गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २६ वर्षांची विवाहित महिला आहे. लग्नाला ३ वर्षे झाली आहेत पण अजूनही मला गर्भधारणा होऊ शकलेली नाही. यासाठी आता मी सेक्स करताना खाली उशीदेखील ठेवते आणि वीर्यपतनानंतर बराच वेळ पतीला त्याच स्थितीत राहण्यास सांगते. तरीही गर्भधारणा होऊ शकलेली नाही तथापि माझी मासिक पाळी नियमित येत आहे आणि आम्ही नियमितपणे सेक्सदेखील करतो. मला सांगा मी काय करू?

संभोगादरम्यान वीर्यपतनाच्या वेळी पुरुषाच्या लिंगातून शुक्राणू अतिशय वेगाने बाहेर पडतात आणि खोलवर पोहोचतात. जे शुक्राणू मजबूत नसतात ते योनीतून बाहेरदेखील पडतात, परंतु यामुळे गर्भधारणेच्या प्रक्रियेत काही फरक पडत नाही. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि यामुळे घाबरण्याची गरजही नाही.

जर तुमच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या बरोबर असेल, तुमची मासिक पाळी नियमित असेल, तर तुम्हाला गर्भधारणा न होण्यामागे दुसरे काही वैद्यकीय कारण असण्याची शक्यता आहे. हे कारण तुमच्यात किंवा तुमच्या पतीमध्ये दोघांपैकी कोणामध्ये ही असू शकते.

उत्तम हेच होईल की तुम्ही कोणा स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा आणि प्रजनन क्षमतेबद्दल बोलावे तरच तुम्ही लवकर गर्भधारणा करू शकता.

मी २४ वर्षांचा आहे आणि माझी मैत्रीण २५ वर्षांची आहे. मागील काही दिवसांत मी कंडोम न लावता मैत्रिणीसोबत २-३ वेळा सेक्स केला होता. तथापि मैत्रिणीने ७२ तासांच्या वैद्यकीय मर्यादेतच इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळी घेतली पण आता आम्हा दोघांचे टेन्शन वाढले आहे. मैत्रिणीला २० ते २७ दिवसांच्या दरम्यान मासिक पाळी येते, जी यावेळी आली नाही. ती गर्भवती आहे का?

इमर्जन्सी गोळया या कंडोमप्रमाणेच गर्भधारणा रोखण्याचे एक साधन आहे, परंतु त्या सहसा तेव्हा घेतल्या जातात जेव्हा लैंगिक संबंध उत्स्फूर्तपणे झाला असेल आणि त्या दरम्यान कुठल्याही गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब केला गेला नसेल.

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी समागमानंतर ७२ तासांच्या आत घ्यायची असते. ७२ तासांपूर्वी घेतल्यास गर्भधारणेची शक्यता बऱ्याच प्रमाणात टाळता येते,

तुमच्या मैत्रिणीने इमर्जन्सी गोळी घेतल्याने तिच्या रक्तातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले असण्याची शक्यता आहे. तिची मासिक पाळी उशिरा येण्याचीही शक्यता आहे.

तुम्ही तुमच्या मैत्रिणीला युरिन प्रेग्नेंसी टेस्ट करायला सांगितल्यास बरे होईल. ती घरीही सहज करता येते.

सेक्समध्ये उतावळेपणा करणे किंवा घाई करणे योग्य नसते आणि कंडोमशिवाय सेक्स केल्यास नवीन समस्या उद्भवते. त्यामुळे भविष्यात जेव्हाही तुम्ही लैंगिक संबंध ठेवाल तेव्हा कंडोम अवश्य वापरा जेणेकरून तुम्हा दोघांनाही न घाबरता सेक्सचा आनंद घेता येईल आणि नंतरही कसले टेन्शन येणार नाही.

मी ३१ वर्षांची विवाहित महिला आहे. आम्हाला २ मुलं आहेत आणि आम्ही सासू-सासरे, दीर-जाऊ आणि त्यांच्या मुलासोबत एकाच छताखाली राहतो. माझ्या जाऊ छोटया-छोटया गोष्टींवरून माझ्याशी भांडतात आणि सासूचे कान भरत राहतात. मी एक खुल्या विचाराची स्त्री आहे तर जाऊ परंपरावादी आणि कमी शिकलेली आहे. त्या रोज माझ्याशी भांडत असतात. घरी जाऊशी वारंवार भांडण होत असल्याने आम्हांला वेगळया घरात राहायला हवे का? यासाठी सासू मला मनाई करते, पण जाऊचे बोलणे सहन करायलाही सांगते. मला माझ्या पतीशी याबद्दल बोलायचे आहे पण कधी बोलू शकले नाही कारण, त्यांना आई-वडिलांना सोडून वेगळे राहायचे नाही. मला सांगा मी  काय करू?

जर सलोख्याचे सर्व मार्ग बंद असतील आणि घरगुती क्लेश वारंवार होत असतील तर वेगळं राहण्यात काहीच नुकसान नाही, पण त्याआधी तुम्ही सार्थक पुढाकार घेतल्यास घरात समाधान आणि शांतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं.

सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की परस्पर भांडणाचे खरे कारण काय आहे? सामान्यत:, घरगुती भांडण, बजेटमधील भागीदारी, स्वयंपाकघरात कोण किती काम करेल, घरातील कामांचे वितरण इत्यादीशी संबंधित असते. कधी-कधी एकमेकांचा मत्सर केल्यानेही परस्परांमध्ये वितुष्टाचे वातावरण निर्माण होते.

भांडणाचे खरे कारण जाणून घेतल्यानंतर समेट करण्याचा प्रयत्न केला जाणे चांगले असेल, सासू आणि पतीकडून जाऊंच्या भांडणखोर स्वभावाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास परस्पर संबंध सुधारू शकतात. जाऊ कमी शिकलेली आहे, त्यामुळे हे देखील एक कारण असण्याची शक्यता आहे. त्यांच्यात तुमच्याबद्दल न्यूनगंड असू शकतो. योग्य वेळ साधून जाऊंशी बोलणेसुद्धा चांगले असेल.

जर सासू तुम्हाला वेगळया घरात जाण्यास नकार देत असतील तर साहजिकच त्या तुम्हाला आणि जाऊंना अधिक चांगल्या प्रकारे ओळखत असतील, त्यामुळे फक्त तुमच्या सासूच योग्य निर्णय घेऊ शकतील.

१-२ गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर संयुक्त कुटुंब ही आजच्या काळाची गरज आहे, ज्यात राहून प्रत्येकजण आपल्या स्वप्नांना पंख लावून उडू शकेल.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : माझं वय २६ वर्षे आहे. मला मासिक पाळीच्या वेळी खूप त्रास होतो. असह्य होऊन मी डॉक्टरकडे गेले. तेव्हा डॉक्टरने अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला दिला. जेव्हा अल्ट्रासाउंड करून घेतलं, तेव्हा डॉक्टरने एक गाठ असल्याचं सांगितलं. हा रिपोर्ट पाहून डॉक्टरने मला तीन महिने औषध घ्यायला सांगितलं. आता मी बरी आहे. पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की लग्नानंतर मला आई बनण्यात अडथळा येईल. याचा अर्थ काय? मी पुन्हा अल्ट्रासाउंड करवून घ्यावं का? डॉक्टरांच्या सांगण्यामुळे मी चिंतेत आहे. मी काय करू?

उत्तर : तुमच्या प्रश्नामध्ये हे स्पष्ट केलेलं नाही की पाळीदरम्यान तुम्हाला नक्की काय त्रास होतो. तुमची पाळी उशिराने येते आणि कमी रक्तस्राव होतो की यावेळी तुम्हाला पेल्विकमध्ये वेदना होतात की तुम्हाला आणखी काही त्रास होतो? तुम्ही पेल्विक अल्ट्रासाउंडमध्ये ज्या गाठीचा उल्लेख केला ती विविध प्रकारची असू शकते. तिचा संबंध विविध रोगांशी असू शकतो.

तुम्ही तुमच्या समस्येबाबत सविस्तर लिहिलंत आणि तुमचा पेल्विक अल्ट्रासाउंडचा रिपोर्ट पाठवला तर बरं होईल, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं गांभीर्य समजून आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकू.

तिसऱ्यांदा अल्ट्रासाउंड करायचं की नाही याचा निर्णयही आजाराची माहिती मिळाल्यानंतरच घेता येईल. अल्ट्रासाउंडसारखी कोणतीही तपासाणी करण्यामागचा उद्देश एकच असतो की डॉक्टरला आजाराचं योग्य निदान करता येईल आणि उपचार सुरू होतील.

प्रश्न : माझ्या मुलीचं वय ११ वर्षे आहे. काही महिन्यांपासून तिची छाती भरू लागली आहे. मी तिला जेव्हा अंघोळ घालते, तेव्हा ती शरीराच्या त्या भागाला हात लावू देत नाही. तिथे वेदना होतात असं ती सांगते. हे नॉर्मल आहे की मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. इतक्या लहान वयात स्तनांचा विकास व्हायला सुरूवात होणं योग्य आहे का?

उत्तर : बऱ्याचदा मुली वयात येण्याचं वय हे ८ ते १३ वर्षे असतं. शरीरात सेक्स हार्मोन्स बनायला सुरूवात झाली की हळूहळू नारीत्त्वाच्या शारीरिक खुणा प्रकट होऊ लागतात. स्तनांचा आकार वाढतो. कामेंद्रियांचा विकास होतो. काखेत आणि नाभीच्या खाली केस उगवू लागतात. अंतर्गत जननांग म्हणजेच गर्भाशयाच्या आकारात वाढ होते, तसेच क्रियात्मक दृष्टीनेही परिवर्तन येऊ लागते. मुलगी रजस्वला होते.

प्रजनन इंद्रियांमध्ये प्रौढत्त्व येण्याचा एक क्रम असतो. बऱ्याचदा मुलींमध्ये या परिवर्तनाचे पहिले लक्षण स्तन विकासाच्या रूपात दिसून येते. ८ ते १३ वयात सुरू झालेली स्तन विकासाची प्रक्रिया ५ टप्प्यांमध्ये पूर्ण होते. सर्वात आधी स्तनाग्र म्हणजे निपल आणि त्याच्या भोवतीचे गुलाबी वर्तुळ एरिओलामध्ये रक्तप्रवाह वाढतो. मग ते वर्तुळ वाढते आणि स्तनकळी दिसू लागते. पुढच्या टप्प्यात दोघांचाही आकार वाढतो. चौथ्या टप्प्यात स्तनाग्र आणि त्याच्या भोवतीचे वर्तुळ विकसित होऊन स्तनापासून वर येते. शेवटच्या टप्प्यात स्तनाचा आकार वाढतो. यामुळे स्तनाग्राच्या भोवतीचे वर्तुळ पुन्हा स्तनावर उठून दिसते आणि फक्त स्तनाग्र पुढच्या बाजूला वर येते.

जेव्हा स्तनकळी विकसित होत असते, तेव्हा शरीराच्या या भागाला स्पर्श केल्यास वेदना होणे साहजिक आहे. त्यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. पण ही अतिरिक्त संवेदनशीलता टाळण्यासाठी तुम्ही मुलीला स्पोर्ट्स ब्रा घालण्याचा सल्ला देऊ शकता.

प्रश्न : माझं वय २० वर्षं आहे. मला कायम अॅसिडिटी आणि गॅसचा त्रास होत असतो. मी काही दिवस डॉक्टरचे उपचारही घेतले. घरातल्या वडिलधाऱ्यांच्या सांगण्यावरून घरगुती उपायही करून पाहिले. पण काहीच फरक पडला नाही. काहीतरी उपाय सांगा.

उत्तर : अॅसिडिटी आणि गॅसचा संबंध तुमच्या जीवनशैलीशी आहे. आपण काय खातो, कसं खातो, किती तणावाखाली राहतो, कसे कपडे घालतो, आपला दिनक्रम कसा असतो अशा सगळयाचा आरोग्यावर परिणाम होतो. खाण्याच्या बाबतीत थोडीफार पथ्य पाळा, टेबल मॅनर्सवर लक्ष द्या. दिनक्रमामध्ये छोटे-छोटे बदल घडवून आणा.

तेलकट पदार्थ आणि अधिक चरबीयुक्त पदार्थांमुळे असिडिटी होते. टॉमेटो, कांदा, लाल मिरची, काळी मिरची, संत्रे, मोसंबी, चॉकलेट इत्यादींपासून दूर राहा. याचप्रकारे काही फळभाज्या आणि फळे यांमुळेही गॅस होतो. शेंगा, फ्लॉवर, मुळा, कांदा, कोबी यांसारख्या भाज्या आणि सफरचंद, केळं आणि जर्दाळू यांमुळेही पोटात गॅस होतो. प्रथिने बाधक ठरतात. सिझलर्ससारख्या गरम-गरम सर्व्ह होणाऱ्या पदार्थांमुळेही गॅस होतो. त्यामुळे असे पदार्थ टाळा. जेवताना काही टेबल मॅनर्स पाळणेही महत्त्वाचे आहे. जेवताना छोटे-छोटे घास घ्या. पचपच आवाज करत खाल्यामुळेही बरीचशी हवा आत जाते. पाणी किंवा इतर पेये पिताना घाई करू नका.

पूर्ण दिवस एकाच जागी बसून राहण्यापेक्षा थोडया-थोडया वेळाने फेऱ्या मारणं आतडयांसाठी चांगलं असतं. ताणावर नियंत्रण असणंही आवश्यक आहे. व्यायाम, हास्य इत्यादींमुळे ताणातून मुक्ती मिळते.

ओव्हर द काउंटर औषधांमध्ये एन्टासिड किंवा गोळया उदा. डायजिन, म्युकेन, जेल्यूसिल आणि आम्लरोधी औषधं उदा. रेनिटिडिन, पँटोप्राजोल, लँसोप्राजोल आणि ओमेप्राजोल यामुळे आराम मिळू शकतो. यामुळे बरं वाटलं नाही तर एखाद्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें