घरबसल्या शुद्ध सोन्यासारखी नितळ त्वचा

* पारुल भटनागर

लग्न, समारंभ, पार्ट्यांचा हा मौसम आहे. अशावेळी नववधू असो किंवा समारंभांना उपस्थित राहणाऱ्या इतर महिला असोत, आता त्यांना प्रत्येक कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे, कारण गेल्या १-२ वर्षात साथीच्या आजारामुळे त्यांच्या मौजमस्तीवर, बाहेर जाण्यावर निर्बंध आले होते. म्हणूनच आता लग्न असो किंवा एखादा समारंभ, मौजमजेबरोबरच त्यांना त्यांच्या त्वचेसोबतही कोणतीही तडजोड करायची नाही. त्वचेवरील डाग निघून जाण्यासोबतच त्वचेवर चमक यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे, पण त्यासाठी पाकिटावर भार टाकून सतत पार्लरमध्ये जावे लागते. अशा परिस्थितीत आम्ही एक असा उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी तयार व्हाल आणि तेही तुमच्या बजेटमध्ये. चला तर मग, जाणून घेऊया डाबर फेम ब्लीच बद्दल :

फेम ब्लीच देते चेहऱ्यावर अप्रतिम चमक

अनेकदा जेव्हा चेहऱ्यावर चमक आणायची असते तेव्हा आपण विचार करतो की, अशी चमक पार्लरमध्ये जाऊन फेशियल करूनच मिळवता येईल, पण तुमचा हा विचार पूर्णत: चुकीचा आहे, कारण ब्लीचने तुम्हाला कुठलाच त्रास होऊ न देता अगदी काही मिनिटांत घरबसल्या फेशियलसारखी चमक देऊ शकते, कारण डाबर फेम ब्लीच खूपच प्रभावशाली आहे. यात त्वचेमधील मृत पेशी काढून टाकून नवीन पिगमेंटेंशन सेल्स म्हणजेच रंगद्र्व्य पेशींची वाढ रोखण्याची ताकद आहे. जेव्हा त्वचेवर मृत पेशी जमा होतात तेव्हा त्या त्वचेवरील रोमछिद्रे बंद करण्यासोबतच त्वचेवर कोरडे पट्टे तयार करतात. त्यांना एक्सफोलिएशननेही काढून टाकता येते जेणेकरून त्वचेची रचना आणि त्वचेला निरोगी ठेवता येईल.

हे आहे अमोनिया मुक्त

डाबर फेम ब्लीच अमोनिया मुक्त आहे. ते त्वचा आणि डोळयांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही. तुम्ही पाकिटावर दिलेल्या सूचनांचे पालन करून ते चेहऱ्यावर सुरक्षितपणे लावू शकता. अमोनियामुळे तुमचे डोळे आणि त्वचेला खाज येते, जळजळ होते सोबतच ते थोडया प्रमाणात शरीरात गेले तरी तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होण्यासोबतच शरीराला सूज येण्यासारखी समस्याही निर्माण होऊ शकते.

नको असलेल्या केसांना लपवा

आजकाल महिलांना फेशिअल हेअर्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळू लागतो, शिवाय चांगले कपडेही घालावेसे वाटत नाहीत आणि लोकांचा सामना करण्याचीही इच्छा होत नाही. नको असलेले केस त्यांच्या सौंदर्यात बाधा आणतात. अशावेळी फेस ब्लीचमध्ये असलेला हायड्रोजन पॅरोक्साईड हा घटक जो ब्लिचिंग एजंट असतो, त्याच्यामुळे नको असलेले केस लपले जातात आणि हरवलेले सौंदर्यही पुन्हा मिळवता येते.

२४ कॅरेट गोल्ड डस्ट ब्लीच

२४ कॅरेट गोल्ड डस्ट ब्लीच क्रीममध्ये गोल्ड डस्ट आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असते, जे तुमच्या त्वचेला उजळ बनवते सोबतच काही मिनिटांतच तुम्हाला नववधूसारखी तजेलदार चमक मिळवून देते. ते अत्यंत शुद्ध सोन्यासारखे त्वचेला चमकदार, नितळ बनवते. विश्वास ठेवा की, जेव्हा तुम्ही नववधूच्या रूपात सजून २४ कॅरेट गोल्ड डस्ट ब्लीचने चेहऱ्याला सुंदर बनवून हॉलमध्ये प्रवेश कराल तेव्हा लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळून राहतील.

लावणे अतिशय सोपे

हे तुम्ही सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने घरबसल्या काही मिनिटांतच लावू शकता, जसे की :

* सर्वात आधी चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर टिश्यू पेपरने तो नीट पुसून घ्या. त्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेला सर्व मळ निघून जाईल.

* दिलेल्या सूचनांनुसार क्रीममध्ये थोडेसे अॅक्टिवेटर मिसळून नीट एकजीव करा. त्यानंतर ते चेहरा आणि मानेवर लावा. डोळे तसेच डोळयांभोवती ते लावू नका.

* शेवटी थंड पाण्याने चेहरा धुवा. काही मिनिटांतच तुम्हाला नववधूसारखी नितळ, चमकदार त्वचा मिळेल.

आता पार्टी मेकअप घरबसल्या करता येईल

* गृहशोभिका टीम

तुम्हाला हे माहित असेलच की मेकअप तुमची व्यक्तिमत्व वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य माहिती असल्यास पार्टी मेकअप घरबसल्या करता येईल. पार्टी मेकअप म्हणजे फक्त ब्युटी पार्लर असा नाही आणि जर तुमचे व्यक्तिमत्व फुलणार असेल, तर तुमचा आत्मविश्वासही वाढेल. त्यामुळे मेकअपकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.

पार्टीसाठी तयार होत असताना प्रत्येक स्त्रीला वेगळं आणि सुंदर दिसायचं असतं. मेकअप हा त्याचा एक टप्पा आहे. तुमचे सौंदर्य वाढवण्यासोबतच ते तुमचा लुक अधिक आकर्षक बनवते.

योग्य प्रकारे केलेला मेक-अप तुमचा चेहरा चुंबकासारखा बनवतो की एकदा नजर गेली की तो आपली दृष्टी हिरावून घेऊ शकणार नाही.

पण, पार्टीत मेकअप कसा करायचा याबाबत अनेकदा पेच निर्माण होतो. आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अधिक मेकअप हा सौंदर्य प्राप्त करण्याचा मार्ग नाही. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केलेला मेकअप केवळ तुमचा लुक सुधारण्यास मदत करतो. जोपर्यंत घरी स्वतःचा मेकअप करण्याचा प्रश्न आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य उत्पादने निवडणे. चांगली आणि योग्य उत्पादने आपल्याला इच्छित स्वरूप प्राप्त करण्यात मदत करतील.

चेहरा मेकअप

मेकअपच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्याची निखारता वाढवण्यासाठी सर्वप्रथम चेहऱ्याला क्लिंजिंगने पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करा. त्यानंतर कन्सीलर लावा. कन्सीलर चेहऱ्यावरील डाग लपवण्यास मदत करते. त्यानंतर फाउंडेशन लावा. लक्षात ठेवा की फाउंडेशन त्वचेच्या रंगाशी जुळले पाहिजे. चमकदार लुक देण्यासाठी क्रीम ब्लशर लावा. यानंतर फेस पावडर लावून नैसर्गिक बेस बनवा.

डोळा मेकअप

डोळ्यांवर गडद मेकअप रात्रीच्या पार्टीसाठी आकर्षक बनवतो. दिवसा लाईट शेड्स असलेल्या आयशॅडो वापरा. लावण्यापूर्वी, वरच्या झाकणांवर हलक्या ब्रशने आळीपाळीने फाउंडेशन आणि लूज पावडर लावा, तसेच डोळ्याच्या पेन्सिलने वरच्या झाकणांवर एक पातळ रेषा काढा आणि ब्रशने पसरवा, जेणेकरून पापणी मोठी दिसेल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की थकलेल्या डोळ्यांवर जास्त किंवा गडद मेकअप करायला विसरू नका.

हेअरस्टाईल काहीतरी खास आहे

मेकअप व्यतिरिक्त, तुमची हेअरस्टाइलदेखील खूप महत्वाची आहे. हेअरस्टाइलमध्येही तुम्ही काहीतरी नवीन ट्राय करू शकता. लूज कर्ल्स आणि रोमँटिक अपडेट्ससह केसांना स्टायलिश लुक देण्याचा ट्रेंड असेल. यासोबतच कमी किंवा जास्त घट्ट पोनीटेल पुन्हा फॅशनमध्ये आहे.

ओठ मेकअप

ओठ पातळ दिसण्यासाठी, ओठांच्या आतील बाजूस म्हणजेच आतील बाजूस लिपस्टिकच्या शेडशी जुळणारे लिप लाइनर वापरा. गडद सावली अजिबात वापरू नका आणि लिपग्लॉसचा एकच कोट लावा. याउलट ओठ दाट दिसण्यासाठी ओठांच्या बाहेरील कडांना लिप लाइनर लावा. लिपस्टिकची कोणतीही समृद्ध शेड लावा आणि लिपग्लॉसच्या मदतीने वरच्या आणि खालच्या ओठांमधील क्षेत्र हायलाइट करा.

मग उशीर व्हायला काय हरकत आहे? तुम्ही पार्टीला जाण्यासाठी तयार आहात.

त्वचा उजळवणारी उटणी

* माधुरी गुप्ता

वातावरणातील बदल, हवा, धूळ व प्रदूषणामुळे त्वचेवर वाईट परिणाम होत असतातच, अशात जर योग्य काळजी घेतली नाही तर अवेळी चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, त्वचा टवटवीतपणा हरवू लागते.

त्वचेच्या पोतानुसार घरगुती उटण्यांचा वापर करून त्वचा स्वस्थ, सुंदर व चमकदार बनवता येऊ शकते.

सौंदर्यतज्ज्ञ डॉली कपूर सांगतात की उटण्याने चेहरा सतेज होतो. त्वचा आश्चर्यकारकरित्या उजळते. त्यामुळेच तर लग्नाच्या एक महिना आधीपासून नववधुला रोज उटणे लावले जाते. फक्त याबाबत काळजी घेतली गेली पाहिजे की उटण्यासाठी जे साहित्य वापरले जाईल, ते त्वचेला अनुकूल असावे. तसेच उटण्याने जेव्हा स्क्रब कराल, तेव्हा हलक्या हाताने करावे. जोर लावून उटणे काढू नये. असे केल्याने त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यावर चट्टे येऊ शकतात. हलक्या हाताने गोलाकार फिरवत उटणे काढावे.

अनेक फायदे

उटण्याच्या वापराने त्वचेमध्ये ओलावा व चमक टिकून राहते. त्यामुळे मृत त्वचा निघून त्वचेला नवी टवटवी येते. तसेच रक्तप्रवाहही सुरळित होतो, कारण उटणे काढत असताना आपोआप त्वचेला मालिश केली जाते. उटण्यामुळे रंगही उजळतो. सुरकुर्त्यांपासून बचाव होतो.

बहुतेक उटण्यांमध्ये हळदीचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक रोगांपासून त्वचेचा बचाव होतो. अनेक लाभ असले तरी आपल्या त्वचेला अनुरूप उटण्यांचाच वापर करावा. जसे की कोरड्या त्वचेसाठी कधी लिंबू, संत्रे आदी आंबट फळांचा वापर करू नये.

रंग उजळवणारी उटण

  • २ चमचे साय, १ चमचा बेसनपीठ व चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी. १०-१५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. रंग उजळू लागेल.
  • १ चमचा उडदाची डाळ कच्च्या दूधात भिजवा. मग वाटून पेस्ट तयार करा. यात थोडे गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावा. थोडावेळ वाळू द्या. मग हळूहळू गोलाकार फिरवत फिरवत उटणे काढावे व चेहरा धुवावा. त्वचा चमकदार होईल.
  • २ चमचे बेसनपीठ, १ चमचा मोहरीचे तेल व थोडे दूध मिसळून पेस्ट बनवा. पूर्ण शरीरावर हे उटणे लावावे. काही वेळाने हळूहळू रगडून काढून टाकावे व अंघोळ करावी. त्वचा मऊ मुलायम होईल.
  • मसूर डाळ वाटून पावडर करून घ्या. मग २ चमचे मसूर डाळीच्या पावडरमध्ये १ अंड्याचा बल्क मिसळून पेस्ट बनवा. यात २ थेंब लिंबूरस व १ मोठा चमचा कच्चे दूध मिसळून रोज चेहऱ्यावर लावा, सुकल्यानंतर काढून टाका व चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
  • १ चमचा दही, १ मोठा चमचा बेसनपीठ, चिमूटभर हळद व २ ते ३ थेंब लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट बनवा. हे मिश्रण हातपाय, चेहरा व इतर शरीरावर लावून ५-१० मिनिटं राहू द्या व नंतर हाताने काढून घेत अंघोळ करा.
  • एक चमचा मुलतानी मातीमध्ये थोडी साय, काही थेंब गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ती चेहऱ्यावर लावून सुकू द्या. मग चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या
  • १ चमचा मोहरीला दूधात बारीक वाटून घ्या व चेहऱ्यावर लावा मोहरीच्या उटण्याने रंग उजळतोच शिवाय त्वचाही चमकदार होते.
  • दह्यामुळे त्वचेचा रंग उजळतो. लिंबाने तेलकटपणा कमी होतो. या दोन्हींपासून बनवलेल्या उटण्याने कांती उजळते.
  • टरबूज आणि सीताफळाच्या बिया समप्रमाणात घेऊन वाटून घ्या. मग दूध मिसळून चेहरा व मानेवर लावा. हळूच मालिश करून काढा. काही दिवस याचा प्रयोग केल्याने रंग उजळेल.
  • ब्रेडस्लाईस थोड्या दूधात भिजवून चेहऱ्यावर लावा. ५-१० मिनिटांनी मालिश करून काढून घ्या. चेहरा पाण्याने धुवून घ्या. मृत त्वचा जाऊन सतेजपणा येईल.
  • १ चमचा बेसनपीठ, चिमूटभर हळद, २-३ थेंब लिंबाचा रस आणि थोडं कच्चं दूध मिसळून लेप बनवा. काही दिवस पूर्ण शरीरावर याचा प्रयोग करा. त्वचा उजळेल.

कोरड्या त्वचेसाठी

  • १ मोठा चमचा तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा मध व १ छोटा चमचा अंड्याचा पांढरा भाग मिसळून लेप तयार करा. ५ मिनिटे लावून चेहरा धुवून घ्या.
  • मोठा चमचा चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून लेप तयार करा. मग चेहऱ्यावर १५-२० मिनिटे ठेवून हलक्या हाताने चोळून काढावे. चेहरा स्वच्छ धुवावा.
  • पिकलेलं केळ कुस्करून घ्या. त्यात थोडं मध व लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. ५-६ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहरा तर उजळतोच व सुरकुत्याही नष्ट होतात.
  • १ लहान चमचा बदाम पावडर, १ लहान चमचा साय, १ मोठा चमचा मसूर डाळीची पेस्ट, १/४ लहान चमचा गुलाब पाणी व काही थेंब तेस मिसळून पेस्ट तयार करा. ती चेहरा व पूर्ण शरीराला ही लावू शकता. नंतर अंघोळ करावी. याने त्वचा उजळून निघेल.

तेलकट त्वचेसाठी

  • १ मोठा चमचा जवाचे पीठ, १ मोठा चमचा सफरचंदाचा गर मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावून १०-१५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.
  • २ मोठे चमचे संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये थोडे कच्चे दूध आणि गुलाबपाणी घालून घट्ट लेप तयार करा. चेहऱ्यावर लावून थोड्या वेळाने चेहरा धुवून घ्या. त्वचा सतेज होईल.
  • १ मोठा चमचा दही व १ छोटा चमचा काकडीचा रस मिसळून १०-१५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. मग थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
  • १ मोठा चमचा चंदन पावडर, १ लहान चमचा कडूलिंबाची पाने, १ मोठा चमचा गुलाबाच्या पाकळ्या, १ लहान चमचा चोकर व चिमूटभर हळदपूड मिसळून पेस्ट बनवा व चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर थपथपवून हळू हाताने काढा व चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
  • १ मोठा चमचा जवाचे पीठ, १ मोठा चमचा बेसनपीठ, चिमूटभर हळद, ४-५ थेंब लिंबू रस व एक मोठा चमचा गुलाबजल मिसळून लेप तयार करा. ते चेहऱ्यावर किंवा शरीरावर लावा. वाळल्यांतर धुवून घ्या.

डागाळलेल्या त्वचेसाठी

  • २ मोठे चमचे साय, काही थेंब गुलाबपाण्यामध्ये, ताजी हळद वाटून मिसळा आणि चेहऱ्यावर काही दिवस रोज लावा. चेहरा नितळ होऊन डाग जातील.
  • १ मोठा चमचा कडूलिंबाची वाळलेली पाने, २ मोठे चमचे जवाचे पीठ, २ मोठे चमचे बेसनपीठ, २ मोठे चमचे मुलतानी माती, अर्धा चमचा मध व काही थेंब लिंबाचा रस मिसळून लेप तयार करून चेहऱ्यावर लावा. काही दिवस सतत प्रयोग केल्यास त्वचा स्वच्छ डागविरहित दिसू लागेल. ही पेस्ट बनवून आठवडाभर फ्रिजमध्ये ठेवू शकता.
  • दूधामध्ये चिमूटभर हळद, गव्हाचे पीठ व काही थेंब तेल घालून पेस्ट बनवून घ्या. हे हातपाय तसेच चेहऱ्यावर चोळून लावा. वाळल्यानंतर चोळून काढा. असे रोज केल्याने चेहरा उजळू लागेल.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें