ग्रीन कॉफीने करा त्वचेचे लाड

* शैलेंद्र सिंग

सुंदर कांती आपले सौंदर्य द्विगुणित करते. अशावेळी सुंदर दिसण्यासाठी सर्वात आवश्यक असते की त्वचा सुंदर असावी आणि त्वचा सुंदर असणे यावरही अवलंबून असते की तुमचा आहार कसा आहे. अनेक गोष्टी जसे अल्कोहोलचे सेवन त्वचेसाठी वाईट असते. जर भरपूर झोप घेत नसाल तर तेसुद्धा चांगले नाहीए.

पाणी, चहा आणि कॉफीचे त्वचेशी अतिशय जवळचे नाते आहे. यांच्या संतुलित सेवनाने त्वचेवर तेज येते. ग्रीन कॉफीच्या सेवनाने त्वचेची चांगली निगा राखली जाते. अशा वेळी याचे सेवन चांगले असते. यामुळे त्वचा सतेज दिसते.

ग्रीन कॉफी म्हणजे प्रत्यक्षात कॉफिच्या बिया असतात. यांचे एक वैशिष्टय आहे की या बिया भाजलेल्या नसतात. बीन्स भाजल्या तर यातील एका खास केमिकलचे प्रमाण कमी होते, ज्याला कोलोरोजेनिक अॅसिड म्हणतात. म्हणून ग्रीन कॉफी बीन्समध्ये साधारण कॉफीच्या तुलनेत जास्त कोलोरोजेनिक अॅसिड असते. हे अॅसिड तब्येतीसाठी खूप चांगले असते. लोक ग्रीन कॉफीचा वापर लठ्ठपणा कमी करणे, डायबेटीस, उच्च रक्तदाब, अझायमर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढा देण्यासाठी करतात. ग्रीन कॉफी वापरून त्वचेचे लाडही करता येतात. ग्रीन कॉफी अँटीएजिंगमध्ये सहाय्यक असते. त्वचा सुंदर दिसल्याने वाढते वयसुद्धा कळत नाही. ग्रीन कॉफी याबाबतीत सहाय्यक ठरते. याच्या सेवनाने वय वाढवायची प्रक्रिया मंदावते.

ग्रीन कॉफीच्या बीन्सचे कच्चेच सेवन केले जाते. त्यामुळे ग्रीन कॉफीत सामान्य कॉफीच्या तुलनेत कॅफिनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ही कितीही वेळा पिता येते. ग्रीन कॉफी त्वचेची निगा राखण्यात महत्वाची भूमिका पार पाडते. हे वजन कमी करण्यातही उपयोगी ठरते. ग्रीन कॉफी रंग आणि गुणवत्ता याबाबतीत साधारण कॉफीपेक्षा अगदीच वेगळी असते.

लॅक्मे ब्युटी पार्लर, लखनौच्या अनामिका सिंह राय म्हणतात, ‘‘ग्रीन कॉफीमध्ये असे घटक असतात, जे त्वचेला सुंदर बनवण्यात मदत करतात. त्यामुळे याचे सेवन करणाऱ्यांची त्वचेची काळजी घेण्याची विशेष गरज भासत नाही. ग्रीन कॉफीने वजनसुद्धा वाढत नाही, ज्यामुळे ही आरोग्यासाठीसुद्धा चांगली असते. पण साखर आणि दुधाविना याचे सेवन करणे लाभदायक असते.’’

ग्रीन कॉफीचे फायदे

* ग्रीन कॉफी भूक कमी करण्यासोबतच कॅलरीवरसुद्धा नियंत्रण ठेवते. ही वजन कमी करण्यास सहाय्यक असते.

* ग्रीन कॉफीचे सेवन केल्याने शुगर नियंत्रणात राहते. नियंत्रणात राहते. शुगर अर्थात मधुमेह हा असा एक आजार आहे, जो त्वचेला सर्वात जास्त प्रभावित करतो. ग्रीन कॉफीचे सेवन मधुमेहाला बरे करण्यात मदत करते.

* ग्रीन कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे ना केवळ त्वचा तरुण ठेवण्यात साहाय्य करतात तर ताण आणि नैराश्यापासूनसुद्धा दूर ठेवतात.

* ग्रीन कॉफी मेटॉबोलिझमचा रेट वाढवून शरीराची ऊर्जा वाढवण्यात आणि   पचनयंत्रणा ठेवण्यात मदत करते. यात भाजलेल्या कॉफीपेक्षा जास्त पोषक घटक असतात.

ग्रीन कॉफीचे वापर करण्याच्या योग्य पद्धती

* ग्रीन कॉफी उपाशी पोटी केव्हाही प्या. जेवण घेण्याआधी १-२ तास आधी ग्रीन कॉफीचे सेवन अतिशय लाभदायक असते.

* काही लोक ग्रीन कॉफीमध्ये दूध आणि साखर टाकून पितात. असे करणे टाळा.

* ग्रीन कॉफी मधात मिसळून पिणे लाभदायक असते.

* जेवणानंतर लगेच ग्रीन कॉफी घेणे धोकादायक असते.

* एका दिवसात २-३ कपांपेक्षा जास्त ग्रीन कॉफी पिऊ नका, कारण जास्त कॉफी पिणे त्वचेसाठी चांगले नसते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें