समर-स्पेशल : कूल आणि ब्युटीफूल लुक उन्हाळ्यातही

* मोनिका गुप्ता

उन्हाळयात मेकअप पसरू नये म्हणून काय करता येईल? गरम कमी व्हावे म्हणून कोणते कपडे घालावेत, स्वत:ला टॅन फ्री कसे ठेवावे, असे अनेक प्रश्न प्रत्येक मुलगी, महिलेच्या मनात उपस्थित होतात, तेव्हा चला जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं.

समर ड्रेस

इंडियन लुक हवा असेल तर तुम्ही स्ट्रेट कुर्ती, फ्लोरल कुर्ती ट्राय करू शकता. या मोसमात सुंदर दिसण्यासाठी आणि टॅनिंगपासून वाचण्यासाठी कुर्ती सर्वात बेस्ट पेहेराव आहे. तुम्ही तुमच्या इंडियन लुकला ब्लॅक बिंदी आणि कलरफूल झुमक्यांनी कम्प्लिट करू शकता.

वेस्टर्न ट्राय करायचे असेल तर जंपसूट, रॅपरोन स्कर्ट, डेनिम शॉर्ट्सोबत व्हाईट टॉप आणि प्लाझा ट्राउझरसह तुम्ही क्रॉप टॉप ट्राय करू शकता. यात तुम्ही ब्युटीफुल आणि स्टायलिशही दिसाल.

उन्हाळ्यात कपडे घ्या पारखून

पेहेराव नेहमीच मोसमानुसार असावा. पण एखादा ड्रेस आवडल्यास आपण तो पटकन खरेदी करतो. तो ड्रेस कोणत्या कपडयापासून शिवला आहे याकडे लक्ष देत नाही. प्रत्यक्षात मोसमानुसारच कपडयांची खरेदी करावी. उन्हाळयात कॉटन, हँडलूम, खादी, जॉर्जेट इत्यादी कपडे घालावेत. ते घाम शोषून घेतात, शिवाय शरीरालाही थंडावा देतात.

रंगांकडे द्या विशेष लक्ष

उन्हाळयात डोळयांना त्रासदायक ठरणार नाहीत अशा रंगांचे कपडे असावेत. फिकट रंगाचे कपडे घातल्याने गरम होत नाही. ते थंडावा देतात. उन्हाळयात सफेद, निळया, गुलाबी, पिवळया, हिरव्या रंगाच्या कपडयांची तुम्ही निवड करू शकता.

टॅनिंगपासून राहा दूर

हिवाळयात त्वचा कपडयांच्या आत लपवता येते. पण उन्हाळयात हे शक्य नसते. उन्हाळयात आपण सैलसर कपडे घालणे अधिक पसंत करतो. यामुळे टॅनिंग होऊ शकते. त्वचेचा सूर्यप्रकाशाशी जास्त वेळ संपर्क आल्याने टॅनिंगची समस्या निर्माण होते. सूर्याची प्रखर किरणे त्वचेचे नुकसान करतात. टॅनिंगपासून वाचण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता :

* आठवडयातून तिनदा स्क्रब अवश्य करा.

* घरातून बाहेर पडण्याच्या पंधरा मिनिटे आधी सनस्क्रीन अवश्य लावा.

* हळदीत लिंबाचा रस आणि दूध मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण टॅनिंग झालेल्या जागेवर लावा. ते सुकल्यावर किंचित ओल्या हातांनी ५ मिनिटे रब करा.

* पपई कुस्करून त्वचेवर लावा. यामुळे  टॅनिंग दूर होईल आणि त्वचेला पोषणही मिळेल.

* चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी बर्फाचाही वापर करता येईल. बर्फाने चेहऱ्यावर ५ मिनिटे मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होईल आणि चेहराही खुलून दिसेल.

* चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबूही लाभदायक आहे. लिंबाला दोन भागात कापून त्याने चेहऱ्यावर मसाज करा.

समर मेकअप टीप्स

उन्हाळयात घामामुळे मेकअप लवकर खराब होतो. यासाठी देत आहोत काही टीप्स ज्यामुळे उन्हाळयातही मेकअप जास्त काळ टिकून राहील.

* उन्हाळयात त्वचा खूपच तेलकट होते. यामुळे परफेक्ट मेकअप करता येत नाही. त्यामुळे ऑईल कंट्रोल फेसवॉश वापरा. मेकअप करण्यापूर्वी बर्फाने चेहऱ्यावर मसाज करा.

* कुठलेही तेलकट प्रोडक्ट वापरू नका.

* लिक्विड फाउंडेशनचा वापर टाळा. फाउंडेशन वापरायचेच असेल तर स्किन टोननुसारच त्याची निवड करा. फाउंडेशन लावताना त्यात सनस्क्रीन अवश्य मिक्स करा.

* डोळयांसाठी काजळ नेहमीच स्मज फ्री निवडा. काजळ लावल्यानंतर डोळ्यांखाली हलकीशी पावडर लावा. यामुळे काजळ पसरणार नाही.

* मस्करा नेहमीच वॉटरप्रुफ किंवा ट्रान्सपरंटच लावा.

* ब्लशसाठी मॅट लिपस्टिकच्या पीच किंवा पिंक कलरचा वापर करू शकता. तो गालांवर सेट झाल्याने नॅचरल लुक देईल.

* लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर वॅसलीनने मसाज करा. त्यानंतर लिपस्टिक लावा. उन्हाळयाच्या मोसमात मॅट लिपस्टिक सर्वात चांगली समजली जाते, कारण ती लवकर स्मज होत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें