६ लग्नाच्या पार्टीसाठी केशरचना

* गरिमा पंकज

लग्नाच्या पार्टीला जाण्यासाठी तयार होत असताना, प्रत्येक मुलीला वधूपेक्षा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्याची इच्छा असते. आपला पेहराव आणि केशरचना अशी असावी की लोकांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या पाहिजेत, असे तिला वाटते.

चला तर मग, आम्ही तुम्हाला काही सोप्या, पण आकर्षक केशरचनांबद्दल सांगतो ज्या तुम्ही लग्नाच्या पार्टीला जाताना करू शकता :

सॉफ्ट हेयर लुक

लग्नाच्या पार्टीत तुम्ही सॉफ्ट हेयर लुक ट्राय करू शकता. केसांना सारख्या भागांमध्ये विभागून मुलायम कर्ल तयार करा. तुम्ही टाँग रॉड किंवा स्ट्रेटनिंग रॉड वापरून कर्ल बनवू शकता. सर्व कर्ल तयार झाल्यानंतर, त्यांना बोटांच्या मदतीने थोडेसे सोडवा. अशाप्रकारे तुम्ही सॉफ्ट कर्ल बनवा. जर तुम्हाला सॉफ्ट कर्ल अधिक आकर्षक बनवायचा असेल तर तुम्ही समोरून साधीशी वेणीही घालू शकता.

यामुळे तुम्हाला खूप छान इंडो-वेस्टर्न लुक मिळेल. आता ताज्या फुलांनी केस सजवा. तुमच्या कुटुंबातील जवळचे लग्न किंवा पार्टीत जाण्यासाठी ही एक अतिशय सुंदर ट्रेंडिंग आणि सदाबहार हेअरस्टाईल आहे.

व्हिक्टोरियन बन

जेव्हा तुम्ही एखाद्या खास समारंभासाठी जात असाल, जसे की तुम्ही वधू किंवा वधूची बहीण किंवा वहिनी असाल तर तुम्ही अशा प्रकारची एखादी हेअरस्टाइल म्हणजे अंबाडा बांधू शकता. तो तुम्हाला समोरून योग्य स्लीक सेटिंग मिळवून देतो. समोरच्या बाजूस बोटांनी सेटिंग करून तुम्ही तो अधिक आकर्षक बनवू शकता. समोरच्या केसांची विभागणी समान भागात करून तुम्ही ते बोटांनी स्वाइप करा, जेणेकरून थोडासा भाग कपाळाच्या वर येईल.

प्रिन्सेस बँड

ही एक ट्रेंडी केशरचना आहे. वधूदेखील ती करू शकते आणि लग्नाच्या पार्टीला जाताना तुम्हीही ती करू शकता. यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वेणी घातली जाते. तुम्ही तुमच्याच केसांनी ती करू शकता किंवा गंगावनही लावू शकता. तुम्ही डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अतिशय सुंदर पद्धतीने ही स्टाइल करा आणि नंतर बोटांनी हळूवारपणे ती उघडा.

अशी केशरचना खूप ट्रेंडी लुक मिळवून देते. तुम्ही सुंदर फुलांनी वेणी सजवू शकता. यामुळे ती आणखी सुंदर दिसेल. त्यासाठी तुम्ही गुलाब, जिप्सी फुले किंवा कार्नेशन वापरू शकता.

रिंग्लेट बन

ही केशरचना हॉलंमधील सोहळयाला जाण्यासाठी योग्य आहे. तुम्ही वधू असाल, कॉकटेलला जात असाल किंवा साखरपुडयाला जात असाल, ही हेअरस्टाईल तुम्हाला एक वेगळा लुक देईल. लेहेंग्यासोबत ती खूप सुंदर दिसते. यामध्ये प्रत्येक बाजूने बोटांनी रफ टेक्सचर दिलेला असतो. रफ टेक्सचरनंतर स्प्रेच्या मदतीने केस बांधले जातात. मागे राहिलेल्या केसांची बनच्या स्वरूपात रिंग बनवतात. याला कॉईन सेटिंग म्हणतात, ज्यामध्ये नंतर मणी लावले जातात आणि केस सेट केले जातात. बोटांच्या सेटिंगसह फ्रंट सेटिंग करा. रिंग सेटिंगसह बनमध्ये लहान भागांमध्ये केस घ्या आणि त्यांना सेट करा.

नैसर्गिक कर्ल आणि वेवस

यामध्ये अनेक आकर्षक वेवस आणि मुलायम कर्ल तयार करा. नंतर सेंटर पार्टिंग ऐवजी साइड पार्टिंग करा. साइड पार्टिंग करून, केस एका बाजूला सोडून दुसऱ्या बाजूला पिन लावा आणि अॅक्सेसरीज अतिशय सुंदरपणे लावून हायलाइट करा. जर तुम्ही भरजरी पोशाख परिधान करणार असाल आणि तुम्हाला तुमचे केस कमी करायचे नसतील तर अशा प्रकारे तुम्ही खूप चांगला समतोल साधू शकता आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये नैसर्गिक लुक देऊ शकता.

हाफ बँड बन

तुम्ही ही केशरचना अतिशय आरामात आणि सुंदरपणे कॅरी करू शकता. मागच्या बाजूला पफ करून थोडा व्हॉल्यूम द्या. मध्यभागी पफ करून व्हॉल्यूम द्या. समोर एक वेणी घाला जी सैल असावी. ही वेणी ३ बटांची नसून २ बटांची असते. तिला ट्विस्ट वेणी असेही म्हणतात. वळणाच्या वेणीसह, ती हळूवारपणे उघडा, जेणेकरून कपाळाच्या बाजूला एक व्हॉल्यूम येईल, जो इंग्लिश लुक देईल.

जेव्हा तुम्ही एखाद्या सोहळयाला जात असाल जिथे तुम्ही अंबाडा कॅरी करू शकत असाल तर तुम्ही ही हेअरस्टाईल उत्तम प्रकारे कॅरी करू शकता. ही दिसायला खूप साधी आणि सुंदर आहे आणि करायलाही सोपी आहे. सुगंधित फुलांसोबत ती अधिक छान दिसेल.

(हा लेख मेकअप आर्टिस्ट आणि स्टार अकादमीच्या संचालक आश्मीन मुंजाल यांच्याशी झालेल्या संभाषणावर आधारित आहे.)

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें