आरोग्य परामर्श

* डॉक्टर ज्योती बाली, इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट बेबीसून फर्टिलिटी अण्ड आईवीएफ सेंटर

प्रश्न : माझं वय ४० वर्षे आहे. मला खूप जास्त वैजायनल डिस्चार्ज होतं. हे कंडिशन खूपच त्रासदायक वाटतं. असं का होतं आणि यावर उपाय शक्य आहे का?

उत्तर : सामान्यपणे रिप्रोडक्टिव्ह वयामध्ये वैजायनल डिस्चार्ज एक सामान्य समस्या आहे. तुमची स्थिती सामान्य नाही आहे. तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. दोन्ही स्त्रावाच्या दरम्यान योनीमध्ये खाज, जळजळ, पांढरा रंगाचं दाट डिस्चार्ज, स्किन रॅशेज, सूज, वारंवार लघवीला होणं आणि लघवी करतेवेळी वेदनेसारख्या समस्या निर्माण होतात. असामान्य योनी स्त्रावाची अनेक कारणे असू शकतात. जसे की, यौनसंबंधाच्या दरम्यान होणारं संक्रमण रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं व ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या योनीमध्ये फंगल इस्ट नावाचा संक्रमण रोग होऊ शकतो. स्त्रिया सुरुवातीला या समस्येकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे कधीकधी गर्भाशय कॅन्सर होण्याचीदेखील शक्यता निर्माण होते. तसंच सुरुवातीलाच याकडे लक्ष दिलं तर यावर उपचार केले तर निश्चितपणे ही समस्या बरी होऊ शकते. परंतु दुर्लक्ष वा बराच उशिराने उपाय केल्यानंतर गंभीर वा असाध्य रोगदेखील होऊ शकतो .

प्रश्न : माझं वय ३४ वर्षे आहे. मला वारंवार एंडोमिट्रीओसीसची समस्या होत असते. मी सर्जरीद्वारे रिमुव्हदेखील केलं आहे. परंतु पुन्हा एंडोमिट्रीओसीस सांगितलं जातंय. मला पिरियड्समध्ये अधिक स्त्राव तसंच वेदना होतात.

उत्तर : गर्भाशयात होणारी समस्या आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील थर बनवणारा एंडोमिट्रीयम लाइनिंगमध्ये असामान्य वाढ होऊ लागते आणि तो गर्भाशयाच्या बाहेर पसरू लागतो. कधी कधी एंडोमिट्रीयमचा थर गर्भाशयाच्या बाहेरच्या थरा व्यक्तीरिक्त अंडाशय, आतडे आणि इतर प्रजनन अंगांमध्येदेखील पसरला जातो. ज्याला एंडोमिट्रीओसिस म्हटलं जातं. मोठया एंडोमिट्रीयम थरामुळे प्रजनन अंगात जसं फेलोपियन ट्यूब, अंडाशयाच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. इंडोमिट्रीओसिस स्त्रियांमध्ये पिरीएडच्या दरम्यान अधिक ब्लीडिंग आणि वेदनेचं कारण देखील बनतं. यामुळे स्त्रियांना खूप त्रास होतो तर दुसरीकडे रिप्रोडक्टिव्ह वयामध्ये हे इन्फर्टिलिटीचं कारणदेखील बनतं. ही समस्या एखाद्या बाहेरच्या संक्रमणामुळे नसून शरीराच्या आंतरिक प्रणालीच्या कमतरतेमुळे होते. इंडोमिट्रीओसिसच्या अंडाशयापर्यंत पसरणाऱ्या या भागावरती सिस्टदेखील बनतं.

मेडिकल ट्रीटमेंटने आर्टिफिशियल मेनोपोजच्या माध्यमातून एंडोमिट्रीओसीसला रोखलं जातं. यासाठी हार्मोनल औषधं वा महिन्यातून एक इंजेक्शन पुरेसं असतं. याव्यतिरिक्त इंडोमिट्रीओसिसच्या समस्येने ग्रस्त रुग्णाला जर आई व्हायचं असेल तर यासाठी आययुआय आणि आयव्हीएफसारख्या स्पेशल ट्रीटमेंट आहेत. जर रुग्णाचे वय अधिक असेल आणि अनेक सर्जरी झल्या असतील तर गर्भाशय आणि ओवरीज काढून हिस्टरेक्टोमी याचा सर्वाधिक उत्तम उपाय आहे.

प्रश्न : मी ७ महिन्याची गर्भवती आहे. माझं वय २८ वर्षे आहे. जसजशी वेळ जवळ येतेय, प्रसुतीबद्दल विचार करून मी घाबरुन जाते. कारण मी असं ऐकलंय की प्रसुतीच्या वेदना खूपच असहनीय असतात. मला जाणून घ्यायचंय की मी पेनलेस डिलिव्हरी करू शकते का? या पद्धतीने प्रसुती केल्यानंतर माझ्या व माझ्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर कोणता दुष्परिणाम तर नाही ना होणार?

उत्तर : अलीकडे एपीड्यूरल एनेस्थेशियाद्वारे पेनलेस प्रसुती करणं खूपच सामान्य प्रक्रिया आहे. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत. तसंच मुलासाठी आणि आईसाठीदेखील या प्रक्रियेद्वारा प्रसुतीच्या असहनीय वेदनेपासून वाचू शकतात. या प्रक्रियेत एका छोटया कॅथेटरच्या मदतीने एपीड्यूरल आणि एनेस्थेशियाला लोअर बॉडीच्या एपीड्यूरल पार्टमध्ये टाकलं जातं. काही काळासाठी तुमचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. परंतु डॉक्टर आणि एनेस्थेशिया एक्सपर्टच्या देखरेखीखाली स्थितीला नियंत्रित केलं जातं.

प्रश्न : माझं वय ३८ आहे. मेडिकल तपासणीत माझ्या जननांगाच्या ट्यूबवर क्लोसिस आढळलं आहे. मला दुसरं मूल हवं आहे. परंतु अशा परिस्थितीत मी गर्भवती होणं शक्य आहे का? हा आजार माझ्या येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरतीदेखील परिणाम करू शकतो का?

उत्तर : गर्भाशय टीबी हा एक असा रोग आहे जो प्रामुख्याने स्त्रियांच्या जननांगांमध्ये जसं की अंडाशय, फेलोपियन ट्यूब, गर्भाशय, गर्भाशय ग्रीवा आणि योनी व श्रोनिच्या आजूबाजूच्या लिंफ नोड्सला प्रभावित करतो. हा रोग प्रामुख्याने स्त्रियांच्या रिप्रोडक्शन वयाच्या दरम्यान प्रभावित करतो. अनेकदा वांझपणाचे कारण बनतं. जेनाईटल टीबीचा उपचार दोन स्तरावर केला जातो. पहिला स्तरांमध्ये दोन महिन्यापर्यंत कमीत कमी तीन अँटीटीबीच्या औषधांसोबत तसंच दुसऱ्या स्तरांमध्ये चार ते दहा महिन्यासाठी कमीत कमी दोन अँटीटीबीच्या औषधांसोबत कायम उपचार चालू राहतो आणि जेनाईटल पार्टमध्ये सर्जरीद्वारा उपचार केले जातात. उपचाराच्या दरम्यान तुम्हाला देण्यात आलेल्या सूचनांचं योग्य प्रकारे पालन करा. याच्या उपचारानंतर एआरटी तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करू शकता. परंतु तुम्हाला पूर्णपणे डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये हे करावं लागणार.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें