पदार्थांमध्ये असा जागवा स्वाद

* ज्योती मोघे

आपण काही खास प्रसंगी, सण-उत्सवांवेळी गोडधोड बनवतोच. पण कधी कधी किटी पार्टी किंवा न्यू इअर पार्टी किंवा मग काही खास पाहुणे येणार असतील तर अशा वेळीही गोडधोड बनविले जाते. पण ते बनवण्यापूर्वी काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवा, ज्यामुळे पदार्थांचा स्वाद तर खास होईलच, शिवाय सर्वच म्हणतील, व्वा, खूपच छान.

जेव्हा गोड बनवाल

* तांदळाची खीर बनवत असाल किंवा साबुदाण्याची, सर्वात आधी ते दुधात चांगल्याप्रकारे शिजवा. नंतर साखर घाला. अन्यथा तांदूळ किंवा साबुदाणा शिजणार नाही.

* लापशी बनवणार असाल तर सर्वप्रथम कढईत थोडे तूप घालून लापशी म्हणजे जाड रवा मंद आचेवर शिजवा. नंतर त्यात गरम पाणी किंवा गरम दूध घालून चांगल्याप्रकारे एकत्र करा. झाकण ठेवून वाफ येऊ द्या म्हणजे लापशी चांगली फुलेल. शेवटी साखर घालून मिश्रण नीट एकजीव करा. सतत हलवत राहा. गरमागरम आणि स्वादिष्ट लापशी सर्व्ह करा.

* फळांचा हलवा बनवणार असाल तेव्हा चवीनुसार साखर घाला. बहुतेक फळे गोड असतात. तुपाच्या प्रमाणाकडेही लक्ष ठेवा. जर गाजर, दुधी भोपळयाचा हलवा बनवत असाल तर दूध किंवा कंडेस्ड मिल्क घालताना साखरेचे प्रमाण कमीच ठेवा, कारण कंडस्ड मिल्क गोड असते.

* पाक ज्या पदार्थांसाठी तयार करणार आहात, त्या हिशोबानेच तो पातळ किंवा जाड करा. जसे की, लाडूसाठी एकतारी तर गुलाबजामून, जिलेबीसाठी दोन तारी पाक बनवा.

* गुलाबजामून बनवताना माव्याचे प्रमाण पाहूनच मैदा घ्या. त्यानंतर मैदा मिसळा. अन्यथा चव बिघडण्याची भीती असते.

* करंज्या बनवताना त्यात मिसळला जाणारा मावा अर्थात खोबऱ्याचे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्या. त्यामुळे अधिक दिवस ठेवले तरी त्यात दुर्गंधी येणार नाही. करंज्यांची पारी व्यवस्थित बंद करा, म्हणजे ती फाटणार नाही. करंज्या सुकू नयेत म्हणून त्यावर ओला कपडा घाला.

* गोड पदार्थ बनवताना तूप वापरा. यामुळे त्याची क्वॉलिटी टिकून राहाते.

* कस्टर्ड बनविताना थोडेसे गरम दूध वेगळया वाटीत काढून त्यात कस्टर्ड पावडर घाला. अन्यथा गुठळया होतील. उकळत्या दुधात कधीच कस्टर्ड पावडर घालू नका.

* पाकाचा चिवटपणा काढण्यासाठी त्यात जरासे दूध घाला. यामुळे चिकटून राहिलेले वर येईल. गुळाच्या पाकासाठी गुळ कमी लागतो आणि साखरेच्या पाकासाठी साखर जास्त लागते.

* गोड पदार्थ बनवण्यासाठी वेलचीची पूड करून ठेवा. कडक झाल्याने वेलचीची पूड होत नसेल तर ती तव्यावर गरम करा किंवा त्यात साखर घालून मिक्सरवर बारीक करा.

* केसर दुधात घालून ठेवा. गुळ बारीक करून ठेवा. साखर साफ करून ठेवा.

* पिठी साखर नसेल तर साखर बारीक करून वापरता येईल.

चटपटीत पदार्थ बनविताना

* सर्वप्रथम मसाल्याच्या डब्यात लाल मिरची पावडर, धने पावडर, हिंग, हळदीची पावडर वाटून, गरम मसाला, राई, जिरे, मेथी दाणा, कलोंजी, बडीशेप इत्यादी सर्व नीट भरून ठेवा. यामुळे पदार्थात या वस्तू प्रमाणानुसार घालणे सोपे होईल. पाणी आणि तेलाचे प्रमाण पदार्थानुसार ठेवा. अन्यथा पदार्थाची चव व पौष्टिकता नष्ट होऊ शकते.

* लापशीचे पीठ नरम मळा. लापशी पाणी शोषून घेते. मैदा कडक मळा. तो पाणी कमी शोषून घेतो आणि नरम पडतो. मैदा सैलही होतो.

* पदार्थ कुरकुरीत कराये असतील तर मोहन करण्यासाठी थोडे गरम तेल वापरा. यामुळे पदार्थ कुरकुरीत आणि चविष्टही होईल.

* गोड, तिखट पदार्थ बनवताना चमचे वेगवेगळे ठेवा, म्हणजे ते एकत्र होणार नाहीत.

* भाजी पातळ झाल्यास त्यात किसलेला नारळ किंवा शेंगदाण्याचे कुट घाला. मीठ जास्त झाल्यास त्यात बटाटा कापून घाला.

* पुलाव बनवताना तांदूळ कसा आहे ते पाहूनच पाण्याचे प्रमाण ठरवा. नाहीतर तो चिकटू किंवा करपू शकतो.

* कोथिंबीर नीट स्वच्छ, बारीक करून उपमा, पोहे, पुलावात घातली तर पदार्थाची चव वाढते.

* तिळाचे पदार्थ बनवताना तीळ नीट निवडून घ्या. त्यात बारीक दगड असतात, जे पदार्थाची चव बिघडवतात.

* बेसनची पापडी बनविताना त्यात थोडा मैदा घाला आणि अरबी नीट उकळून, सोलून, स्मॅश करूनच मळा. त्यामुळे पापडी फाटणार नाही.

* मठरी बनविताना त्यात थोडा सोडा घाला. त्यामुळे ती कुरकुरीत होईल. शेव बनवताना ओवा वाटून घाला. यामुळे चव वाढेल.

* पदार्थ तळताना तेल वर उडते. काळजी घ्या.

गार्निश कसे करावे

पदार्थ सर्व्ह करताना अशाप्रकारे सजवा की पाहूनच खायची इच्छा होईल. गोड पदार्थांचे गार्निशिंग नारळ किसून, सुकामेव्याचे काप भुरभूरवून करा. चटपटीत पदार्थांचे गार्निशिंग कडिपत्ता, हिरवी चटणी, गोड चटणी किंवा दह्याने करता येईल.

कुकिंग करताना छोटया छोटया गोष्टींकडे लक्ष द्या. ज्यामुळे तुमच्या पदार्थांची चव सर्वांच्या कायम लक्षात राहील.

बहुसंख्य महिला कुकरी शो पाहतात किंवा वर्तमानपत्रात पदार्थ बनवण्याची कृती वाचतात. कधी कधी कुकिंगचे काही शब्द समजून घेणे अडचणीचे ठरते. कुकरीची भाषा समजून घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण माहिती देत आहोत.

डीप फ्राय करणे : पदार्थ बनविताना तो तेल किंवा तुपात तळणे, जसे कचोरी, समोसे इत्यादी.

ब्लांच करणे : भाजी उकळून लगेच थंड पाण्यात टाकणे म्हणजे ब्लांच करणे.

चर्न करणे : मिक्सरमध्ये दह्याची लस्सी किंवा ज्यूस बनवणे म्हणजे चर्न करणे.

प्युरी बनवणे : टॉमेटो, कांदा किंवा एखाद्या फळाचे तुकडे करून मिक्सरला लावून पेस्ट बनवणे म्हणजे प्युरी तयार करणे.

मॅरिनेट करणे : एखाद्या खाद्यपदार्थाला एखादी गोष्ट लावून ठेवणे जसे, कारल्याला मीठ लावून ठेवणे, पनीर टिक्का बनवताना त्याला दह्याचे मिश्रण लावून ठेवणे किंवा मुळयाला मीठ लावून ठेवणे म्हणजे मॅरिनेट करणे.

कोटिंग करणे : एखादा खाद्यपदार्थ तयार झाल्यानंतर तो पाकात बुडवणे म्हणजे कोटिंग करणे.

बीट करणे : एखादा खाद्यपदार्थ फेटणे किंवा एका मोठया चमच्याच्या मदतीने दहीवडयाच्या डाळीचे मिश्रण फेटणे म्हणजे बीट करणे. यामुळे पदार्थ स्पंजी आणि चवदार होतो.

बॅटर : एखाद्या पदार्थासाठी तयार केलेले ओले पीठ. जसे इडलीचे पीठ, भजीचे पीठ, दहीवडयाचे पीठ इत्यादी.

चॉप करणे : भाजीचे छोटे छोटे तुकडे करणे जसे बटाटा, कांदा, वांगी इत्यादी.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें