सुंदर दिसणे हा तुमचा हक्क

* भावना खाकर ‘भावू’

‘‘सुंदर मुली, तुझ्या लावण्यावरील मरगळ दूर सार, तुझे सौंदर्य घायाळ करणारे आहे, तू स्वत:ला सावर, अशी कशीही फिरू नकोस, नीटनेटका साजशृंगार करून तुझे सौंदर्य खुलव.’’

यात काहीच शंका नाही की, मेकअप करून स्वत:ला सुंदर ठेवल्याने तुमची प्रतिमा, तुमचे व्यक्तिमत्त्व आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. जास्त काही करू नका, फक्त पार्लरमध्ये जा आणि भुवया तसेच केस कापून घ्या आणि मग घरी येऊन आरशात स्वत:ला पाहा. तुम्ही स्वत:च्याच प्रेमात पडाल. तुम्हाला बाहेर जायचे असेल तर खूप नटून – थटून जाण्याऐवजी फक्त गडद रंगाची लिपस्टिक आणि काजळ लावा तसेच केस मोकळे सोडा.

सुंदर आणि आत्मविश्वासू

सौम्य मेकअप आणि महिन्यातून एकदा पार्लरला गेल्याने सर्वसामान्य दिसणारी महिलाही सुंदर आणि आत्मविश्वासू बनते. असे असेल तर नीटनेटके राहून आकर्षणाचा केंद्र बिंदू बनण्यात काय नुकसान आहे? हे देखील तितकंच खरं आहे की, पार्लरमध्ये जाण्याऐवजी घरगुती उपाय करूनही तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवू शकता.

महिलेने सौंदर्याप्रती जागरूक असणे, हे सुखी वैवाहिक जीवनाचे कारण ठरू शकते. संध्याकाळी पती थकून घरी परततो, तेव्हा त्याची नीटनेटकी, साजशृंगार केलेली पत्नी पाहून त्याचा सगळा थकवा निघून जातो. विचार करा, कंबरेला पदर खोचून, केसांचा घट्ट अंबाडा, मिरच्या, मसाले, फिनाईल आणि घामाचा वास घेऊन समोर उभी असलेली पत्नी पाहून पतीला बरे वाटेल का?

या कामासाठी फक्त 2 मिनिटे लागतात. आपले हात आणि चेहरा धुवा, केस विचरा. टिकली आणि डोळ्यांना काजळ लावा. बस, तुमचा साजशृंगार पूर्ण झाला. जेव्हा तुम्ही दररोज असा साजशृंगार करून तुमच्या पतीची मैत्रीण बनाल, जेव्हा सर्वजण तुमच्या अशा सुंदर राहणीमानाचे, साजशृंगाराचे कौतुक करतील तेव्हा तुमच्या पतीला तुमचा नक्कीच अभिमान वाटेल.

मुले काही कमी नाहीत

‘मिस्टर इंडिया’ ते ‘मिस्टर युनिव्हर्स’पर्यंत आता पुरुषही अशा स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळेच सध्याच्या काळातील ब्युटी पार्लरची वाढती संख्या आणि पुरुषांसाठी जीमची वाढती संख्या हे दर्शविते की, ते देखील स्वत:ला आकर्षक दिसण्याच्या प्रयत्नात मागे राहू इच्छित नाहीत, कारण आता मुलींनाही तीच मुलं आवडतात जी स्वत:ला सुंदर ठेवतात.

दाढीची स्टाईल, केशरचना, केसांचा रंग, कानात घालणे, पोनीटेल ठेवणे, कपड्यांमध्ये स्टाईल इ. इतकेच काय, आता मुलांना मॉइश्चरायझर्स, पौष्टिक क्रीम, आफ्टर शेव्ह क्रीम्स, लोशन, लिप बाम, सनस्क्रीन, हेअर क्रोम्स आणि हेअर जेलबद्दल माहिती आहे आणि ते हे सर्व वापरतात.

तुमच्या शरीरातील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग करणे, यामध्ये हात, पाय, काख आणि छातीच्या वॅक्सिंगचाही समावेश आहे. मुलांची त्वचा लक्षात घेऊन विविध प्रकारचे क्लीनअप आणि फेशियल केले जात आहे. त्यांचे हात-पाय स्वच्छ ठेवण्यासाठी काही महिन्यांच्या अंतराने ते मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करून घेत आहेत.

असे असेल तर मग आम्हा महिलांनीही सुंदर दिसायलाच हवं. तर मग तुम्ही कशाची वाट पाहात आहात? आपण आपला मोबाईलदेखील अपडेट करतो. हा तर आपल्या व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे.

सुंदर दिसण्याचे २० मंत्र

* सोमा घोष

  1. सौंदर्य ही एक मानसिक अवस्था आहे, जी आतून येते. जर तुम्ही विचार केला की आपण सुंदर आहोत तर तुम्ही नेहमीच सुंदर दिसाल. जसा तुम्ही स्वत:बाबत विचार कराल तशाच तुम्ही दिसाल. जर तुम्ही स्वत:ला स्वर्गातील परी समजत असाल तर तुम्ही स्वत:ला नक्की तसेच अनुभवाल.
  2. सकारात्मक मानसिकतेने सौंदर्य उजळते. गोरा रंग अथवा पिंगट केस याने कोणीच सुंदर दिसू शकत नाही. स्मिता पाटीलचे सौंदर्य आजच्या सगळया अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे. सुंदर दिसण्यासाठी गोरे असणे आवश्यक नाही.
  3. 3. साधे राहूनही सौंदर्य दिसते, कमी आणि लाईट मेकअपमध्येसुद्धा अनेक अभिनेत्री सुंदर दिसतात. अनेकदा सामान्य मेकअपमुळे तुमचे नाकडोळे उठून दिसतात. मेकअपपूर्वी आपल्या त्वचेला तयार करण्यासाठी प्रायमर लावायला विसरू नका, यामुळे मेकअप करणे सोपे जाते.
  4. 4. याशिवाय मेडिटेशन आणि योगा केल्यानेही सौंदर्यवृद्धी होते, कारण जितकी एखादी व्यक्ती तणावमुक्त असेल तेवढी तिची त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी वाटेल.
  5. सुंदर दिसण्यासाठी सध्याच्या काळात योग्य ग्रुमींग आवश्यक आहे. यात तुमच्या आयब्रोचा योग्य आकार, हेअरकट, फिगर योग्य असणे वगैरे सामील असते, कारण कोणत्याही कामात योग्य प्रेझेंटेबल महिलेलाच चांगली नोकरी मिळते. जर तिचे केस लांब असतील तर तिने आपल्या चेहऱ्यानुसार योग्य हेअरकट करण्याचा प्रयत्न करावा.
  6. याशिवाय हेअर कलर तुमचे वय आणि रंगानुरूप असावा.
  7. सौंदर्यासाठी तुमची त्वचा निरोगी असणे आवश्यक आहे आणि यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही शांत राहाता, ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. जर त्वचेवर डाग अथवा पिगमेंटेशनची समस्या असेल तर मेकअपने तुम्ही ते लपवू शकत नाही.
  8. जास्त हायपर झाल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. शरीरात अनेक समस्या जाणवू लागतात, ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. म्हणून वेळोवेळी स्वत:ला डिटॉक्स करण्यासाठी कारल्याचा रस प्यावा किंवा चेहऱ्याला बर्फ लावू शकता. सब्जा घातलेले पाणी प्यायल्याने त्वचा उजळते.
  9. व्हिटॅमिनयुक्त उत्पादने चेहऱ्यासाठी वापरल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा ताजीतवानी वाटते.
  10. चेहऱ्याच्या आकारानुसार मेकअप करा. जर चेहरा रुंद असेल, तर चेहऱ्याला कटुरिंग करणे आवश्यक असते. शाईन अजिबात लावू नका. शाईन लावल्याने चेहरा गुटगुटीत वाटेल. ज्यांचा चेहरा गुटगुटीत आहे अशांनी जास्त ब्लशऑन न लावता आपला चेहरा क्लीन ठेवला पाहिजे. अशा फेसकटसाठी केसांच्या काही बटा चेहऱ्यावर आणाव्या, जेणेकरून चेहऱ्याचे कटुरिंग होईल. याशिवाय लिपस्टिकसुद्धा हलक्या रंगांचा लावणे योग्य ठरेल.
  11. अशा आकाराच्या महिलांना आपल्या डोळयांना व्यवस्थित शेप द्यायला हवा, ज्यात लायनर, मस्कारा लावणे आवश्यक आहे.
  12. ज्यांच्या चेहऱ्यावर डाग असतील, त्यांनी बी बी आणि सी सी क्रीम वापरून पाहावे, ज्यामुळे डाग फिकट होतील.
  13. लिपस्टिकबाबत बोलायचे झाले तर नोकरदार महिलांसाठी मॅट फिनिश लिपस्टिक योग्य ठरते, या अलीकडे ट्रेंडमध्येही आहेत. ग्लॉसी लिपस्टिक जास्त करून ओठांवर पसरते, म्हणून त्याचा वापर टाळा.
  14. दिवसा ग्लॉस लिपस्टिक लावणे टाळावे. मॅट फिनिशिंग असलेल्या लाँग लास्टिंग लिपस्टिक बाजारात उपलब्ध आहे, त्यांचा वापर करावा.
  15. नेहमी स्किन टोनच्या हिशोबाने लिपस्टिक लावावा. डस्की स्किन टोन असलेल्यांना मरून, पिची अथवा ऑरेंज शेड चांगली दिसते. त्यांच्यावर गुलाबी लिपस्टिक खूपच वाईट दिसते. ब्लशऑनसुद्धा गुलाबी न लावता पिची असावे.
  16. गोऱ्या स्किन टोन वर गुलाबी लिपस्टिक आणि गुलाबी ब्लशऑन खूपच छान दिसते. अशा स्किन टोनवर गडद रंगाची लिपस्टिक लावल्यास चेहरा हार्श वाटतो.
  17. सावळया किंवा डस्की रंगावर ब्राऊन आय लायनर खूप छान दिसते.
  18. पिची क्रीम लिपस्टिक तुम्ही कोणत्याही वेळी किंवा मूडमध्ये लावल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येते. याशिवाय लाल रंगाची लिपस्टिक कोणालाही कोणत्याही वेळी सूट करते.
  19. दिवसा चमकणारे आयशॅडो खूप भयानक वाटतात. मॅट अथवा क्रेयॉन पेन्सिल टाईप आयशॅडो कोणतीही स्त्री लावू शकते, हे लावून थोडे स्मच केल्यास चेहरा सुंदर दिसतो, सॉफ्ट पिची कलर दिवसा नेहमी छान दिसतो. सध्या आय लायनरपेक्षा आय शॅडो लावण्याचा ट्रेंड आहे. मस्कारा आणि आयशॅडो डोळयांसाठी पुरेसे असतात. याने चेहरा नेहमी नाजूक वाटतो.
  20. म्यॅच्युअर महिलांनी कधीच चमकणारी आयशॅडो लावू नये, यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसू लागतात. मॅट फिनिश नेहमी छान दिसते. तरुण मुलींसाठी क्रिमी मेकअप जास्त चांगले असते. यामुळे चेहऱ्यावर निरागसता दिसते.

याशिवाय ओजस संदेश देते की स्वत:ला नेहमी तरूण आणि ताजेतवाने ठेवा, मेकअप कमीतकमी करा,    नेहमी खुश राहा, प्रेमाने वागा आणि सर्वांना प्रेम वाटा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें