ऐका आणि ऐकवादेखील…

* प्रीता जैन

‘‘प्रणव तुझी लखनौची जमीन कितीला विकली गेली, कोणी घेतली, कुठचा रहाणारा आहे, केव्हापर्यंत पैसे मिळतील?’’

तसंही प्रणव त्यांच्यापासून काहीच लपवून ठेवत नव्हता, परंतु आज अधिक काही सांगावसं त्याला वाटत नव्हतं. कारण दुसऱ्यांना प्रत्येक गोष्ट विचारायची आणि स्वत:बद्दल काहीच न सांगता. बस, एवढंच सांगायचं की सर्व काही ठीक आहे.

अशाप्रकारे अंजू आणि तिच्या बहिणीमध्ये गप्पा चालल्या होत्या. बोलता-बोलता अंजूच्या ताईने विचारलं, ‘‘तू काही बचत करतेस की नाही? काही दागिने घेतले आहेस का?’’

‘‘हो ताई, अविनाश दर महिन्याला बचतीच्या काही पैशाची एफडी माझ्या नावावर करतात. या व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी आम्ही सोन्याचा एक सेटदेखील विकत घेतला आहे.’’

‘‘तू सांग ना ताई तू कायकाय विकत घेतलंस?’’

‘‘अगं अंजू, तुला तर माहित आहे मी सर्व पैसे खर्च करून टाकते. आता तर माझ्याजवळ काहीच नाही आहे.’’

‘‘ताई, तू गेल्या महिन्यातच सोनाराकडे गेली होतीस आणि असं ऐकलंय की काही प्रॉपर्टीदेखील घेतली आहेस.’’

असं फक्त प्रणव वा अंजूसोबतच झालं नाही आहे तर अनेकांसोबत होतच असतं. काही अशा परिचितांशी बोलणं होतं जे समोरासमोर वा मग फोनवर वैयक्तिक गोष्टी माहीत करून घेण्यात तरबेज असतात. ते एवढी माहिती काढून घेतात की दुसरी व्यक्ती खरोखरंच त्रासली जाते आणि त्यांच्यामध्ये ही खासियत असते की स्वत:बद्दल ते जरासुद्धा काही सांगत नाहीत, उडवून लावतात.

अनेकदा तर दररोजच्या गोष्टी माहिती करून घेत राहतात. उदाहरणार्थ, आज तू काय जेवण बनवलंस? सर्व दिवस काय काय केलं? कोण आलं कोण गेलं? कुठे कुठे फोनवर बोललीस वगैरे वगैरे आणि हो, जर त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते सल्ला द्यायलादेखील लागतात की असं करायला हवं, तसं करायला हवं.

असं करणे योग्य आहे का?

एखाद्या समजूतदार व्यावहारिक व्यक्तीला जर तुम्ही त्याचं मत विचारलं तर त्याचं उत्तर असेल की हे करणे योग्य नाही आहे. दुसऱ्यांची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असते तेव्हा त्यांनी स्वत:बद्दलदेखील सांगावं अन्यथा कोणत्याही प्रकारची रुची घेऊ नये. जर दुसरी व्यक्ती स्वत:च्या इच्छेनुसार काहीदेखील सांगत असेल तर ते नक्कीच ऐकावं. परंतु प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची आणि सल्ला देण्याची सुरुवात अजिबात करू नये. जर ऐकावसं वाटत असेल तर स्वत:बद्दलदेखील सांगावं. यामध्येच स्वत:चा समजूतदारपणा तसंच मोठेपणा मानला जातो. आपापसातील नातेसंबंधांमध्ये स्नेह व जवळीक बनून राहते आणि आपापसातील संबंध अधिक दृढ व घनिष्ठ होतात.

त्यामुळे आता या गोष्टी लक्षात ठेवून वर्षानुवर्षे प्रियजनांचीसोबत मिळवून आनंदी जीवन जगा :

* प्रत्येकाचं स्वत:चं वैयक्तिक आयुष्य व गोष्टी असतात, कोणी कितीही जवळचं असलं तरी काही गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर केल्या जात नाहीत. त्यामुळे कोणाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट व बोलणं जाणून घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.

* कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीची माहिती दुसरीकडून माहिती करून घेण्याची सवय स्वत:ला लावून घेवू नका. असं केल्यामुळे आपणच आपली अव्यावहारिकता आणि मूर्खपणा दर्शवितो.

* नात्यांना खूप सांभाळून ठेवलं जातं. यांच्या आधारेच आयुष्यात प्रत्येक आव्हानाचा सामना केला जातो. म्हणून गरजेपेक्षा अधिक एकमेकांच्या गोष्टी वा वैयक्तिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका आणि ना ही कौटुंबिक प्रकरणांमध्ये सल्ला मागितल्याशिवाय देऊ नका. जर दीर्घकाळापर्यंत नात्यांमध्ये प्रेम व आपलेपणा ठेवायचा असेल तर आजूबाजूला विनाकारण लक्ष केंद्रित करण्याऐवजी, मी आणि माझं आयुष्य एवढयापर्यंतच विचार करा. यामध्येच सुख व आनंद आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें