आला मोसम रोमांस करण्याचा

– नसीम अंसारी कोचर  

थंडीचा मोसम रोमान्सचा मोसम असतो. या मोसमात कामुकता आणि उत्तेजनेचा स्तर वाढतो. बाहेरील तापमान घटताच अंतर्गत तापमान वाढते आणि आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची इच्छा तीव्र होते.

गुलाबी थंडीत प्रत्येक युगुल एकमेकांच्या बाहुपाशातील ऊबेची अपेक्षा करतो. सेक्स करणे एक वेगळीच जाणीव आहे. प्रत्येक प्रियकर-प्रेयसीचा प्रेमाचा एक वेगळा अंदाज असतो. काही लोकांना आपल्या बेडरूममध्ये जास्त आनंद मिळतो, तर काही लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात. काही हिल स्टेशनवर हिमवर्षावात प्रेमाचा आनंद घेतात, तर काही गरम पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये.

थंडीच्या काळात प्रेमी-प्रेमिकांमध्येच रंगेलपण वाढत नाही, तर या मोसमात निसर्गातील अन्य जीवही आपल्या जोडीदारासोबत सहवासाची इच्छा बाळगतात. एक्सपर्टही थंडीच्या मोसमाला सेक्ससाठी खूप उपयुक्त मानतात. या काळात सेक्स केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळण्याबरोबरच शारीरिक सौंदर्यही वाढते. तसेही या मोसमात पुरुष खूप मूडमध्ये असतात. थंड हवेतून परतल्यानंतर सेक्स करणे काही वाईट गोष्ट नाहीए. खरंच सांगतो, बाहेरील थंड हवेशी लढून घरात आल्यानंतर पुरुषांची सेक्सची इच्छा वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत पुरुष खूप रोमँटिक दिसतात. अशा वेळी आपणही या थंडीच्या मोसमाला स्मरणीय बनवण्यासाठी स्वत:मध्ये आणि आपल्या बेडरूममध्ये थोडासा चेंज आणण्याचा प्रयत्न करा व मग पाहा आपल्या नखऱ्यांनी आपला जोडीदार कसा फिदा होतो. थंडीच्या दिवसांत सेक्सला मजेदार बनवण्यासाठी काही खास टिप्स आम्ही आपल्याला देत आहोत :

कोमट पाण्यात बाथचा आनंद घ्या

अंथरुणावर जाण्यापूर्वी बाथ टबमध्ये कोमट पाण्यात यूडिकोलोन, चंदन किंवा मग गुलाबपाण्याचे काही थेंब टाकून जोडीदारासोबत स्नानाचा आनंद घ्या. वाटल्यास आपण बाथरूमला सुगंधित कॅन्डल्सनी सजवा. असं केल्याने आपल्या जोडीदाराची एक्साइटमेंट आणि उत्साह वाढेल. प्रेमाची ही नवीन पध्दत आपल्या संबंधांमध्ये ऊर्जा निर्माण करेल. गरम पाण्याने स्नान केल्यास शरीर ताजेतवाने होईल आणि रक्तप्रवाह वाढल्याने उत्तेजनाही वाढेल.

फरचा मऊपणा देईल गरमी

आपली जुनीपुराणी नाईटी सोडून या थंडीच्या मोसमात मऊ-ऊबदार फरवाली नाईटी किंवा गाऊन घाला. थंडीच्या मोसमात मऊ फरची ऊब केवळ आपली सेक्सची इच्छाच वाढवणार नाही, तर याचा स्पर्शही आपल्या पार्टनरला चांगल्याप्रकारे उत्तेजित करेल. आजकाल तर मऊ फरवाले ब्लँकेटही बाजारात उपलब्ध आहेत. थंडीच्या मोसमात जोडीदारासोबत फरवाल्या ब्लँकेटमध्ये रोमान्सची मजा द्विगुणित होईल.

कँप फायरचा आनंद घ्या

थंडीच्या मोसमात लोक तसं पाहिलं तर हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी हिल स्टेशनला जातात. अशा वेळी कँप फायरचा आनंद घेतला नाही, तर थंडीचा आनंद अर्धवट राहील. शेकोटी पेटवून आपल्या जोडीदारासोबत बसून शेक घेण्याची मजाच काही निराळी असते.

परफ्यूम करतो मदमस्त

थंडीच्या दिवसांत परफ्यूम आपले रोमान्सचे मार्ग सोपे बनवतो. गरमीत येणारी घामाची दुर्गंधी या दिवसांत गायब होते. अशा वेळी परफ्यूम आपला पूर्ण परफॉर्मन्स देतो आणि आपल्या जोडीदाराला सेक्ससाठी उत्तेजित करतो.

मंद प्रकाशाचा आनंद

एक्स्पर्ट मानतात की सेक्सच्या काळात खोलीतील मंद प्रकाश प्रेमी जोडप्याला उत्तेजित करतो. जर थंड रात्रींमध्ये आपल्या बेडरूममध्ये मंद प्रकाश पसरला असेल किंवा चारही बाजूला सुगंधित मेणबत्या झगमगत असतील, तर आपला प्रियकर प्रेमाने लिप्त होत आपल्याला बाहुपाशात ओढण्यास अधीर होईल.

मोजे घाला

एका रिसर्चनुसार, जर आपण मोजे घालून सेक्स करत असाल, तर आपण हे उत्तमप्रकारे एन्जॉय करू शकता. खरं तर मोजे घातल्याने आपले पाय गरम होतात. पायांत रक्तप्रवाह वाढल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण वाढते. शरीरात गरमी आल्याने आपला सेक्स मूड अजून उत्तम होतो आणि आपल्याला जास्त उत्तेजना जाणवते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सेक्सचा आनंद घेण्यासाठी मऊ, रंगीत आणि गरम मोजे खरेदी करायला विसरू नका.

दारूपासून दूर राहा

काही लोकांचे म्हणणे आहे की, थंडीच्या मोसमात दारू प्यायल्याने शरीरात ऊब निर्माण होते आणि त्यामुळे सेक्स ड्राइव्ह चांगले होते. परंतु डॉक्टरांच्या मते, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. दारू प्यायल्याने तंत्रिकातंत्रावर परिणाम होतो आणि त्यामुळे ब्रेनमध्ये झोपेचा संदेश प्रवाहित होतो. अशा वेळी सेक्ससाठीची उत्तेजना गायब होते आणि शरीर झोपण्यासाठी तयार होते. दारूची दुर्गंधी आपल्या जोडीदाराचा मूड खराब करते. त्यामुळे सहवासाच्या काळात दारूचे सेवन करू नका.

डान्स आणि एक्सरसाइजची मजा घ्या

थंड मोसमात जोडीदारासोबत मोकळेपणाने डान्स किंवा एक्सरसाइज करणे, आपल्या सेक्स लाइफला उत्तम बनवेल. घराच्या टेरेस किंवा बेडरुमध्ये मंद म्युझिकवर एकमेकांच्या बाहुपाशात विसावून डान्स करणे दोघांनाही रोमान्सच्या सागरात डुबकी मारायला लावेल. जर आपण दोघांनीही सकाळच्या वेळी सोबत व्यायाम किंवा जॉगिंग केलात, तर त्यामुळे आपलं सेक्स लाइफ इंप्रूव्ह होईल.

निसर्गाच्या सान्निध्यात राहा

आजकाल फ्लॅट सिस्टिमच्या घरात बागेचा अनुभव खूप खटकतो. जुन्या बंगल्यांत सुंदर फुलांची बाग जरूर असे. जिथे एखाद्या झाडाच्या आडोशाला प्रियतमच्या बाहुपाशात विसावणे खूप रोमांचक अनुभव देत असे. परंतु आपण काळजी करू नका. घराच्या जवळच एखादा शांत-एकांत पार्कचा कोपरा शोधा आणि फुरसतीच्या काळात आपल्या जोडीदारासोबत तिथे बसून थंडी एन्जॉय करा.

थंडीत सेक्सचे फायदे

गरमीच्या दिवसांत सेक्स करणे एक कंटाळवाणी प्रक्रिया होऊ शकते. परंतु थंडीच्या दिवसांत असं होत नाही. थंडीच्या दिवसांत तर केवळ एकमेकांच्या मिठीत राहण्याची इच्छा होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की थंडीचा मोसम जिथे या पृथ्वीवरील प्रत्येक जिवाला रोमांचित आणि रोमँटिक बनवतो, तिथेच मानवजातीला अनेक फायदेही होतात.

सौंदर्य वाढते

थंडीच्या काळात सेक्स करणे तणावपूर्ण नसते. शरीरात रक्ताभिसरण वाढल्याने संपूर्ण शरीराला पुरेसे ऑक्सिजन प्राप्त होते. त्यामुळे डॅमेज झालेल्या कोशिकांचीही दुरुस्ती वेगाने होते. सेक्सच्या काळात शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोनचा स्त्राव पाझरतो, त्याला प्रेमाचा हार्मोनही म्हणतात. हे हार्मोन व्यक्तिमध्ये प्रेम आणि स्नेहाची भावना वाढवतो.

तणाव दूर होतो

रोजच्या कामकाजाच्या काळात निर्माण झालेला तणाव व थकवा सेक्सच्या काळात संपून जातो. गरमीमध्ये ही क्रिया तेवढी प्रभावीपणे होत नाही, परंतु थंडीत सेक्स केल्यास तणाव लगेचच छूमंतर होतो. तणाव अनेक आजारांचे मूळ आहे. मलावरोध, थकवा, अंगदु:खी, ब्लडप्रेशर, डायबिटससारखे आजार तणावातून निर्माण होतात. थंडीच्या काळात नियमित सेक्स केल्यास आपण या आजारापासून दूर राहता. डॉक्टरांच्या मतानुसार, सेक्स माणसाच्या तंत्रिकातंत्र आणि श्वसनतंत्राला आराम देतो, ज्यामुळे तणाव दूर होतो आणि आजार होत नाहीत.

गर्भधारणेची शक्यता वाढते

थंडीच्या दिवसांत महिलांची गर्भवती होण्याची शक्यता गरमीच्या तुलनेत वाढते. खरं तर याला जबाबदार पुरुष आहेत. शरीराचे तापमान कमी झाल्याने त्यांच्यामध्ये शुक्राणूंच्या संख्येत वाढ होते. थंडीच्या काळात शुक्राणू जास्त निरोगी आणि तीव्र गतीवाले असतात. त्यांच्या संख्ययेतही वृध्दी आढळून येते. त्यामुळे थंडीच्या काळात नियमित सेक्सने गर्भधारणा करणे सोपे होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें