क्विक हेअरस्टाइलने दिसा स्टायलिश

* ललिता गोयल

पार्टीला जायचे असेल किंवा मग डेटवर, आपल्याला कळत नाही की, केसांना स्टायलिश लुक कसा द्यावा. कारण प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन हेअरडू करणे शक्य नसते. अशा वेळी लुक चेंज करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे, हेअरस्टाइलमध्ये बदल करणे, केसांना डिफरंट लुक देणे, यालाच हेअर स्टायलिंग म्हणतात आणि वेगवेगळया प्रसंगी वेगळी हेअर स्टाइल करणे प्रत्येकाला आवडते.

तरुणी आणि महिलांची हीच आवड लक्षात घेऊन दिल्ली प्रेस भवनमध्ये आयोजित फेब मिटिंगमध्ये ब्यूटिशियन, तसेच हेअर स्टायलिस्ट परमजीत सोईने काही अशा क्विक हेअरस्टाइल बनविण्याच्या पद्धती सांगितल्या. त्यामुळे तुमच्या लुकमध्ये फरक तर पडेलच, पण तुम्ही स्टायलिशही दिसू शकता.

ब्रायडल किंवा पार्टी हेअरस्टाइल

ही हेअरस्टाइल ब्राइड आणि विवाहित तरुणींना शोभून दिसते. ही बनविण्यासाठी सर्वप्रथम केसांचा गुंता व्यवस्थित सोडवा. नंतर पुढच्या थोडयाशा केसांना सॉफ्ट लुकसाठी मोकळं सोडा आणि बाकी केसांचा बॅककोंब करत, स्प्रे करा. नंतर थोडे-थोडे केस घेऊन, लुप बनवित एक अंबाडा बनवित जा. अंबाडयाची फायनल फिनिशिंग इनलिजिबल अंबाडयाच्या पिनने करा. नंतर ज्वेलरीला मॅचिंग ज्वेल्ड फ्लॉवर्स किंवा पिन लावा.

गर्लिश लुक हेअरस्टाइल

ही हेअरस्टाइल करण्यासाठी केसांना आयर्न रॉडने सरळ करा आणि पुढच्या केसांचा हलक्या हातांनी बॅक कोंबिंग करत पफ बनवा. जर पफ आवडत नसेल, तर बॅक कोंबिंग केलेल्या केसांना साइडने पिनअप करा. अशाप्रकारे हेअर स्टाइलला ज्वेल्ड पिन्सचा वापर करून स्टायलिश लुक देता येईल.

पफ विथ लेअर्स हेअरडू

अर्ध्यापेक्षा जास्त केस एका बाजूला घ्या आणि थोडे केस मोकळे सोडा. मागच्या केसांना कोंब करून, रबरबँडने वेणी घाला. पुढचे थोडे केस सोडून, बाकी केस मागे घेऊन, लेअर्समध्ये बॅककोंब करा. त्यानंतर कोंब करत पफ बनवा. फ्रंट लुकसाठी पुढचे थोडे-थोडे केस घेत ट्विस्ट करत पफला जोडत जा. मागील राहिलेल्या केसांचा फ्रेंच रोल बनवा आणि रफ केसांना बॅककोंब करा. सगळया केसांना नेंटमध्ये घ्या.

लो साइड बन

ही हेअरस्टाइल लांब केसांसाठी परफेक्ट आहे. ही हेअरस्टाइल बनविण्यासाठी इयर टू इयर पार्टिंग करा आणि मागे राहिलेल्या केसांची रबरबँडच्या मदतीने पोनीटेल बनवा. त्यानंतर, रबरबँडच्या जागी स्टफिंग ठेवून, अंबाडयाच्या पिनने लॉक करा. नंतर पोनीटेलच्या केसांचे चार भाग करा आणि सॉफ्ट बॅककोंबिंग करत, ब्रशने व्यवस्थित करत जा. मग लुप बनवून बन अंबाड्यात फिक्स करत जा व बनचा लुक द्या.

त्यानंतर जर फोरहेड ब्रॉड असेल, तर पुढच्या केसांना फोरहेडवर असे सेट करा, ज्यामुळे फोरहेडचा ब्रॉडनेस कमी दिसेल. उरलेल्या केसांना मागील केसांच्या बनखाली सेट करा. शेवटी बन रेड रोजने एक्सेसराइज करून, फिनिशिंग टच द्या.

मॅसी ब्रेड लूक

सर्वप्रथम केसांचे हॉट आयर्न रॉडच्या मदतीने टॉग्स बनवा. नंतर टॉग्सला बोटांच्या मदतीने सॉफ्ट करा. मग साइडने पार्टिंग करत, पुढच्या थोडया केसांना सोडा आणि सेंटर ऑफ द हेअरमध्ये मॅसी ब्रेड बनवा, तसेच ब्रेडला थोडे लूज करा. असेच मागच्या केसांचेही अनेक ब्रेड बनवा आणि त्यांनाही लूज करत जा. ब्रेड बनविताना थोडे केस सोडा. पुढच्या केसांना वेगवेगळे स्ट्रिंग देत कर्ल करा आणि केसांना हलकेसे ट्विस्ट करा. मागे बनलेल्या सर्व ब्रेडची नॉट बांधा व पिनअप करून सेट करा. नंतर छोटया-छोटया फुलांनी एक्सेसराइज करा.

स्टायलिंग प्रॉडक्ट हेअर स्प्रे

कोणतीही हेअरस्टाइल वा हेअरडू करताना, हेअर स्प्रेचा पुन्हा-पुन्हा वापर केला जातो. हेअर स्प्रे हेअरस्टाइल करताना आवश्यक आहे का? हा प्रश्न बहुतेक महिलांच्या मनात निर्माण होतो. हो, हेअरस्टायलिंग करताना हेअर स्प्रे खूप महत्वाची भूमिका निभावतो. कारण हेअर स्प्रेच्या मदतीने हेअर स्टाइल दीर्घ काळापर्यंत जशास तशी ठेवता येईल. हेअर स्प्रेमुळे केसांना शाइन येण्याबरोबरच ते सॉफ्टही होतात. त्याचप्रमाणे, आपल्या केसांना ज्या स्टाईलमध्ये सेट करायचे आहे, त्या स्टाइलमध्ये करण्यास हेअर स्प्रे आपणास मदत करेल. त्याचप्रमाणे, हेअर स्प्रे केसांना चिकट बनवित नाही, तसेच कलर केलेल्या केसांचे लेअर्स बनवितो. एवढेच नव्हे, तर तो सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षणही देतो. आपण आपल्या गरजेनुसार एसपीएफयुक्त हेअर स्प्रेची निवड करू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें