बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट सलमान सोसाइटी चा ट्रेलर लॉन्च

* सोमा घोष

सध्या सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर सलमान सोसाइटी चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटाची तीन गाणी प्रेक्षकांच्या भेटिला आली आणि ती लोकांच्या पसंतीत उतरलीत. आज चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आला आहे.

ट्रेलर मध्ये खुप इमोशन, ड्रामा आणि कॉमेडीचीही किनार आहे. हा चित्रपट समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांवर भाष्य करतो. एकुन हा चित्रपट शिक्षणवर भाष्य करतो. ट्रेलरमध्ये लहानग्यांची शिक्षणासाठीची धड़पड़ लक्ष वेधुन घेते.

दिग्दर्शक कैलाश पावर आणि निर्मात्यांनी प्रयत्न केला आहे की हया भटक्या, अनाथ मूलांची व्यथा सर्वाना समोर यावी आणि हयावर प्रबोधन होऊनी मुलांना योग्य ते शिक्षण मिळावे.

अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप, शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केली आहे . ‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. चित्रपटाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यानि दिले असुन डीओपी फारूक खान आहेत. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.

चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पहुण्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

प्रजक्ता एंटरप्राइजेस निर्मित, अवंतिका  दत्तात्रय पाटील आणि विडियो पॅलेस प्रस्तुत सलमान सोसाइटी १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित होत असुन म्यूजिक वीडियो पॅलेसवर उपलब्ध आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें