धर्म फूट पाडा राज्य करा

* हरिदत्त शर्मा

जर लोकांमध्ये भय आणि घृणेच विष भरलं तर त्यांना सहजपणे संघटित करता येतं. याचा नमुना आपण ३० वर्षांपासून पाहत आहोत. घृणा पसरविण्यासारख्या कार्यासाठी धर्मच सर्वाधिक सुलभ आणि स्वस्त विष आहे. ज्याचा वापर वर्षानुवर्षे शासक वर्ग आणि धार्मिक गुरु करत आले आहेत.

मतांच्या राजकारणासाठी धर्मरूपी विषाचा वापर जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष कोणत्या ना कोणत्या रूपात करत आहेत. भारतीय जनता पार्टीचं पाहून काँग्रेस, समाजवादी, तृणमूल काँग्रेस इत्यादी भयभीत लोकांप्रती सहानुभूती दाखवून त्यांची मतं आपल्या पक्षासाठी पक्की करून घेण्याच्या मागे जुटलेली आहेत. आता मुसलमानांना देशद्रोही सिद्ध करून हिंदूंची मतं स्वत:च्या बाजूने करून घेऊ इच्छितात. लोकांचा विकास आणि त्यांच्या समस्या सोडविण्याची चिंता कोणालाही नाही आहे. सर्व पक्ष ‘फूट टाका आणि राज्य करा’च्या सिद्धांताचा पुरेपूर फायदा घेण्यात जुंपलेले आहेत.

लोकसभेमध्ये चालणारे वादविवाद सामान्य जनतेला असा संकेत देत आहेत की धर्माच्या आड सत्तेला कसं बनवता येईल वा सत्तेला कसं मिळवता येईल. आता तर कोणत्याही पक्षाला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बंधुत्व व्हावं असं वाटतच नाही.

धर्माच्या नावावर विभागले जातात

नेते वा धर्मगुरूंची रोजीरोटी याच गोष्टीवर निर्भर करते की लोक धर्माच्या नावावर विभागत आहेत. खरंतर वर्षानुवर्षे असंच होत आहे. फोडा आणि राज्य करा. धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर लोकांना अगदी सरळपणे विभागलं जाऊ शकतं. पूर्ण जातीला संघटित ठेवण्यात देखील या धर्मरूपी विषाचाच उपयोग केला जातो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या धर्म विषयाच्या आधारे स्वत:च अस्तित्व राखून आहेत. पश्चिमी आशियातील सर्व हुकूमशाहा अशा युक्तीचा वापर करूनच स्वत:ची सत्ता राखण्यात यशस्वी झाले आहेत.

धर्माच्या आड लाखो निरपराध लोकांना तुरुंगात  टाकणं आणि निरपराध लोकांवरती बॉम्ब वर्षाव करण्याला पुण्याचं कार्य म्हटलं जातं. सामाजिक वाईट गोष्टींना उचित मान देऊन त्यांचा सन्मान केला जाऊ लागला आहे.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात मास्कोच्या ऑर्थोडॉक्स चर्चचा खूप मोठा हात आहे. जे रशियाच्या आक्रमणाला होली म्हणतात. आपल्या पूर्वग्रहांना सोडून एकदा मोकळेपणे आणि शांतपणे विचार कराल तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होईल की धर्म हा जगतातील सर्वात मोठा रोग आहे.

हजारो वर्षापासून लोकं धर्माच्या नावावर मारझोड करत आले आहेत. असं मानलं जातं की गेल्या ३ हजार वर्षांपासून जीदेखील १५,००० पेक्षा अधिक मोठी युद्ध लढली गेली ती प्रामुख्याने धर्माच्या नावावरतीच होती. धर्म रक्षेच्या नावावर, धर्म वाचविण्याच्या नावावर वा धर्म पसरविण्याच्या नावावरदेखील होती.

घटनांमागे कोण

ईसाई पूर्व फैलावाच्या दरम्यान धर्मगुरूंच्या मनात देखील हाच विचार निर्माण झाला होता की धर्माच्या नावावरदेखील युद्ध लढली जाऊ शकतात व युद्धदेखील धार्मिक होऊ शकतात. मग इस्लाम व इतर धर्मांनीदेखील त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली. ज्यामुळे जगात अशी युद्ध होऊ लागली. ज्यांना धर्मयुद्ध म्हटलं गेलं.

धर्मगुरूंनी लोकांच्या मनात ही गोष्ट ठसवली की मातृभूमीचं रक्षण करताना जी माणसं स्वत:चे प्राण गमावतात त्यांना सरळ स्वर्गवास मिळतो. रामायण आणि महाभारताच्या युद्धांना या धर्मग्रंथांच्या कल्पित कथांमध्ये धर्मयुद्धच म्हटलं गेलं होतं. जवळजवळ सर्व घटनांमागे कोणता ना कोणता धर्मगुरु उभा राहिला आहे.

शासक वर्गाने स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी धर्मगुरूंच्या मदतीने धर्माचा सर्वात जास्त दुरुपयोग केला आहे. धर्मगुरूंनीदेखील आपली आजीविका व शक्ती कायम राखण्यासाठी शासक वर्गाला पूर्णपणे साथ दिली आणि धर्माच्या आड सामान्य जनतेला मूर्ख बनवलं.

सत्य तर हे आहे की कोणतीही व्यक्ती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध फक्त यासाठी आहेत कारण त्यांचे आई-वडील तो धर्म मानत आहेत. हिंदुत्व काय आहे हे अनेक हिंदूंनाच माहीत नाही. माणुसकी काय आहे हे कोणाला माहित नाही. ख्रिश्चन काय आहे हे ख्रिश्चनांनादेखील माहित नाही. इस्लाम काय आहे हे तर कितीतरी मुसलमानांना माहिती नाही. जसे धार्मिक संस्कार त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळाले आहेत तेच ते पुढे चालवत आहेत.

तसं तर संसारातील सर्व धर्म सत्य, अहिंसा, प्रेम, सहनशीलता व बंधुत्वाचा संदेश देताना दिसतात. परंतु संपूर्ण जगतात धर्माच्या नावावरती हिंसा, आतंकवाद व युद्ध चालली आहेत. एक धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायींना आपल्या शत्रू मानत आहेत आणि त्यांच्या हत्या करण्याला देखील धर्माचं कार्य मानत आहेत.

दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळांना पाडणं व जाळणं केवळ हीच लोकं करत आहे जी स्वत:चं स्वत:च अस्तित्व व धर्माचे सच्चे अनुयायी मानत आहेत. नास्तीक लोक अशा कार्यांपासून दूर राहतात. आस्तिक लोकं धर्मयुद्ध, जिहाद वा उग्रवादसारख्या घृणीत कार्यांमध्ये सहभागी होतात. जो अस्तिक एखाद्या कारणाने दुसऱ्या धर्माच्या स्थानाला नष्ट करू शकत नाही त्याला दोष देत राहतात.

परंतु मजेची बाब ही आहे की ज्या गोष्टींना लोकं धर्म मानत आहेत ते मनुष्यांना मनुष्यापासून तोडण्याचं काम करत आहेत, जोडण्याचं नाही. जो धर्म माणसाला माणसाशी जोडू शकत नाही, तो माणूस ईश्वराला कसा काय जोडू शकतो?

काल्पनिक कथा

सर्वधर्म आस्था, अंधश्रद्धा व खोटया चमत्कारांच्या आधारे चालत आहे. सर्वधर्मांनी आपल्या धर्मातील देवीदेवतांसोबत अनेक प्रकारच्या चमत्कारांच्या कथा जोडलेल्या आहेत. सर्वधर्म हे आश्वासनदेखील देतात की जो देखील त्यांच्या धर्माला मानेल त्याच्या सर्व आकांक्षा पूर्ण होतील आणि मृत्यूनंतर देखील सरळ स्वर्गात स्थान मिळेल. या जन्माच्या चक्रामधून त्यांना मुक्ती मिळेल.

हे देखील सत्य आहे की सामान्य जनतादेखील सर्वधर्मांच्या चमत्कारांची अपेक्षा करते आणि त्या चमत्कारांना पाहण्याच्या इच्छेमुळे अंधश्रद्धामध्ये बदलते. प्रत्येक धर्माच्या चमत्कारांच्या कथा आहेत. ज्यांचा कोणताही तार्कीक आधार नाही. ते फक्त धर्माच्या पुस्तकांमध्येच आहे.

धर्मगुरु लोकांना कायमच शिकवण देतात की जोपर्यंत तुम्ही धर्माच्या गोष्टीवर श्रद्धा ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वर कधीच मिळू शकत नाही. अशा धार्मिक विचार शून्यतेमुळेच धार्मिक व्यक्ती अनेकदा अंधश्रद्धाळू बनते आणि धर्माच्या नावावर आपल्या जीवनाचं बलिदान करायला देखील तयार होते. अशा ईश्वराला मिळवून तुम्ही काय करणार हे समजण्याची चिंता धर्मगुरू करत नाहीत. कारण त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं आहे की ईश्वर भेटल्यावर त्याच्याजवळ पैसा, सोनं, भरपूर खाणं, आरोग्य आपोआप मिळेल.

एक मोठा व्यापार आहे धर्म

धर्म जगातील सर्वात मोठा व्यापार आहे, ज्यामध्ये लोकांना नरकाचं भय व स्वर्गाचा लोभ दाखवून तसंच मोक्षाच्या नावावर भटब्राह्मण अनेक प्रकारे लोकांना फसवत असतात. धर्म फक्त तिथेच असतो जो एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी जोडला जावा, ना ही तोडला जावा. जेव्हादेखील एखादी व्यक्ती आपल्यावर विशेष धर्माचा लेबल लावू लागते तेव्हा ती दुसऱ्या धर्माच्या लोकांना आपला शत्रू मानू लागते. आणि त्यांच्या धर्मस्थळांच नुकसान करून एक विशेष सुख अनुभवू लागते. आपल्या पूर्वग्रहांनुसार त्याला एक पुण्याचा कार्य मानू लागते.

हे काम आज देशाचे संविधान करत आहे. ते सामान्य लोकांच्या अधिकारांचे रक्षण करत आहे. धर्म आणि सरकारच्या आतंकवादी लोकांना वाचविण्याचा प्रयास करत आहे. धर्मगुरू आता प्रत्येक संविधानाच्या मागे पडले आहेत. भारताचे संविधानाचे रक्षक राम मंदिरसारख्या अतार्कीक निर्णय संविधानाच्या नावावर धर्माच्या रक्षणासाठी देतात आणि अमेरिकेत स्त्रियांना गुलामीत ढकलण्याचा निर्णय देतात.

सक्षम, चतुर धर्माच्या आधारे स्वत:चं जीवन सुखी बनविण्यासाठी सर्व धर्म स्त्रिया आणि गरीबांना गुलामीच्या सीमेपर्यंत ठेवतात. कारण धर्मगुरूंचा फायदा यामध्येच तर आहे.

विवाह बंधन प्रेम बंधन

* शैलेंद्र सिंग

जे व्हॅलेंटाइन डेला केवळ प्रेमाच्या अभिव्यक्तीशी जोडतात, त्यांना त्याचा खरा अर्थ कळत नाही. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमासोबतच लग्नाशीही जोडला जातो. रोममधील तिसऱ्या शतकातील सम्राट क्लॉडियसचा त्याच्या कारकिर्दीत असा विश्वास होता की लग्न केल्याने पुरुषांची शक्ती आणि बुद्धिमत्ता कमी होते. म्हणूनच त्याने आपल्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न न करण्याचे फर्मान काढले. संत व्हॅलेंटाइनने याला विरोध केला आणि सैनिक आणि अधिकाऱ्यांना लग्न करण्याचा आदेश दिला. याचा राग येऊन क्लॉडियसने त्याला १४ फेब्रुवारी २६९ रोजी फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्या स्मरणार्थ लोकांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात केली.

व्हॅलेंटाईन डे आणि लग्न यांच्यातील नाते लक्षात घेऊन आता भारतातील तरुणांनीही व्हॅलेंटाइन डे हा विवाह दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कट्टरतावादी विचारसरणीला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.

कट्टरवाद्यांनी व्हॅलेंटाइन डेवर कितीही टीका केली तरी प्रेम करणाऱ्यांसाठी या दिवसाचे महत्त्व कमी होण्याऐवजी वाढतच आहे. 2015 मध्ये होणाऱ्या लग्नांच्या तारखांवर नजर टाकली तर बहुतांश विवाह व्हॅलेंटाईन डेलाच होत आहेत. हा दिवस हॉटेल्स, मॅरेज हॉल, ब्युटी पार्लर आणि मॅरेज गार्डनच्या बुकिंगमध्ये सर्वाधिक व्यस्त असतो. याचे कारण म्हणजे आपण सामान्य वागणुकीत उदारमतवादी राहू लागलो आहोत. अनेक लोक साजरे करत असलेले प्रत्येक सण आपण साजरे करू लागलो आहोत. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की सण हे आता कोणत्याही विशिष्ट धर्माचे गुणधर्म राहिलेले नाहीत. लोकांनी व्हॅलेंटाईन डे, चायनीज नववर्ष, ख्रिसमस, ईद, दिवाळी आदी सण एकत्र साजरे करण्यास सुरुवात केली आहे. या कारणास्तव, सामान्य प्रथा मागे टाकून लोकांनी व्हॅलेंटाईन डेला लग्न करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष दिवस बनवायचा आहे

रितिका म्हणते, “मला माझ्या लग्नाचा दिवस खास बनवायचा होता. मला वाटले की लग्नाचा दिवस आयुष्यभर स्पेशल बनवायचा असेल तर व्हॅलेंटाईन डेलाच लग्न का करू नये. यामुळे दरवर्षी एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येत राहील. वैवाहिक जीवनाच्या यशामध्ये प्रेम आणि रोमान्स सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. व्हॅलेंटाईन डेला लग्न करणे हा नेहमीच एक अनुभव असेल. जेव्हा जेव्हा आपण लग्नाचा वाढदिवस साजरा करतो तेव्हा एक विशेष भावना येत राहते.

आनंदी बाजार

गेल्या काही वर्षांपासून व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची उत्पादने येऊ लागली आहेत, जी नातेसंबंधांना रोमँटिक बनविण्याचे काम करतात. हॉटेल्समध्ये राहायला, फिरायला किंवा जेवायला गेलात तर तिथली सजावट वेगळ्या प्रकारची असते. यामुळे रोमान्सची अनुभूती येते. मासिके, वर्तमानपत्रे आणि टीव्हीपासून इतर सर्व ठिकाणी फक्त आणि फक्त प्रेम आणि रोमान्सचे वातावरण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दागिन्यांपासून कपड्यांपर्यंत काहीही खरेदी करायला गेलात तर व्हॅलेंटाईन डेच्या भरपूर ऑफर्स येतात. एकूणच या दिवशी बाजारपेठ आनंदाने भरलेली असते.

लग्नाचा दिवस व्हॅलेंटाईन डे झाला

व्हॅलेंटाईन डे ला लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करत असलेले अर्पित आणि पारुल श्रीवास्तव म्हणतात, “व्हॅलेंटाईन डे ला लग्न करून आम्ही प्रेमाचे बंधन लग्नात बांधण्याचे काम केले आहे. या दिवशी लग्नाचा वाढदिवस साजरा करून आम्हाला खूप छान वाटते. प्रेमाची गाठ बांधण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. या दिवशी, संपूर्ण जग आपल्यासोबत प्रेमाचे हे प्रतीक साजरे करते.” लॅक्मे ब्युटी सलूनच्या संचालिका ऋचा शर्मा म्हणतात, “आम्हाला व्हॅलेंटाईन डेलाच वधूच्या मेकअपसाठी जास्तीत जास्त बुकिंग मिळतात. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड हळूहळू वाढत आहे. विवाहित जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डेवर थीम पार्ट्या आयोजित करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे या दिवशी मेकअप करणार्‍यांची संख्या वाढते.

आता समाजात प्रथा मोडत आहेत. लोकांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायचे असते. त्यांना त्यांच्या जीवनात कोणत्याही धर्माला किंवा दिखाऊपणाला स्थान द्यायचे नाही.

व्हॅलेंटाईन डे हा पाश्चिमात्य संस्कृतीचा दिवस मानून त्याला ज्या पद्धतीने विरोध केला गेला तो चुकीचा होता. लोकांनी व्हॅलेंटाइन डेला लग्नाचा दिवस बनवून हे सिद्ध केले आहे. या लोकांनीही कट्टरतावादी लोकांना आणि त्यांच्या विचारसरणीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. काळाशी सुसंगत राहणे ही काळाची गरज आहे. अशा दिवसात, ज्या दिवशी संपूर्ण जग आनंद साजरा करते, आपणही त्यात सहभागी व्हायला हवे. धर्माचा दिखाऊपणा आपण यापासून दूर ठेवला पाहिजे जेणेकरून सर्व प्रकारचे लोक एकत्र साजरे करू शकतील.

काही वर्षांपूर्वीपर्यंत या दिवशी मुला-मुलींना रस्त्यावर, उद्याने, सिनेमागृह आणि इतर ठिकाणी एकत्र उभे राहणे अवघड होते. काही धर्मांधांनी या दिवशी शुभेच्छापत्रांची विक्रीही होऊ दिली नाही. शहर व समाज सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस व प्रशासनाला स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था करावी लागली. पण आता समाजाने कट्टरतावादी विचारसरणीला बगल देत व्हॅलेंटाईन डेला लग्नाचा दिवस बनवून सामाजिक मान्यता दिली आहे. लखनऊच्या अनिता मिश्रा याविषयी सांगतात, “अनेक देशांमध्ये आपली विचारसरणी रूढिवादी मानली जाते. आपल्या देशाने ज्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे स्वीकारला आहे, त्यातून एक नवा विचार आला आहे. यावरून आपला देश आणि आपली विचारसरणी परंपरावादी नसल्याचे स्पष्ट होते. आपल्या समाजाने व्हॅलेंटाईन डे हा कौटुंबिक आणि प्रेमदिन म्हणून प्रेमाच्या कक्षेतून बाहेर काढून साजरा करण्याचे मोठे काम केले आहे. यावरून आपण परंपरावादी शक्तींना मागे टाकून विचार करून पुढे जात आहोत हे दिसून येते.

कौटुंबिक दिवस म्हणून नवीन ओळख

समाजशास्त्रज्ञ डॉ. दीपमाला सचान म्हणतात, “लग्न आणि प्रेमाचे नाते एकमेकांना पूरक आहे. अशा परिस्थितीत प्रेमाची व्याख्या करणारा दिवस हा लग्नाचा दिवस ठरवून तरुणाईने केलेली सुरुवात खूप अर्थपूर्ण आहे. समाजही ते स्वीकारत आहे. येत्या काही दिवसांत ते अधिक प्रचलित होईल. त्यामुळे धर्मांधतेच्या नावाखाली व्हॅलेंटाईन डेला विरोध करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळत आहे. समाजात धर्मांधता पसरवणाऱ्यांना कुठेही थारा नसल्याचे लोकांनी सांगितले आहे.

व्हॅलेंटाईन डेला प्रेमाशी जोडून पूर्वी ज्या पद्धतीने प्रचार केला गेला, त्यातून तरुणांमध्ये वेगळा संदेश गेला. मुलींना इम्प्रेस करण्याचा हा प्रकार त्याला समजला. आता त्याला फॅमिली डेच्या रूपाने स्थान मिळाले आहे. व्हॅलेंटाईन डेला लग्न लावून हा दिवस कौटुंबिक दिवस म्हणून ओळखण्याचे काम तरुणांनी केले आहे. त्यामुळे समाजात व्हॅलेंटाइन डेची नवी ओळख निर्माण झाली आहे. याचा विरोध करणाऱ्यांनाही आता हे समजू लागले आहे. त्यामुळेच व्हॅलेंटाइन डेला विरोध करण्याच्या घटना वर्षानुवर्षे कमी होऊ लागल्या आहेत. व्हॅलेंटाईन डेला विरोध करणारे केवळ प्रतिकात्मक निषेधापुरते निषेध करण्यापुरते मर्यादित आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें