प्रेग्नन्सीत मेकअपचे साईड इफेक्ट्स

* मिनी सिंह

सुंदर दिसण्यासाठी मेकअप करणे गरजेचे आहे. पण प्रेग्नन्सी किंवा गर्भावस्थेदरम्यान मेकअप करताना काळजी घेण्याची गरज असते, कारण ही अशी वेळ असते, जिथे तुम्हाला स्वत:कडे सर्वात जास्त लक्ष देणे गरजेचे असते. अशा अवस्थेत तुम्ही कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे ब्यूटी प्रोडक्ट्स बनविताना असे काही घटक वापरले जातात, जे तुमच्या त्वचेच्या आत जाऊन गर्भात वाढणाऱ्या बाळाला नुकसान पोहोचवू शकतात.

प्रेग्नन्सीत अशा सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळायला हवा :

डियो किंवा परफ्यूम

प्रेग्नन्सीदरम्यान जास्त सुवासाचे प्रोडक्ट्स जसे की डियो, परफ्यूम, रूम फ्रेशनर आदींचा वापर कमी करा किंवा करूच नका. बाजारात उपलब्ध बहुसंख्य डियोमध्ये हानिकारक केमिकल्स वापरली जातात, जी त्वचेच्या आत जाऊन तुम्हाला किंवा तुमच्या होणाऱ्या बाळाला नुकसान पोहोचवू शकतात. यामुळे बाळाचे हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात.

लिपस्टिक

याचा वापर प्रत्येक महिला आणि तरुणी करतेच. पण प्रेग्नन्ट महिलेने लिपस्टिक न लावणे हे आई आणि होणाऱ्या बाळाच्याही हिताचे ठरेल. लिपस्टिकमध्ये लेड असते, जे खाता-पिताना शरीरात जाते. ते भ्रुणाच्या पोषणासाठी घातक असते. त्यामुळे याचा वापर करणे टाळायला हवे.

टॅटू

आजकाल तरुणाईमध्ये टॅटूचा ट्रेंड आहे. प्रेग्नन्सीत किंवा त्यासाठी प्लॅनिंग करत असाल तर टॅटू शरीरावर गोंदवू नका, ते घातक ठरू शकते. कारण अनेकदा टॅटूमुळे इन्फेक्शन होऊ शकते. टॅटूसाठी वापरले जाणारे केमिकल्स त्वचेसाठी सुरक्षित नसतात. म्हणूनच अशा नाजूक अवस्थेत टॅटू काढणे टाळावे.

सनस्क्रीन मॉइश्चराय

बऱ्याचदा महिला सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. मात्र प्रेग्नन्ट महिलांनी याचा वापर कमी करावा. शक्य झाल्यास बाहेर जाणे कमी करावे. बऱ्याच सनस्क्रीनमध्ये रॅटिनील पामिटेट किंवा व्हिटॅमिन पामिटेट असते. हे तत्त्व उन्हाच्या संपर्कात येताच त्याची रिअॅक्शन त्वचेवर होते. ते प्रदीर्घ काळ वापरल्यास कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. म्हणून गर्भावस्थेत सनस्क्रीन वापरण्यापूर्वी हे तपासून पाहा की तुम्ही जे सनस्क्रीन वापरणार आहात, त्यात ही दोन्ही तत्त्व नाहीत.

हेअर रिमूव्हर क्रीम

प्रेग्नसीदरम्यान हेअर रिमूव्हर क्रीम वापरू नये असे सिद्ध झाले नाही. पण यात थिओग्लायकोलिक अॅसिड आढळून येते जे गर्भावस्थेत हानिकारक ठरू शकते, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गर्भावस्थेत शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतात. त्यामुळे केमिकलयुक्त हेअर रिमूव्हर क्रीम वापरल्याने  त्वचेला अॅलर्जी होऊ शकते. शिवाय होणाऱ्या बाळालाही यामुळे नुकसान पोहोचू शकते. म्हणूनच स्वत:च्या आणि होणाऱ्या बाळाच्या सुरक्षेचा विचार करून याचा वापर करू नका. त्याऐवजी तुम्ही कोणतेही नॅचरल हेअर रिमूव्हिंग क्रीम वापरू शकता.

नखांची काळजी

प्रेग्नन्सीदरम्यान नेल प्रोडक्ट्स वापरू नका, कारण यात असलेले विषारी घटक होणाऱ्या बाळाला नुकसान पोहोचवू शकतात. एका संशोधनानुसार नेल केअर प्रोडक्ट्स निर्मितीशी संबंधित काम करणाऱ्या महिलांना गर्भावस्थेदरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागला. यातील अनेक महिलांच्या भ्रुणाचा विकास मंदावला होता तर काहींमध्ये जन्मानंतरही बाळाच्या विकासाचा वेग कमी होता.

फेअरनेस क्रीम

जर तुम्ही एखादी फेअरनेस क्रीम वापरत असाल तर अशा अवस्थेत ती वापरू नका, कारण ती तुमच्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठीही घातक ठरू शकते. यात हायड्रोक्यूनोन नावाचे एक केमिकल असते ज्याचा जन्माआधीच बाळावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गोरेपणा देणारी क्रीम प्रेगनन्सीदरम्यान अजिबात वापरू नका.

एका संशोधनानुसार, ज्या महिला प्रेगनन्सीच्या काळात खूप जास्त मेकअपचा वापर करतात, त्यांच्यात वेळेआधीच प्रसूती होण्याची शक्यता वाढते, म्हणजे प्रीमॅच्यूर बाळ. याशिवाय यामुळे बाळाचे वजन आणि आकारावरही परिणाम होतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें