सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

  • माझी त्वचा ऑईली आहे. मी हिवाळयात सनस्क्रीन लावणे योग्य ठरेल का?

ऋतू कोणताही असो, युवी किरणांचा परिणाम आपल्या त्वचेवर होतच असतो. अनेकदा उन्हापासून संरक्षण करायला सामान्य उपाय आपण अंगीकारल्यावर त्वचेवर त्याचा परिणाम होतो. यापासून वाचण्याचा एकच उपाय आहे की घराबाहेर निघण्याआधी सनस्क्रीन क्रीम अथवा लोशनचा वापर अवश्य करा. तुम्ही सनस्क्रीनचा वापर न करता तीव्र उन्हात गेलात तर त्वचा होरपळण्याची शक्यता १५ पट अधिक वाढते.

  • माझे वय २८ वर्ष आहे. मला घरातच पेडिक्यूर करायची कृती माहीत करून घ्यायची आहे?

पेडिक्योर करायला सर्वात आधी तुम्ही नेलपॉलिश काढा. त्यानंतर कोमट पाण्यात तेल किंवा बाथ सॉल्ट मिसळून त्यात पाय भिजवा तुम्हाला हवे असेल तर घरात असलेले शाम्पूसुद्धा वापरू शकता. आता पाय पाण्याबाहेर काढा आणि नेलकटरने ओल्या आणि नाजूक नखांना चौकोनी आकारात कापा. याने तुमच्या नखांचा आकार छान दिसेल. प्युमिकस्टोन तुमच्या पायांवर जिथे कडक त्वचा असेल तिथे घासा जेणेकरून अशी त्वचा निघून जाईल. त्यानंतर चांगल्या प्रतीचे फूट क्रीम आणि फूट स्क्रबने संपूर्ण पायाला मसाज करा. स्क्रब घरीसुद्धा बनवू शकता. यासाठी २ चमचे साखर, १ चमचा जैतुन तेल, १ चमचा मध, १ चमचा लिंबाचा रस आणि २ चमचे बाजारीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ एकत्र करून स्क्रबप्रमाणे वापरा. आता पाय एखाद्या स्वच्छ टॉवेलने पुसून कोरडे करा. आता तुम्हाला जे नेलपॉलिश आवडते ते लावा. पाय सुंदर आणि कोमल वाटू लागतील.

  • एलोवेराच्या पानांऐवजी ताजे एलोवेरा जेल रोज वापरले जाऊ शकते का? जर हो, तर याचे काय फायदे आहेत?

तुम्ही असं करू शकता. याने पिंपल्स आणि टॅनिंग नाहीसे होते. गळणारे केस आणि केसातील कोंडयापासून मुक्ती मिळते. हे नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यास तुम्हाला मदत करेल. हे एक उत्तम मॉइश्चरायजर आहे. कोणत्याही त्वचेच्या प्रकारात तुम्ही हे वापरू शकता. फक्त तुम्हाला याची अॅलर्जी होता कामा नये.

  • माझी नखं पिवळी दिसू लागली आहेत. मी यांची नैसर्गिक चमक परत कशी आणू?

नखांना चमकदार बनवण्यासाठी १ लहान चमचा जिलेटीन गरम पाण्यात टाका. पाणी थंड होऊ द्या. यात सिट्रिक ज्यूस टाका. नंतर नखं स्वच्छ करून पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि १५ मिनीटं हात यात टाकून ठेवा. यानंतर कापसाच्या बोळयाने पुसा. याने पिवळेपणा नाहीसा होईल. डिटर्जंट आणि साबणाच्या वापरानंतर नखांना रोज मसाज क्रीम लावा. क्रिम लावल्यावर कापसाने हळुवार पुसा. रात्री झोपण्याआधी कोणत्याही तेलाने हातांना हलका मसाज करा.

  • माझे वय २१ वर्ष आहे. माझ्या चेहऱ्यावर ५ वर्षांपासून अॅक्ने आहेत आणि कपाळावर काळपटपणा आला आहे. काही उपाय सांगा?

जेवणात जास्त स्निग्ध पदार्थ, खुप गोड, स्टार्च, मसाले यांचे प्रमाण मर्यादित ठेवा. फायबरयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करा. असे पदार्थ आपल्या जेवणात घ्या, ज्यात झिंक भरपुर प्रमाणात असेल. आंबट पदार्थ जसे लो फॅट दही भरपुर प्रमाणात खा. प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आणि आयोडीन मीठ कमी वापरा. रोज कमीतकमी ८-१० ग्लास पाणी प्या. शक्य तितके त्वचेला ऑयली होऊ देऊ नका. केसांना स्वच्छ ठेवा, अॅक्नेसाठी हर्बल साबण वापरा, ज्यात सल्फर असेल. त्वचेला चांगले धुवा, परंतु जास्त चोळू नका. जास्त चोळल्यास अॅक्ने पसरतात. पोटॅशियमयुक्त केळाचे साल खूपच पररिणामकारक असते. हे चेहऱ्यावर चोळल्यास ना केवळ डाग नाहीसे होतील तर ओपन पोअर्ससुद्धा हळूहळू भरू लागतील.

  • बदलत्या ऋतूमुळे माझे पाय खूप ड्राय होत आहेत. खरंतर मी मॉइश्चरायजर लावते कृपया काही घरगुती उपाय सांगा, ज्याने माझ्या पायाची त्वचा नैसर्गिक उपायांनी मुलायम होईल?

पायांची स्वच्छता नियमित करायला हवी. यासाठी तुम्ही  स्वच्छतेशिवाय पेडिक्योरसुद्धा करू शकता. एका स्वच्छ टबमध्ये कोमट पाणी टाका. त्यानंतर आपल्या आवडीचे क्रीम किंवा मीठ या पाण्यात टाका. तुमच्या पायाची त्वचा रुक्ष आहे, म्हणून त्यात ऑलिव्ह ऑइलसुद्धा टाकू शकता. मिठाने पायाची त्वचा मऊ पडते. ऑलिव्ह ऑइल एका मॉइश्चरायजरप्रमाणे काम करते. कमीतकमी १०-१५ मिनिटं पाय पाण्यात ठेवल्यावर बाहेर काढा. पायांच्या बोटांमध्ये साबण लागून राहणार नाही याकडे लक्ष ठेवा. या नंतर बॉडी स्क्रबरने स्क्रब करा. स्क्रब केल्यावर थंड पाण्याने पाय चांगले स्वच्छ करा. कोल्ड क्रीमने पायांना हळुवार मसाज करा.

  • माझे वय २२ वर्षं आहे. माझी त्वचा ऑयली आहे. मी माझ्या त्वचेनुसार कोणत्या प्रकारचे फेशियल करायला हवे?

ऑयली त्वचेसाठी  मॉइश्चरायजर आणि क्रीमयुक्त फेशियल अजिबात योग्य नसते. अशा त्वचेसाठी सगळयात आधी स्क्रबने क्लिंजिंग करा आणि नंतर टोनिंग. जर चेहऱ्यावरील पोअर्स फार मोठे असतील तर तुमच्यासाठी पर्ल आणि सिल्वर फेशियल सर्वात चांगले ठरेल

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें