मासिकपाळी आजार नाही

* प्रतिनिधी

पिरिएड्स म्हणजेच मासिकपाळीबाबत आपला समाज आजदेखील मोकळेपणाने बोलायला घाबरतो. याबाबत आजदेखील सर्वांच्या समोर न बोलण्याची गोष्ट समजली जाते. पॅड्स लपवून आण, मुलांना याबाबत सांगू नकोस आणि घरात यादरम्यान सर्वांपासून दूर रहायचं यासारख्या गोष्टी मुलीला शिकविल्या जातात.

पिरिएड्स तसं लपविण्यासारखी गोष्ट नाहीये. ही एक नैसर्गिक क्रिया आहे जी प्रत्येक स्त्रीला मासिकपाळीच्या रुपात येते. परंतु पिरिएड्सच नाव ऐकताच अनेकजणं ऐकून न ऐकल्यासारखं करतात जणू एखाद्या वाईट शब्दाचा वापर केलाय.

अनेक स्त्रियांच्या मनात पिरिएड्सबाबत अनेक समस्या, अडचणी, अनेक प्रश्न असतात, ज्याबाबत त्या मोकळेपणी बोलत नाहीत. आज आपला समाज आधुनिकतेकडे वेगाने चालला आहे, परंतु समाजाची मानसिकता अजूनदेखील जुन्या खुंटीला बांधलेली आहे. आजदेखील स्त्रियांना मासिकपाळीच्या काळात देवळात जाऊ दिलं जात नाही, लोणच्याला हात लावू दिलं जात नाही, वेगळी वागणूक दिली जाते. हे विचार बदलण्यासाठी आणि समाजाला जागरूक करण्यासाठी दरवर्षी २८ मेला वर्ल्ड मस्त्रुयल हायजीन डे साजरा केला जातो जो यावर्षी देखील अलीकडेच साजरा करण्यात आला.

मासिकपाळी कोणता आजार वा घाण नाही

वर्तमानपत्र, टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला विविध स्वरूपाची माहिती मिळू लागलीय ज्यामुळे समाजाच्या विचारसरणीत सुधारणा पहायला मिळतेय. पूर्वी जेव्हा टीव्हीवर सॅनेटरी पॅडची जाहिरात यायची तेव्हा चॅनेल बदललं जायचं. परंतु आता हे असं होत नाही. मात्र अजूनही लोक याबाबत मोकळेपणाने बोलत नाहीत. अगदी स्त्रियांदेखील याबाबत खाजगीत बोलताना दिसतात.

एकाच घरात राहत असूनदेखील पिरिएड्सला अनेक सांकेतिक नावानी संबोधलं जातं कारण एकच कोणाला समजू नये. पॅडला काळया प्लास्टिक वा पेपरमध्ये कव्हर केलं जातं. जणू काही एखादं प्राणघातक हत्यार लपवलं जातंय. लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे की मासिकपाळी कोणता गुन्हा नाहीये याउलट निसर्गाकडून स्त्रियांना मिळालेली एक अनमोल भेट आहे. अशावेळी त्यांच्याशी वेगळं वागण्यापेक्षा स्त्रियांची खास काळजी घेण्याची गरज आहे.

सॅनेटरी पॅडचा वापर किती सुरक्षित

पिरिएड्सच्या दरम्यान स्त्रियांच्या शरीरात विविध प्रकारचे बदल होतात, ज्याबाबत त्यांना माहीतच नसतं. जेव्हा पहिल्यांदा मुलींना पिरिएड्स येतात तेव्हा आईचं पाहिलं कर्तव्य म्हणजे याबाबत मोकळेपणाने बोलायला हवं. परंतु असं काही होत नाही. पिरिएड्सला फक्त लाजेत गुंडाळलं जातं. आजदेखील खेडेगावात स्त्रिया मासिकपाळीत फडकं वापरतात. काही स्त्रिया सॅनेटरी पॅड्सचा वापर करतात खऱ्या परंतु त्यांना योग्यप्रकारे वापर करता येत नाही.

सॅनेटरी पॅड्सचा वापर करणं खूप सहजसोपं आहे परंतु हे आजारालादेखील निमंत्रण देतं. खरंतर, सॅनेटरी पॅड्मध्ये डायोक्सीन नावाच्या पदार्थाचा वापर केला जातो. डायोक्सीनचा वापर नॅपकिन पांढरा ठेवण्यासाठी केला जातो. याचं प्रमाण जरी कमी असलं तरी हे तसं नुकसानदायकच आहे. ज्यामुळे अनेक आजार होण्याची भीती असते. जसं ओवेरियन कॅन्सर, हार्मोनल डिसफंकशन, म्हणून स्त्रियांनी यादिवसात ऑरगॅनिक क्लॉथच्या पॅड्सचा वापर करायला हवा, हे पॅड्स रुई आणि जूटने बनलेले असतात. वापर करण्यातदेखील आरामदायक असतात आणि पुन्हा स्वच्छ धुवून वापरता येतात. यासोबतच हे पर्यवारणाचं नुकसान करत नाहीत.

दीर्घकाल पॅडचा वापर धोकादायक

सॅनेटरी पॅडचा वापर केल्याने स्त्रियांमध्ये इन्फेक्शन आणि जळजळच्या तक्रारी साधारणत: आढळतात. या सर्व समस्या अनेकदा पिरिएड्स संपल्यानंतर आढळतात. जेव्हा अधिककाळ पॅड्सचा वापर केला जातो, तेव्हा यामुळे एयर सर्क्यूलेशन खूप कमी होतं आणि वेजाईनामध्ये स्टेफिलोंकोकास ओरियस बॅक्टेरियाची वाढ होते. हेच बॅक्टेरिया पिरिएड्सच्या काही दिवसानंतर एलर्जी वा इन्फेक्शनला कारणीभूत ठरतात.

पिरिएड्सच्या काळात स्वछता गरजेची

* पिरिएड्सच्या काळात दर चार तासानंतर पॅड बदलायला हवं.

* कॉटन पॅडचा वापर करावा.

* जर तुम्ही टेम्पोनचा वापर करणार असाल तर ते दर दोन तासांनी बदला.

* वेळोवेळी तुमच्या योनीची स्वच्छता करत रहा, यामुळे पिरिएड्सच्या काळात येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

* पिरिएड्सच्या काळात अनेकदा खूप वेदना होतात, म्हणून याकाळात कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे वेदनेपासून दिलासा मिळेल.

* पिरिएड्सच्या काळात टाईट वा लोवेस्ट पॅन्ट घालू नका.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें