सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

1. माझी नखं खूप लवकर तुटतात. शिवाय त्यांची चमकसुद्धा   नाहीशी झाली आहे. कृपया ते परत सुंदर, मजबूत व चमकदार   बनावे यासाठी एखादा घरगुती उपाय सांगा?

लिंबू हे व्हिटॅमिन सी गुणाने पररिपूर्ण असते. हे तुमच्या नखासाठी खूप फायदेशीर ठरेल. याच्या वापराने नखांची लांबी वाढण्यासोबतच चमक आणि मजबूतीही येते. याचा वापर करण्याकरिता एका बाऊलमध्ये एक चमचा लिंबाचा रस ऑलिव्ह ऑइलचे थोडे थेंब टाकून चांगले मिसळा. १० मिनिटं आपल्या नखांवर चोळत राहा. यानंतर पाण्याने धुवून टाका. ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक असे घटक असतात जे नखांसाठी उपयोगी असतात.

2.मी माझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांमुळे खूप त्रस्त आहे. कृपया एखादा घरगुती उपाय सांगा, ज्याचे काही साईड इफेक्ट नसतील.

पुदिन्यात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात, जे त्वचा स्वच्छच करत नाही तर त्वचेला नैसर्गिक टोनही देतात. हे त्वचेत असलेले विषारी पदार्थ व अशुद्धता काढण्यात मदत करते, शिवाय मुरुमांपासून सुटका मिळवून देते. पुदिन्याच्या रसात असलेले सॅलिसिलिक अॅसिड मृत त्वचा हटवते. मुरूम नाहीसे करण्याकरीता मूठभर पुदिन्याची पानं कुटून त्याचा रस काढा. त्यानंतर तो संपूर्ण चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी रस वाळल्यावर चेहरा धुवा. गुलाबजलात  पुदिन्याचा रस मिसळून लावल्यावरही मुरूम नाहीसे होतात.

3. डोळयांच्या सौंदर्यासाठी काही साध्या टिप्स सांगा, जेणेकरून माझे डोळे सर्वात सुंदर दिसतील?

आपण आय मेकअपमध्ये प्रायमर, हायलायटर व मस्कारा वगैरे वापरतो, जेणेकरून आपले डोळे सुरेख दिसतील व आपल्या व्यक्तिमत्त्वाला स्मार्ट लुक देतील. डोळयांना मेकअप करण्याआधी प्रायमर अवश्य लावा. याने डोळयांवर लावलेले आयशॅडो दीर्घ काळ टिकेल आणि त्याचा रंगही उठून दिसेल. हे पापण्यांच्या त्वचेला कोमल ठेवते. पापण्या आणि भुवया यांच्या मधला भाग म्हणजे ब्रॉबोनवर हायलाईटर लावल्यास डोळयांना एक सुरेख आकार मिळतो. मस्कारा तुमच्या डोळयांना उठावदार बनवण्यात उपयोगी पडतोत. हे डोळयांच्या वरच्या आणि खालच्या तीनही कडांना लावा. जर तुमच्या डोळयांचा आकार बदामी नसेल तर तुम्ही काजळ पेन्सिलचा वापर करू नये. कारण यामुळे तुमचे डोळे आणखीनच लहान दिसतील.

4. सोडा वॉटर फेस वॉशप्रमाणे वापरता येतो का?

होय, सोडा वॉटरच्या वापरामुळे कांतीवर एक वेगळीच चमक येते. याच कारणामुळे सोडा हे महिलांमध्ये सर्वात आवडते सौंदर्य प्रसाधन बनले आहे. सोडयात कार्बन डायऑक्साईड असतो, ज्यामुळे निर्माण होणारे बुडबुडे त्वचेला व त्यावरील छिद्रांना खोलवर स्वच्छ करते. याने मृत त्वचा नाहीशी होते, तसेच त्वचेत घट्टपणासुद्धा येतो. एक चमचा सोडा वॉटरमध्ये पाणी मिसळून कापसाच्या बोळयाने चेहऱ्याला लावा. थोडया वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

5. माझ्या ओठांच्या आसपास अनेकदा पांढरी त्वचा दिसू लागते. माझे ओठही रुक्ष व पिवळे आहेत. लिपस्टिक लावल्यावर बाजूची त्वचा पांढरी दिसू लागते. मी काय करू?

ओठांच्या चहूबाजूंचा रुक्षपणा नाहीसा करण्यासाठी रात्री झोपण्याआधी ओठांना लोणी किंवा तूप लावा. पिवळेपणा नाहीसा करायला गुलाबाच्या पाकळया वापरा. यामुळे ओठांचा नैसर्गिक ओलावा कायम राहतो व ओठांना गुलाबी बनवतो. एका बाऊलमध्ये गुलाबाच्या पाकळया घ्या. त्यावर कच्चे दूध ओतून काही तास तसेच ठेवा. यानंतर चांगले कुस्करून त्याची पेस्ट तयार करून ते ओठांवर लावा. १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.

6. मी ३० वर्षीय काम करणारी महिला आहे. माझी त्वचा खूप ऑयली आहे. समस्या ही आहे की माझ्या नाकावर ब्लॅकहेड्स आहेत आणि गालांच्या     बाजूंवर व्हाईटहेड्स आहेत. यामुळे माझा चेहरा खूप खराब दिसतो. शिवाय मला   पार्टी किंवा लग्नसमारंभात जायलसंकोच वाटतो. मी नेहमी हे हाताने दाबून काढते. पण यामुळे मला खूप वेदना जाणवतात व हे परत दिसू लागतात. सांगा  मी काय करू?

ब्लॅकहेड्स नाहीसे करायला एक बटाटा किसून घ्या व प्रभावित जागेवर थोडा वेळ चोळा. मग सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. व्हाईटहेड्ससाठी ६-७ बदाम बारीक करून घ्या. यात गुलाबजलाचे थोडे थेंब मिसळून पेस्ट तयार करा व व्हाईटहेड्सवर लावा. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवा.

7. दीर्घ काळापासून मी साबणाने चेहरा धुते पण काही दिवसांपासून माझा चेहरा रुक्ष दिसू लागली आहे. मी काय करायला हवे?

शरीराच्या इतर भागांपेक्षा चेहऱ्यांची त्वचा नाजूक असते. म्हणून आपल्या त्वचेच्या गरजेनुसार आणि प्रकारानुसार फेस वॉश वापरा. घरगुती उपचार म्हणून तुम्ही हे वापरू शकता – एका मोठया बाऊलमध्ये ४ मोठे चमचे बेसन व १ लहान चमचा ताजी साय एकत्र करा. घट्ट पेस्ट तयार करून त्वचेवर लावा. २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें