साडी ड्रेपिंगच्या हॉट स्टाइल

* विनीत छज्जर, डायरेक्टर, विनीत साडी

साडी ही एक अशी वेशभूषा आहे, जी पारंपरिक असूनही यात तुमचा लुक हॉटही दिसू शकतो. साडी सर्वांनाच शोभून दिसते. साडी नेसण्याची पद्धत प्रत्येक प्रदेशात वेगवेगळी असते. लहंगा, बटरफ्लॉय, जलपरी इ. प्रसिद्ध स्टाईल आहेत. साडी नेसण्याच्या या काही हॉट स्टाईल खालीलप्रमाणे :

तर मग सणासुदीच्या काळात पारंपरिक भारतीय लुक मिळवण्यासाठी यातील साडी ड्रेपिंगची तुम्हाला आवडेल ती पद्धत निवडा व उत्सवातील मौजमस्तीचा आनंद घ्या.

बटरफ्लाय साडी

बटरफ्लाय पद्धतीने साडी नेसणे थोडेफार निवी स्टाईलसारखेच असते. फक्त पदराचा फरक असतो. या स्टाइलमध्ये साडीचा पदर खूपच अरूंद केला जातो, ज्यामुळे शरीराचा मिडल र्पोर्ट दिसतो.

निवी साडी

निवी साडी नेसणं खूपच सोपे आहे आणि साडी नेसण्याची एक ठराविक पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही रोजच्या वापरात किंवा सणासुदीलाही साडी नेसू शकता. आंध्र प्रदेशात या निवी पद्धतीचा उगम झाला आणि आज पूर्ण भारतभरात ही प्रचलित स्टाइल आहे.

पॅन्ट स्टाइल

पॅन्ट आणि जेगिंगसोबत साडीला एक अनोखा लुक मिळू शकेल. ही लेटेस्ट फॅशन मुलींची आणि महिलांचीही आवडती फॅशन बनली आहे. सॉलिड पॅण्टसाठी तुम्ही प्रिंटेड साडी निवडू शकता. हे एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. यात तुम्ही खूपच सुंदर दिसाल.

मुमताज स्टाइल

पार्टीला जाताना रेट्रो लुकसाठी मुमताज स्टाइलहून सदर पर्याय असूच शकत नाही आणि तुमचा बांधा जर सुडौल असेल तर ही स्टाइल तुमच्यासाठी अगदी   योग्य पर्याय ठरेल.

लहंगा स्टाइल

ही साडी नेसण्याची एक आधुनिक पद्धत आहे, जी साडी आणि लहंग्याच्या रूपात दोन सुंदर भारतीय वेशभूषेचे मिश्रण करते. यात साडी लहंग्याप्रमाणे नेसली जाते आणि यासाठी निऱ्यांची मदत घेतली जाते. या स्टाइलमध्ये बहुंताशी पदर उलटा घेतला जातो. कोणत्याही खास उत्सवाच्या वेळी अशा स्टाइलने साडी नेसणे हा अगदी योग्य पर्याय आहे.

कुर्गी स्टाइल

ही एक खूपच वेगळी स्टाइल आहे. यात साडीच्या निऱ्या मागच्या बाजूला घातल्या जातात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चालता येते. यामध्ये पदर फ्रंट चेस्टवरून घेऊन मागे वळवून समोर खांद्यावर टाकला जातो. काखेतील नेकलाईनचा योग्य विचार करून हा पदर सेट केला जातो.

बंगाली स्टाइल

पारंपरिक लुकसाठी साडीच्या बाबतीत बंगाली पद्धतीच्या साडीला काही तोड नाही. यामुळे फक्त ग्रेसफुल लुक मिळतो असे नाही तर ही सांभाळणेसुद्धा जास्त कठिण नसते.

मराठी स्टाइल

नेहमीच्या साड्यांच्या पॅटर्नच्या तुलनेत ही स्टाइल खूपच वेगळी आहे. यासाठी  सहावार साडीऐवजी नऊवार साडी वापरली जाते. हल्ली परकर वापरला जात नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें