लठ्ठपणा तुम्हाला ओझं वाटतोय का?

* शैलेंद्र सिंह

उत्तर प्रदेशात प्रयागराज शहरात राहणारी वर्निका शुक्ला स्वत:ला उत्तर प्रदेशातील पहिली प्लस साईज मॉडेल म्हणवून घेते. तिने राष्ट्रीय स्तरावरील अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. ती मॉडेलिंग करते आणि यासोबतच ती सिंगल मदर्ससाठी ‘मर्दानी द शेरो’ ही संस्थासुद्धा चालवते. ती टीचर आहे. ती इतके काम करते की तिच्याकडे पाहून कोणीही असे म्हणू शकत नाही की प्लस साईज सुंदर नसते.

प्लस साईजच्या बाबतीत फॅशनजगत बदललेले आहे. वर्निका सांगते की अलीकडे फॅशन वीकमध्ये प्लस साईजचा एक वेगळा राउंड असतो. फॅशन क्षेत्रात अशी अनेक दुकानं असतात, ज्यात प्लस साईज कपडे मिळतात. अशा कपडयांसाठी प्लस साईज मॉडेलची गरज असते. त्यामुळे प्लस साईजमुळे चिंतीत व्हायची आवश्यकता नाही.

साईज नाही मानसिकता बदला

समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. यात अनेक लोक असे असतात जे लठ्ठ असूनही आपले काम चांगल्याप्रकारे करत कार्यरत असतात आणि काही असेही असतात, जे तेवढे लठ्ठ तर नसतात पण उगाच चिंतित असतात.

सायकोथेरपीस्ट नेहा आनंद मानतात, ‘‘लठ्ठपणा ही एक मानसिक समस्या आहे. जर तुम्ही असेच मानू लागलात की तुम्ही लठ्ठ आहात आणि कोणतेच काम करू शकत नाहीत तर खरेच काहीही करू शकणार नाही. जर तुम्ही तुमचे खाणेपिणे व्यवस्थित ठेवून व व्यवस्थित व्यायाम करून शरीराला तंदुरुस्त ठेवत असाल तर लठ्ठपणा कधीच तुमच्या मार्गातला अडथळा ठरणार नाही.’’

याबाबत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की फॅट्सची शरीराला आवश्यकता असते. हे शरीराच्या बायोलॉजिकल कार्यांमध्ये विशेष भूमिका निभावते. फॅट्सची एक सूक्ष्म रेखा असते. जर लठ्ठपणाची ही सूक्ष्म रेखा पोटाच्या आसपास भेदून जात असेल तर धोका वाढतो. मुलींनी आपली वेस्टलाइन ३५ इंचांपेक्षा कमी आणि मुलांनी ती ४० इंचांपेक्षा कमी ठेवायला हवी.

फॅट्स नियंत्रणात ठेवणारा आहार घ्या

पोट भरावे म्हणून खाऊ नका. खाताना हे लक्षात ठेवा की आहार असा असावा, ज्यामुळे शरीराला चांगल्या प्रमाणात कॅलरी मिळू शकतील. काही पदार्थ असे असतात की ते खाल्ल्याने पोट भरते पण योग्य प्रमाणात कॅलरी मिळत नाही. केवळ फॅट्स वाढतात. जितक्या कॅलरीज तुम्ही अन्नाद्वारे घेता तेवढया बर्न करायला तेवढी मेहनतसुद्धा करावी लागते. एका शरीराला १६०० कॅलरीजची गरज असते. जर काम कमी करत असाल तर १००० ते १२००  कॅलरीज घ्यायला हव्या. आक्रोड, बदाम, राईचे तेल आणि डाळी यात फॅट्स कमी करणारे पदार्थ आढळतात.

तळलेल्या पदार्थांच्या जागी भाजलेले मोड आलेले कडधान्य घ्या. याने पोटही भरते व शरीराला पौष्टीक घटकसुद्धा मिळतात. डाएट शेड्युलची आखणी करताना द्रव पदार्थांचासुद्धा समावेश करा. शहाळयाचे पाणी व मोसंबीचा रस यांचा जास्त वापर केल्यास फॅट्स वाढत नाहीत. फॅट्स कमी करायला एखाद्या स्लिमिंग सेंटरमध्ये जाण्यापेक्षा व्यायाम करा. लठ्ठपणा शरीराला मिळणाऱ्या आणि खर्च होणाऱ्या कॅलरीतील असंतुलन वाढवते.

व्यायाम न करणाऱ्यांमध्ये वा बसून काम करणाऱ्यांमध्येसुद्धा ही समस्या वाढलेली आढळते. अनेक लोक मानसिक तणावाखाली असताना जास्त जेवण घेतात. यामुळेसुद्धा लठ्ठपणा वाढतो. किशोरावस्थेत आलेला लठ्ठपणा नंतर टिकून राहतो. महिलांमध्ये काही शारीरिक बदल झाले तर लठ्ठपणा वाढतो. गर्भावस्थेत लठ्ठपणा वाढतो. शरीराचे अपेक्षित वजन उंचीप्रमाणे असावे, ज्यांमुळे शरीराची प्रमाणबद्धता सुंदर वाटेल. बॉडी मास हा शरीराचे योग्य वजन मोजायचा अचूक उपाय आहे. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) उंचीचा गुणाकार करून वजन किलोग्रॅमशी भागाकार करून मोजता येतो.

सेक्समध्ये बाधक नसतो लठ्ठपणा

अधिकांश लोकांचा असा ग्रह असतो की लठ्ठपणा सेक्समध्ये अडथळा आणतो. सेक्समध्ये समाधानी नसल्याने वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो. ज्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व त्याचा लठ्ठपणा बिघडवत नाही, अशा व्यक्तींकडे लोक आकर्षित होतात व त्यांना सेक्स करण्यात काही अडचण येत नाही. जर एखाद्याचा जोडीदार लठ्ठ असेल तर दुसऱ्याने त्याला सेक्स करण्यास उद्युक्त करायला हवे. सेक्सदरम्यान अशा क्रिया अवलंबायला हव्या, ज्यात लठ्ठपणा बाधा आणणार नाही. लठ्ठ व्यक्ती लवकर थकतात.

लठ्ठ स्त्रिया आणि पुरुषांच्या वेगवेगळया समस्या असतात. लठ्ठपणाला अगदी सहजतेने घेऊन सेक्स क्रियांमध्ये बदल करून त्याचा आनंद उपभोगता येऊ शकतो. लठ्ठ व्यक्तीला वाटत असते की ती आपल्या जोडीदाराला सेक्सबाबत समाधानी ठेवू शकत नाही. म्हणून आपल्या मनात न्यूनगंड न ठेवता आपल्या जोडीदाराच्या गरजा समजून घेऊन त्याला सहकार्य करायला हवे.

शरीर तसेच मनही फिट ठेवा

लठ्ठपणामुळे आपला जुना काळ आठवून तुलना करणे योग्य नाही. अनेकदा लोक आपले जुने फोटो पाहून असे म्हणत असतात की मी पूर्वी असा होतो. मी बारीक तर होतोच पण किती आकर्षक होतो. असे विचार नैराश्य आणण्यास मदत करतात. नेहमी आपण आपल्या लठ्ठपणाबाबतच विचार करत राहतो. अशी मानसिकता बरी नाही की मी २० वर्षांचा होतो तेव्हा शारीरिक आणि आकर्षक होतो.

शारीरिक आकर्षणच सगळे काही नाही

नेहा आनंद सांगतात, ‘‘केवळ शारीरिक आकर्षणच असणे जरुरी नसते. माणसाला स्वत:ला तेव्हा जास्त चिंतेत असल्यासारखे जाणवते जेव्हा त्याला लठ्ठपणाऐवजी मूर्ख समजतात. बाह्य सौंदर्याला जास्त महत्व देऊ नये. माणसातील शिस्त, मेहनत, काम करण्याप्रती निष्ठा हे गुण त्याला आकर्षक बनवत असतात.’’

१२० किलो वजन असलेल्या दिवाकरचे म्हणणे आहे, ‘‘माझा लठ्ठपणा पाहून डॉक्टर म्हणतात की मधुमेह व रक्तदाबापासून दूर राहण्यासाठी मी ६ महिन्यात २०-२५ किलो वजन कमी करायला हवे. असे असूनही मला असे वाटते की मी ५ तुकडे असलेला पिझ्झा ३-४ तासात संपवू शकतो. माझे असे मत आहे की आयुष्य फार छोटे आहे. ते आपण आपल्या पद्धतीने जगायला हवे. आपले आवडते पदार्थ खाणे सोडून वेडयाप्रमाणे बारीक होण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. जसे आहात तसेच आनंदी राहायला शिका.’’

दुसऱ्याशी तुलना करून स्वत:ला अस्वस्थ होऊ देऊ नका. काही लोक अस्वस्थपणामुळे नशेचे शिकार होतात. समाजापासून स्वत:ला वेगळे करून घेतात. जसे वय वाढते ही अस्वस्थता कमी होते, कारण व्यक्तीला वाटते की आता म्हातारे झाल्यावर काही फरक पडत नाही. उलट त्याला असे वाटू लागते की तो आणखीनच परिपक्व झाला आहे. त्याने स्वत:ला वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेतलेले असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें