जशी त्वचा टोन, तशी नेल पेंट

* पारुल भटनागर

जेव्हा पण आपण नेलपॉलिश निवडतो तेव्हा अनेक रंग आपल्याला आकर्षित करतात. ते आपल्याला आवडतात, जे आपण विचार न करता खरेदी करतो कारण ते आपल्याला आवडण्याबरोबरच ट्रेंडमध्ये असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की नखांवर स्किन टोननुसार नेल पेंट न लावल्यास हात आणि नखांचे सौंदर्य तसे दिसून येत नाही, जसे तुम्हाला हवे असते.

अशा परिस्थितीत तुमच्या स्किन टोननुसार नेल पेंट कसा निवडायचा ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या संदर्भात कॉस्मेटोलॉजिस्ट भारती तनेजा सांगत आहेत :

गडद त्वचा टोन

डस्की स्किन टोन हा एक अतिशय आकर्षक टोन मानला जातो कारण या स्किन टोनवर सर्वकाही सूट होते आणि ते खूप आकर्षकदेखील वाटते. अशा परिस्थितीत, जर तुमचा गोंधळ उडत असेल तर तुम्हाला सांगतो की गडद शेड्स, गुलाबी, केशरी, गाजर, गडद तपकिरी किंवा मग याशी मिळतेजुळते शेड्स तुमच्या त्वचेच्या टोनवर चांगले दिसतील.

कोणते रंग टाळावेत : या स्किन टोनवर सर्व रंग चांगले दिसतात, त्यामुळे कोणताही रंग टाळण्याची गरज नाही.

फेयर स्किन टोन

तुमची त्वचा खूप गोरी आहे आणि तुमच्यावर तर सर्व काही छान दिसेल असा जर तुम्ही विचार करत असाल तर कदाचित ही तुमची चूक आहे कारण काही न्यूड शेड्स तुमच्या नखांवर अजिबात छान दिसणार नाहीत. तुमच्या त्वचेच्या टोनवर गुलाबी, हलका जांभळा, मध्यम आणि गडद लाल, निळयाचे सर्व शेड्स, गुलाबी रंगाचे शेड्स खूप छान दिसतील.

कोणते रंग टाळावेत : काळा, गडद हिरवा, केशरी रंग यासारखे गडद शेड्स तुमच्या नखांना खूप जास्त चमकदार बनविण्याबरोबरच नखांचे सौंदर्य ही नाहीसे करण्याचे काम करतील. त्यामुळे त्यांना टाळा.

गडद त्वचा टोन

जेव्हा आपली त्वचा गडद असते, तेव्हा आपल्याला वाटते की आपली त्वचा तर आधीच गडद आहे, त्यामुळे गडद रंग आपल्याला शोभणार नाहीत. म्हणूनच आपण फक्त हलके रंग निवडले पाहिजेत.

पण प्रत्यक्षात ते आपल्या विचाराच्या अगदी विरुद्ध आहे कारण आपली त्वचा जर गडद असेल तर तुम्हाला गडद हिरवा, बरगंडी, गडद लाल इत्यादी रिच किंवा गडद शेड्स अधिक चांगले दिसतील. आपण चमकदार केशरी आणि चमकदार गुलाबी रंगदेखील अवश्य वापरून पहा.

कोणते रंग टाळावेत : तपकिरी रंगाचे नेलपेंट लावू नका कारण त्यामुळे तुमची नखे फिके दिसतील. सिल्व्हर, व्हाईट, निऑन शेड्स यांसारख्या उन्हाळयातील ट्रेंडी पेस्टल रंग तुम्ही पूर्णपणे टाळावेत.

पेल स्किन टोन

जेव्हा आपण गोऱ्या त्वचेबद्दल बोलतो तेव्हा आपण गोरे तर असतो, परंतु आपल्या त्वचेत थोडासा पिवळसरपणाही असतो आणि या प्रकारच्या त्वचेच्या टोनला पेल स्किन टोन म्हणतात. या त्वचेच्या टोनसाठी नेल पेंट थोडेसे पाहून निवडणे आवश्यक असते. अशा टोन असलेल्यांनी पेस्टल शेड्स, लाइट शेड्स, लाल, जांभळा इत्यादी हलक्या शेड्स लावाव्यात.

कोणते रंग टाळावेत : काळा, मरून असे फारसे गडद शेड्स अजिबात लावू नका. हातावर थोडासा पिवळसरपणा असल्याने पिवळा सोनेरी शेड्सदेखील टाळा.

बँडेड नेल पेंटच सर्वोत्तम

तुम्हाला आज बाजारात विविध रंग आणि प्रकारांमध्ये स्थानिक नेल पेंट्स मिळतील, जे तुमच्या बजेटमध्ये असल्याने तुम्ही एकावेळी अनेक शेड्स खरेदी करता, जे भले दिसायला चांगले वाटतील पण तुम्हाला माहिती आहे का की त्यात असे घटक असतात, जे हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात तसेच मधुमेहास कारणीभूत ठरतात, म्हणून जेव्हाही तुम्ही नेल पेंट खरेदी कराल तेव्हा याची खात्री करा की ते ब्रँडेड असण्याबरोबरच अधिकाधिक नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असतील, रसायनांचा वापर कमीत कमी झाला असेल आणि तसेच नखांना मॉइश्चरायझ करणारी गुणधर्मदेखील असावेत.

या 6 टिप्सने नखांना सुंदर बनवा

* गृहशोभिका टिम

आजच्या युगात, प्रत्येकजण फॅशनशी जुळवून घेण्यासाठी प्रत्येक उपाय करतो. मग तो ड्रेस असो वा मेकअप. प्रत्येकाला वेगळे दिसायचे असते. यासाठी तो काय करत नाही? तासनतास पार्लरमध्ये वेळ घालवायचा. जेणेकरून ती सुंदर होईल.

तुम्हाला माहित आहे की जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने सौंदर्य मिळाले नाही तर बाहेरील सौंदर्य फार काळ टिकत नाही. चेहऱ्यासोबतच आपण आपल्या नखांवरही जास्त लक्ष देतो. जेणेकरून तोही सुंदर आणि मजबूत राहील, परंतु अनेक कारणांमुळे तो फारसा टिकू शकत नाही. एकतर ते फुटतात किंवा तुटतात. त्यामुळे तुम्ही कृत्रिम नखांचा अवलंब करता. जे तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक आहे.

साधारणपणे हाताच्या बोटांची नखे बोटांच्या नखांपेक्षा वेगाने वाढतात. जर तुम्हाला तुमच्या नखांची कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर ते वाढत नाहीत. याचे मुख्य कारण नीट न खाणे, पोषक तत्वांचा अभाव, जीवनसत्त्वे नसणे हे असू शकते.

जर तुम्हाला तुमची नखे सुंदर, मजबूत आणि चमकदार हवी असतील तर तुम्ही स्वयंपाकघरातील काही गोष्टी करू शकता. जे जास्त खिसा सैल न करता करता येईल. मग उशीर कशाचा? हे घरगुती उपाय करून पहा आणि मिळवा सुंदर, मजबूत, चमकदार नखे.

  1. लिंबू

यामध्ये व्हिटॅमिन सीचे गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. हे तुमच्या नखांसाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर केल्याने तुमच्या नखांची लांबी वाढण्यासोबतच चमक आणि ताकद येते. ते वापरण्यासाठी एका भांड्यात एक चमचा लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब मिसळा आणि नखांना मसाज करा. त्यानंतर दहा मिनिटे नखांवर चांगले घासत राहा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आपण इच्छित असल्यास, आपण स्लाईडमध्ये लिंबू कापून नखांवर घासू शकता.

  1. संत्री

याच्या रसात व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते. ते वापरण्यासाठी, थोडा संत्र्याचा रस घ्या आणि त्यात दहा ते पंधरा मिनिटे नखे बुडवा. यानंतर, कोमट पाण्याने धुवा आणि त्यावर मॉइश्चरायझर लावा. जर तुम्हाला तुमची नखं सुंदर हवी असतील तर त्याचा रोज वापर करा.

  1. ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये असे अनेक घटक आढळतात जे तुमच्या नखांसाठी खूप फायदेशीर असतात. यासाठी रात्री झोपताना हात-पायांच्या नखांवर ऑलिव्ह ऑईल पाच मिनिटे मसाज करा. आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवा. याशिवाय, जर तुम्हाला हवे असेल तर, तुमचे नखे ऑलिव्ह ऑइलमध्ये 15-20 मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते. जे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

  1. टोमॅटो

टोमॅटो आपल्या आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात आढळते. जे तुमच्या नखांसाठी फायदेशीर आहे. यासाठी टोमॅटोचा रस थोडे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा आणि कमीतकमी 15 मिनिटे नखे पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे तुमची नखे लांब आणि दाट होतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात आढळणारा बायोटिन नावाचा घटक.

  1. खोबरेल तेल

खोबरेल तेल आपण अनेक प्रकारे वापरतो. हे आपल्या आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमची नखे मजबूत, चमकदार आणि लांब करू शकता. यासाठी खोबरेल तेल हलके कोमट करून रोज रात्री झोपण्यापूर्वी हात आणि पायांच्या नखांवर मसाज करा. त्याच वेळी, याच्या मसाजमुळे नखे चमकदार आणि लांब होतात.

  1. फ्लेक्ससीड तेल

जर तुम्हाला लांब नखं ठेवायची असतील तर तुम्ही यासाठी जवस तेल वापरू शकता. यामध्ये व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लॅक्टिनसह प्रथिने आणि जस्त मुबलक प्रमाणात असते, जे नखे वाढण्यास मदत करतात. यासाठी एक मिनिट नखांवर घासत राहा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. दिवसातून किमान एकदा तरी त्याचा वापर करा.

नेलआर्ट वाढवी सौंदर्य

* पारूल  भटनागर 

लग्न असो वा साखरपुडा, आपलं सर्व लक्ष चेहऱ्याच्या सौंदर्याकडेच असतं कारण आपल्याला सेंटर अट्रैक्शन बनायचं असतं, फोटो छान हवे असतात, परंतु तुम्हीच विचार करा की तुमचा चेहरा तर सुंदर दिसतोए, परंतु रिंग सेरेमनीच्या दरम्यान तुम्ही तुमचा हात पुढे केला आणि तुमचा हात पाहून तुमच्या जोडीदाराला जो आनंद व्हायला पाहिजे तो झाला नाही तर तुम्हाला कसं वाटेल? तुमचा सर्व फोकस चेहरा सुंदर दिसण्यावरच होता. या नादात तुम्ही नेल्सचं सौंदर्य उजळविण्याकडे जरादेखील लक्ष दिलं नाही.

जर तुम्हाला हा क्षण आठवणीत ठेवायचा असेल आणि सर्वांनी तुमची स्तुती करावी असं वाटत असेल तर ऐंजल मेकअप स्टुडिओच्या आर्टिस्ट सुमन यांच्या नेल आर्ट आणि ब्यूटी टिप्स नक्कीच लक्षात ठेवा.

नेलआर्ट

नेलआर्ट नखांचं सौंदर्य वाढविण्याबरोबरच आपलं व्यक्तिमत्त्व अधिक चार्मिंगदेखील बनवतं. हे साकारणं खूप कठिण नाहीए आणि ना ही यासाठी अधिक साधनांची गरज लागते.

मग चला जाणून घेऊया, कशाप्रकारे सहजपणे घरीदेखील नेलआर्ट करता येऊ शकतं.

दोऱ्याने नेलआर्ट : तुम्ही विचार करत असाल की दोऱ्याने नेलआर्ट कसं होऊ शकतं, तर ते खूपच सहजसोपं आहे.

यासाठी तुमच्याकडे ३-४ गडद रंगाच्या नेलपेण्ट हव्या आणि थोडासा पातळ दोरा हवा.

सर्वप्रथम तुम्ही नखांवर गडद रंगाची नेलपेण्ट लावून घ्या. त्यानंतर क्रॉस स्टाईलने त्यावर दुसरी गडद रंगाची नेलपेण्ट लावा. त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या रंगाची कोटिंग करा. आता दोऱ्याने क्रॉस स्टाइलमध्ये वा तुम्हाला जे डिझायनिंग करायचं आहे त करावं. या माध्यमातून तुम्ही खूपच सुंदर नेलआर्ट करू शकता.

रंगीत नेलआर्ट : रंगीत नेलआर्ट नेलपॉलिशने नव्हे तर वाटर कलर्सच्या मदतीने केलं जातं आणि यासाठी झिरो पाँइटच्या ब्रशची गरज लागते.

यासाठी सर्वप्रथम नखांवर सफेद रंगाचा वॉटर कलर लावा. नंतर तो थोडासा ड्राय करा. तेव्हाच व्यवस्थित नेलआर्ट होईल. नंतर वेगेवेगळे रंग घेत कोणंतही डिझाइन तुमच्या कल्पनेनुसार वापरा.

लक्षात ठेवा, सुकल्यानंतर टॉप कोट जरूर लावा म्हणजे शाइनबरोबरच नेलआर्ट दीर्घकाळपर्यंत टिकू शकेल.

वाइन नेलआर्ट : वाइन नेलआर्ट नाव ऐकायला जेवढं विचित्र वाटतं बनल्यानंतर तेवढंच ते सुंदर दिसतं. कीनू नावाने मिळणारी बियर वापरल्यावरच हे शक्य होऊ शकेल.

यासाठी सर्वप्रथम जे डिझाइन तुम्ही नखांवर प्रिंट करु इच्छिता ते स्ववेअरमध्ये कापून घ्या. त्यानंतर नखांवर पांढऱ्या रंगाचं नेलपेण्ट लावा आणि ते सुकू द्या त्यानंतर तुम्ही जे न्यूजपेपरने कटींग केलंय ते बियरमध्ये व्यवस्थित डिप करा आणि ते नखांवर लावून थोडावेळ सुकण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर पेपर हळूवारपणे काढून प्रिण्ट नखांवर उमटलंय का ते पाहा. जर उमटलं असेल तर ते काढून टाका अन्यथा नखांवर तसंच राहू द्या. प्रत्येक नखावर वेगवेगळे डिझाइन ट्राय करू शकता. अशाप्रकारे तुम्ही नखांना यूनिक लूक देऊ शकता.

ब्रायडल नेलआर्ट : ब्रायडल म्हणजेच नववधूचे हात पाहून सर्वजण चकीत व्हावेत, यासाठी तिची नखं सुंदर करणं तेवढंच गरजेचं आहे, जे नेलआर्टने शक्य आहे.

सर्वप्रथम नववधूच्या नखांवर बेस कलर लावून घ्या. नंतर हलकं ड्राय झाल्यानंतर एखादं आवडतं डिझाइन बनवा आणि त्यावर हळूवारपणे ग्लिटर वा छोटेसे स्टोन लावा. यामुळे नववधू अधिक सुंदर दिसेल.

नेलआर्ट करण्यापूर्वी

* फक्त पाहून नेलआर्ट करायला घेतलं, तर रिजल्ट चांगला येणार नाही, यासाठी नेलआर्ट करण्यापूर्वी आपली नखं व्यवस्थित स्वच्छ ठेवा. नंतर स्क्वेअर वा ओव्हल जो देखील आकार तुम्हाला पसंत असेल त्यामध्ये नखं कापून फायलरच्या मदतीने शेप बनवा म्हणजे तुमची नखं क्यूटीक्यूटी दिसू लागतील.

* मनात ब्रँडचा विचार करू नका अन्यथा नेलआर्ट चांगलं होणार नाही. याउलट तुम्ही नेलआर्ट कसं चांगलं करू शकाल याचा विचार करा. यासाठी विविध ब्रँडच्याविविध नेलपेण्ट्स ट्राय करा आणि वाटर कलर्स वापरायलादेखील विसरू नका. कारण हे स्वस्त असण्याबरोबरच रिजल्टदेखील चांगला देतात.

* नेलआर्ट कुठंही, कोणाकडूनही करता येऊ शकतं हा चूकीचा समज आहे. म्हणूनच नेलआर्ट करतेवेळी जरादेखील चूक झाली तरी घाबरू नका. उलट शांततेने काम करून तुम्ही उत्तम डिझाइन साकारू शकता.

* लक्षात ठेवा की नेलआर्ट केल्यानंतर टॉप कोट करायला विसरू नका, कारण यामुळे नेलआर्ट दीर्घकाळ राहील आणि तुमची नखं अधिक चमकदार दिसतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें