वैवाहिक जीवनावर पोर्नचा परिणाम

* मोनिका अग्रवाल

जेव्हा स्त्री, पुरुष विवाह बंधनात बांधले जातात, तेव्हा त्यांच्या मनात सेक्सबाबत बरीच गुंतागुंत असते. अशावेळी पोर्नोग्राफीचा आधार घेणेच त्यांना योग्य वाटते. पण पुढे जाऊन याच आधाराचे व्यसन लागले तर निरोगी आणि सुखी वैवाहिक जीवनावर याचा दुष्परिणाम होऊ शकतो.

सेक्ससाठी जागृत करणे : मुलगा, मुलगी किंवा स्त्री, पुरुषाच्या यौन संबंधांवेळीच्या क्षणांचे फोटो किंवा व्हिडिओजना पोर्नोग्राफीचे नाव देण्यात आले आहे. हे सध्या सहज उपलब्ध आहेत. पण हे व्यसन आहे आणि तुम्ही व्यसनी बनत चालला असाल तर विचार करण्याची गरज आहे.

सहज उपलब्धता : सध्या इंटरनेट हा पोर्नबाबत माहिती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. गेल्या काही वर्षांची तुलना केल्यास सध्या तुमच्यासाठी येथे यासंदर्भात बरेच काही उपलब्ध आहे.

सेक्सोलॉजिस्टचे मत : सेक्सोलॉजिस्टनुसार, सेक्स लाईफ चांगले बनवण्यासाठी पोर्न साहित्य किंवा साईट्सचा वापर केला जात असेल तर याचा सेक्स लाईफवर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे वैवाहिक जीवनावर दुष्परिणाम होतो.

चुकीचे चित्रण : पोर्नोग्राफीचे साहित्य किंवा फिल्म माणसातील कामवासनेला चुकीच्या पद्धतीने दाखवते जे केवळ कल्पनेवर आधारित असते, पण सादरीकरण असे असते की पाहणाऱ्याचे मन आणि बुद्धीवर ते खोलवर परिणाम करते. एका संशोधनानुसार, पोर्नोग्राफी आठवडयातून फक्त एक तासापेक्षा कमी वेळेसाठी पाहिली जात असेल तर काळजीचे कारण नाही. पण दहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ पाहिली जात असेल तर पाहणाऱ्याची सेक्स लाईफ किंवा वैवाहिक जीवनावर याचा परिणाम झाल्याशिवाय राहात नाही.

वैवाहिक जीवनात पोर्नोग्राफी : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पोर्नोग्राफी पाहिल्यामुळे वैवाहिक जीवनात सेक्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पोर्नोग्राफीचे व्यसन लागलेला जोडीदार सेक्सची ती पद्धत आपलीशी करू पाहातो, जी तो पाहातो. यामुळे दुसऱ्या जोडीदाराकडून त्याला सेक्सबाबतची कमी जाणवते आणि त्याचा वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. अशा फिल्ममध्ये दाखवली जाणारी सेक्सची दृश्ये प्रत्यक्षातील सेक्सपेक्षा खूपच वेगळी असतात.

पती असो किंवा पत्नी, त्यांना आपल्या जोडीदाराकडून तितक्याच उत्तेजनेची अपेक्षा असते आणि ती नसेल तर आपसातील प्रेमाची भावना कमी होते. अशावेळी जे होते त्याला वासनेच्या श्रेणीत पाहाणेच योग्य ठरेल. कारण हे प्रेम न राहता केवळ शरीराची भूक ठरते.

दिल्लीच्या एका फर्ममध्ये काम करणाऱ्या सुनीलला पोर्न पाहण्याची वाईट सवय लागली. तो अनेकदा ऑफिसच्या मीटिंगदरम्यानही लॅपटॉपवर पोर्न साईट उघडून ठेवायचा. हे महिला कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी त्याची तक्रार केली. शेवटी त्याला नोकरी सोडावी लागली आणि उपचारासाठी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागली.

लैंगिक असमाधान : तुमचे जोडीदारासह भावनात्मक नाते नसेल तर याचा तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो. कारण कामवासनेचा हा प्रयत्न तो जोडीदाराऐवजी पोर्नोग्राफी माध्यमातील व्यक्तीसोबत करू लागतो, ज्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. पोर्नोग्राफीमुळे वैवाहिक जीवनात तणाव आणि लैंगिक असमाधान निर्माण होते आणि घटस्फोटापर्यंतची वेळ येते.

मानसशास्त्रज्ञांच्या मते त्यांच्याकडील ५० टक्के कौटुंबिक वादाच्या प्रकरणांत भांडणाचे मूळ जोडीदार पोर्न अॅडिक्ट असणे हे असते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार खूप जास्त पोर्न साईट्स पाहातो तर सावध व्हा आणि आपसात बोलून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा.

याबाबत सेक्सोलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या. पती-पत्नीला सेक्सबाबत चांगली आणि पूर्ण माहिती असेल तर पोर्नोग्राफीमुळे त्यांचे सेक्स लाईफ जास्त चांगले होऊ शकते. अट एकच, ते पाहायला मर्यादा हवी आणि जोडीदाराला त्याची सवय लागता कामा नये.

मुलांना वाचवा : आजकाल वयस्कर लोकांमध्येच नाही तर मुलांमध्येही ही समस्या पाहायला मिळते. ९ ते १५ वर्षांपर्यंतची मुलेही पोर्न अॅडिक्ट झाली आहेत. ९ वर्षांच्या एका मुलाला जेव्हा वर्गशिक्षकांनी अश्लील फोटोंसह पकडले, तेव्हा त्याने पोर्नचे व्यसन जडल्याने शाळेतील काही मित्रांकडूनच मिळालेल्या फोटोंबद्दल सांगितले. इंटरनेटवर अशा अनेक फिल्म पाहून नंतर डिलीट करता येतात, असा सल्ला एका मित्राने त्याला दिला होता. येथून सुरू झालेला हा प्रकार त्या धोकादायक वळणावर गेला, जिथे संधी मिळताच तो त्याच्याच घराशेजारील महिलांचे विवस्त्र किंवा अर्धनग्नावस्थेतील फोटो काढायचा. घरच्यांनी त्याचे समुपदेशन केले, तेव्हा त्याला पोर्नचे व्यसन जडल्याचे समजले.

सेक्सचे व्यसन

पोर्नचे व्यसन आणि सेक्सचे व्यसन या दोन वेगळया गोष्टी आहेत. सेक्सचे व्यसन जडलेला जास्तीत जास्त सेक्सची मागणी करतो पण कधीच समाधानी होत नाही तर पोर्नचे व्यसन लागलेला सतत पोर्न व्हिडिओ किंवा फोटो पाहातो. ज्याला सेक्सचे व्यसन असेल त्याला पोर्नचेही व्यसन असेलच असे नाही. हीच गोष्ट पोर्नचे व्यसन असलेल्यालाही लागू होते. अशावेळी गरजेचे आहे की सर्वप्रथम कोणते व्यसन जडले आहे ते शोधा. त्यानंतर त्यापासून वाचण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी पाऊल पुढे टाका.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें