होली स्पेशल- होळीची रंगत स्वादिष्ट पदार्थांसंगत…

* प्रतिनिधी

मावा कचोरी

साहित्य

* २-२ मोठे चमचे काजू, पिस्ता, बदाम आणि अक्रोडाचे तुकडे

* अर्धा लहान चमचा तूप

* १ कप खवा

* ४ मोठे चमचे साखर

* अर्धा लहान चमचा हिरवी वेलची पावडर

* थोडेसे केशर

* ५-६ तयार कचोरी

* साखरेचा पाक व ड्रायफ्रूट्स सजविण्यासाठी

कृती

एका नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता त्यामध्ये टाकून २ मिनिटं परता. आता त्यामध्ये खवा व्यवस्थित मिसळा. मग गॅसवरून खाली उतरवून त्यामध्ये वेलची पावडर, केशर आणि साखर घालून चांगलं मिसळून घ्या. मिश्रण थंड झाले की याचे लहान लहान गोळे बनवा आणि कचोरी फोडून त्यामध्ये भरा.

पाकाची कृती

एका पॅनमध्ये साखर आणि पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये वेलची पावडर आणि केशर मिसळून गॅस कमी करा. पाक थोडासा घट्ट झाला की गॅस बंद करा. कचोरी देताना त्यावर १ चमचा पाक टाका आणि थोड्याशा ड्रायफ्रूटने सजवून सर्व्ह करा.

 

रो खीर

साहित्य

* ५० ग्रॅम ताज्या गुलाबांच्या पाकळ्या

* २ लिटर दूध

* १ कप साखर.

कृती

एका जाड बुडाच्या भांड्यात दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या घेऊन उकळत ठेवा. जेव्हा दूध घट्ट होऊन निम्मं होईल तेव्हा गॅस कमी करून सतत ढवळत राहा जेणेकरून ते भांड्याच्या तळाशी लागणार नाही. आता यामध्ये १ कप साखर मिसळून विरघळेपर्यंत उकळत ठेवा. यानंतर दूध गॅसवरून उतरवून खाली ठेवा. अधिक थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. मग सर्व्ह करण्यापूर्वी यामध्ये काही गुलाबाच्या पाकळ्या टाकून थंडथंड सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें