्धत्वाची कोणतीही समस्या नसते.

ड्राय स्किन : जर टिश्यू पेपरवर कुठला डाग नसेल परंतु त्वचा ताणल्यासारखी जाणवत असेल आणि चेहऱ्यावर चमक नसेल तर याचा अर्थ त्वचा कोरडी आहे.

संवेदनशील त्वचा : जर आपल्या त्वचेला स्पर्श केल्यानेही जळजळ आणि खाज सुटत असेल तर आपली त्वचा संवेदनशील आहे.

काँबिनेशन त्वचा : जर त्वचेचा काही भाग कोरडा असेल तर काही भाग तेलकट असेल तर ती काँबिनेशन त्वचा आहे. आपल्या नाकावर टिश्यू पेपर लावला आणि त्यावर तेलाचे डाग दिसले परंतु जर तुम्ही तुमच्या गालावर टिश्यू पेपर लावल्यास तो कोरडा दिसला तर याचा अर्थ तुमची काँबिनेशन त्वचा आहे.

तेलकट त्वचेची काळजी

* तेलकट त्वचेसाठी दही खूप चांगले असते. दही आणि बेसनाचे पीठ मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

* बटाटयाचा रस काढा आणि चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या किंवा बटाटा बारीक करा आणि फेस पॅकप्रमाणे त्याचा उपयोग करा. यामुळे चेहऱ्याची चमक वाढेल.

* मुलतानी माती गुलाबजलबरोबर मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

* बेसनाच्या पिठात लिंबू पिळून पेस्ट बनवा आणि हे चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. लिंबू त्वचेचे तेल सहजतेने साफ करतो.

* अंडयाच्या पांढऱ्या भागामध्ये लिंबाचा रस घालून चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

कोरडी त्वचा

* चेहरा आणि मानेवर कापसाने कच्चे दूध लावा. वीस मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा. जर आपल्याला चेहऱ्यावर अधिक मॉइश्चरायझर हवे असेल तर मलईने मालिश करा आणि मग १०-१५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकदार होईल.

* कॉटन पॅड किंवा कापसामध्ये ऑलिव्ह तेल घ्या आणि हे मेकअप रीमूव्हरप्रमाणे वापरा. त्वचा स्वच्छ करण्याबरोबरच हे त्वचेला आर्द्रतादेखील देईल.

* कोरडी त्वचा प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांना अगदी सहज बळी पडते. म्हणून नेहमी सनस्क्रीन वापरा. याचा उपयोग त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवतो.

* पपईचा गाभा आणि केळीची पेस्ट बनवून ते चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

* दोन चमचे कोरफडीच्या जलमध्ये १ अंडयाचा पांढरा भाग मिसळा. मग या पेस्टने चेहऱ्यावर मालिश करा. मालिश केल्यानंतर चेहऱ्यावर हे अर्धा तास ठेवा.

संवेदनशील त्वचा

* क्लीन्सरने चेहरा स्वच्छ करा. यासाठी, सौम्य सल्फेट फ्री क्लीन्सर अधिक चांगला असेल.

* टोनिंगसाठी ग्रीन टी अधिक चांगला वापरला जातो. परंतु जर त्वचेवर काही मुरुम असतील तर अल्कोहोल फ्री टोनर वापरा.

* संवेदनशील त्वचेसाठी अशा मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सुगंध वापरला जात नाही अन्यथा यामुळे एलर्जी होऊ शकते.

* संवेदनशील त्वचा स्वच्छ करण्यासाठी, जास्त थंड पाणी किंवा जास्त गरम पाणी वापरु नका.

* अशा प्रकारच्या त्वचेवर प्रत्येक प्रकारचा फेस मास्क काम करत नाही. यासाठी दही आणि ओटचे पीठ मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

काँबिनेशन स्किन

* काँबिनेशन त्वचेच्या काळजीसाठी दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी अवश्य प्या. यामुळे त्वचा ओलसर राहील. पाणी त्वचेत असलेले विषारी द्रव बाहेर काढण्यास मदत करते.

* चेहऱ्यावर संत्री आणि दहीची पेस्ट लावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. संत्रीपासून त्वचेला व्हिटॅमिन सी मिळेल, ज्यामुळे त्वचा तरुण आणि चमकत राहील. दहीमुळे त्वचेत घट्टपणा येईल आणि यामुळे चेहऱ्यावर आर्द्रताही येते.

* काकडीचा रस मधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनी चेहरा धुवा. हे त्वचेला घट्ट आणि ओलसरपणा देईल, तसेच त्वचेची टॅनिंगदेखील दूर होईल.

* अर्धा चमचे तांदूळ पावडर, १ चमचे एलोवेरा जेलमध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर पॅक चेहऱ्यावरून स्क्रब करा आणि नंतर पाण्याने धुवा. याचा सतत वापर केल्याने त्वचा स्वच्छ राहील.

* दही आणि ओट्सची पेस्ट बनवून टी झोनवर लावा. हा पॅक गालांवर लावू नका. थोडया वेळाने कोमट पाण्याने धुवा. आठवडयातून एकदा हा पॅक अवश्य वापरा. नक्कीच त्वचेत उजळपणा येईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें