गरम पेहरावांची निगा

– अर्चना सोगानी

महागाईच्या युगात लोकर व इतर गरम पेहराव वारंवार खरेदी करणं तसं शक्य होत नाही. अशावेळी आपले जुने लोकरीचे व इतर गरम पेहराव व्यवस्थित सांभाळून ठेवून ते पुन्हा वापरात आणता येतात. सादर आहे, थंडीच्या दिवसांत गरम कपड्यांची निगा राखण्याचे काही महत्वपूर्ण उपाय :

* रूईच्या रजईत नैसर्गिक ऊब निर्माण करण्यासाठी ती २-३ तास उन्हात ठेवा.

* मेंदी वा अत्तराचा उपयोग रजईतदेखील केला जाऊ शकतो. रूई पिंजतेवेळी हे रूईत टाकल्याने रजईत अधिक ऊब येते.

* नवीन रजई व उशा भरतेवेळी थोडासा कापूर टाकल्यास ढेकूण अजिबात होणार नाहीत.

* हिना, शमामा आणि मुख्वीना नावाच्या अत्तरांचा परिणाम गरम असतो. त्यामुळे हे लोकरीच्या कपड्यांवर लावल्याने शरीराला ऊब मिळते.

* लोकरीचे कपडे वूलमार्कने सुचविलेल्या डिटर्जंटनेच धुवावेत. जर लोकरीचे कपडे चुरगळले तर ते स्टीम बाथरूममध्ये ठेवावेत.

* लोकरीचे कपडे प्रेस करण्यासाठी स्टीम आयरनचा वापर करा.

* गरम कपडे वापरण्यापूर्वी ड्रायक्लीन करून घ्या अन्यथा ते मळामुळे फाटू शकतात.

* ओलसर वा दमट गरम कपड्यांना इस्त्री करू नका. असं केल्याने त्यांची चमक फिकी पडू शकते.

* गरम कपडे ब्लीच करू नका अन्यथा त्यांचा रंग उडू शकतो.

* लोकरीचे कपडे सुकवितेवेळी अस्तरची काळजी घ्या अन्यथा ते लटकू लागतील.

* लोकरीचे कपडे उलटे करून धुवा आणि सुकवा.

* दमट जागी गरम कपडे कधीच ठेवू नका अन्यथा ते खराब होऊ शकतात.

* लोकरीने विणलेलं स्वेटर हाताने धुऊ शकता परंतु शिवलेल्या लोकरीच्या कपड्यांना ड्रायक्लीन करून घ्या.

* लोकरीचे कपडे जाड टॉवेलमध्ये लपेटून त्यांचा ओलसरपणा कमी करून नंतर सरळ पसरवा.

* तुमच्या गरम कपड्यांवर कॉफी पडली आणि डाग पडले असतील, तर तुम्ही अल्कोहोल आणि पांढरं व्हिनेगर समप्रमाणात घेऊन डाग असलेला भाग त्यामध्ये बुडवा. नंतर डाग असणाऱ्या जागी थोडंसं घासून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. डाग निघून जाईल.

* जर गरम कपड्यावर तूप, सॉस वा ग्रीसचा भाग लागला तर ते चमच्याने खरडवा. त्यानंतर कपड्याला ड्रायक्लीन फ्ल्यूडमध्ये भिजवून हलकेसे रगडा. डाग गायब होतील.

* अंड, दूध वा शाईने लोकरीचे कपडे खराब झाले असतील तर व्हाइट स्पिरिटमध्ये एक कपडा बुडवून डाग रब करा. नंतर पांढरं व्हिनेगर वापरून धुवा.

* जर तुमच्या गरम कपड्यांवर अल्कोहोल पडलं तर ते त्वरित स्वच्छ कपड्याने पुसून गरम पाणी आणि सर्जिकल स्पिरिटने धुवा. अल्कोहोल निघून जाईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें