कोरड्या त्वचेसाठी फेस मास्क

* मोनिका गुप्ता

हिवाळयात कोरडी त्वचा मॅनेज करणे थोडे कठीण होते. कोणताही मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावा, थोडया वेळाने पुन्हा चेहरा कोरडा होईल. कोरडया त्वचेला बरे करण्यासाठी महिला वेगवेगळया प्रकारचे फेस मास्कदेखील वापरतात. परंतु त्यांचा प्रभावही काही दिवसच टिकतो. परंतु असे काही नैसर्गिक फेस मास्क आहेत, जे आपण सहजपणे घरी बनवू शकता. त्यांचा वापर केल्याने त्वचा बऱ्याच काळासाठी ओलसर राहते :

कोरफडीचा फेस मास्क

कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे शरीर आणि त्वचा दोन्हीसाठी फायदेशीर आहेत. एलोवेरा फेस मास्क बनविण्यासाठी कोरफडीतून जेल बाहेर काढा. त्यात काकडीचा रस घाला. हा मास्क फेस वॉशनंतर चेहऱ्यावर लावा आणि नंतर थोडया वेळाने चेहरा धुवा. हे केवळ चेहऱ्यावरील कोरडेपणाच दूर करणार नाही तर चेहऱ्यावर चमकही दर्शवेल.

एवोकॅडो फेस मास्क

फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यांचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते, चेहऱ्यावरही चमक टिकून असते. एवोकॅडोमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे त्वचेस निरोगी बनवतात. कोरडी व खराब झालेली त्वचा काढून टाकून ते त्वचेस कोमल बनवते. एवोकॅडो फेस मास्क तयार करण्यासाठी २ चमचे मॅश केलेल्या एवोकॅडोमध्ये, १ चमचे मध आणि १ चमचे गुलाब पाणी घाला आणि चांगले मिक्स करा. मग ते चेहरा स्वच्छ करून झाल्यावर चेहऱ्यावर लावा.

स्ट्रॉबेरी फेस मास्क

स्ट्रॉबेरीमुळे केवळ त्वचा कोमलच होत नाही तर चमकदारदेखील दिसते. तिच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. तिच्या वापरामुळे त्वचेत गोठलेल्या मृत पेशीही निघून जातात. स्ट्रॉबेरी फेस मास्कसाठी २-३ मोठया स्ट्रॉबेरी मॅश करून त्यात १ चमचे मध आणि १ चमचे ओटचे पीठ मिक्स करून पेस्ट बनवा आणि नंतर त्यास चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आठवडयातून असे दोनदा करा.

पपईचा फेस मास्क

पपई हे आरोग्य आणि सौंदर्य या दोघांसाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते. त्यात पोटॅशियम असते, जे त्वचेस हायड्रेटेड आणि सुंदर ठेवते. हे त्वचेमध्ये असलेल्या मृत पेशी आणि डाग साफ करण्यासदेखील मदत करते. पपईचा फेस मास्क बनविण्यासाठी, पिकलेल्या पपईपासून १ कप पेस्ट बनवा. नंतर त्यात १ चमचे मध आणि १ चमचे लिंबाचा रस घाला आणि चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

केळी आणि चंदनाचा फेस मास्क

केळी फेस मास्क कोरडया त्वचेला ओलावा देऊन त्यास चमकदार बनविण्यात मदत करते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा संपतो, शिवाय सुरकुत्यांची समस्यादेखील संपते. तसेच त्वचा घट्ट राहण्यासही मदत करते.

केळयाचा फेस मास्क बनविण्यासाठी, १ पिकलेली केळी चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या आणि त्यात १ चमचे मध, १ चमचे ऑलिव्ह तेल आणि अर्धा चमचा चंदन पावडर घाला. आता हा मास्क चेहऱ्यावर लावा. तो कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें