विणकाम अशा प्रकारे बनवा स्टायलिश

* गरिमा पंकज

हाताने केलेल्या विणकामाचा हंगाम नव्याने आला आहे. ज्यांना याची आवड आहे ते वेळात वेळ काढून आपल्या प्रियजनांसाठी हिवाळयात सुंदर भेटवस्तू म्हणजे हाताने विणलेले स्वेटर नक्कीच बनवतात. आजकाल तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. सोबतच विणकाम इत्यादी जुन्या कलाही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, पण जर तुम्हाला विणकामाची आवड असेल तर हा छंद तुमच्या मानसिक आरोग्यासाठी वरदान ठरू शकतो. त्यासाठी त्यात सातत्य ठेवा आणि त्याचा प्रचार करत रहा.

जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट विणण्याची इच्छा होते तेव्हा आजच्या फॅशन ट्रेंडबद्दल जागरुक असणे खूप गरजेचे ठरते. तुम्ही जे काही विणकाम कराल ते फॅशन ट्रेंडमध्ये असेल, तरच सर्वांच्या नजरा त्यावर खिळतील आणि तुमची मेहनतही फळाला येईल, कारण आजकाल अबालवृद्ध सर्वांनाच स्टायलिश आणि स्मार्ट दिसायचे असते. चला, जाणून घेऊया, विनकामात सध्या कोणता नवीन ट्रेंड आहे :

महिलांसाठी

सेल्फ-पॅटर्नचे हुडेड स्वेटर ट्रेंडमध्ये आहेत. नोकरदार महिलांसोबत महाविद्यालयात जाणारी तरुणाईही अशा डिझाइन्सचे स्वेटर पसंत करतात.

डिटेचेबल डिझाईन्स असलेले संपूर्ण बाह्यांचे स्वेटर्सही आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. मुलींसोबत मुलांनाही ते खूप आवडतात. यातील पुढचा भाग रॉयल निळा, मरून, गडद राखाडी किंवा जांभळा इत्यादी गडद छटांमध्ये विणलेला असतो आणि स्लीव्हजसोबत हुडीज मल्टीकलर कॉम्बिनेशन असते. मुलगा आणि मुलीनुसार रंगाची निवड केली जाऊ शकते.

गोल गळयाचे कधीही वापरता येणारे पुलोवर

मुलगा असो किंवा मुलगी, आजकाल प्रत्येकाची पहिली पसंती गोल आकाराचा गळा असलेले स्वेटर असते. हिवाळयात ते खूपच आरामदायक ठरतात. विणण्यासाठी फारसा वेळही लागत नाही. प्रिंटेड लोकर किंवा आवडीचा रंग, डिझाईनचा वापर करून तुम्ही ते पुढून बंद करू शकता किंवा गळा उघडाही ठेवू शकता. याच्यावर जाकीट खुलून दिसते.

मुलांसाठी

कॉलर नसलेला स्वेटर कोट हा गळा व्यवस्थित आकारात कापून डबल बॉर्डरने विणला जातो. तो किशोरवयीन मुलांना खूपच छान दिसतो. तो मिश्र रंगातही विणता येतो.

सदाबहार स्वेटर कोट

स्वेटर कोटचा ट्रेंड कायम असतो, फक्त त्याच्या आकारात बदल होत राहतो. विणकामाची आवड असणारे कल्पकतेचा वापर करून हा स्वेटर अतिशय सुंदर डिझाईनमध्ये तयार करू शकतात.

कॉलर नसलेला गोल आकार : थोडासा छोटा गळा बनवून किंवा गळयाकडे हलकेसे कापून गळयाचा आकार बनवा. मुलांसाठी पार्टी किंवा अन्य कार्यक्रमात हा कोट ब्लेझरसोबत घातल्यास खूपच सुंदर दिसतो. पुरुषांसाठी लोकर निवडताना निळा, सौम्य आकाशी, काळा इत्यादी रंग तुम्ही निवडू शकता.

मुलींसाठी : लाल, गुलाबी, गडद मरून, पिवळा, मजेंडा, सौम्य भगवा इत्यादी रंगाच्या लोकरीचा वापर करून पुढून काहीसा उघडा, गोल गळयाचा स्वेटर कोट विणता येतो. कमी थंडीत बिनाबाह्यांचा स्वेटर कोटही चांगला दिसतो. त्याला तुम्ही पुढून बंद करून आणि दोन किंवा एक मॅचिंग पाकीट बनवून अधिक आकर्षक बनवू शकता.

गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट आणि मॅचिंग बूटसोबत तो फारच सुंदर दिसतो.

कॉलर नसलेल्या गोल आकाराच्या स्वेटरसोबतच लांबलचक श्रग आणि मॅचिंग स्कार्प मुलींसाठी खूपच ट्रेंडमध्ये आहेत.

प्रौढ किंवा वृद्ध महिलांसाठी स्वेटर कोट खूपच उत्तम ठरतात. ते थंडीपासून रक्षण करतात, सोबतच दिसायलाही आकर्षक असतात. लांबलचक कोट कार्डिगन कमरेपासून गुडघ्यांपर्यंत ऊबदारपणा देतात.

सदाबहार टोपी आणि स्कार्फ

हे पटकन विणून होतात. विविधरंगी लोकरींपासून ते बनवता येतात. थंडीत ते ट्रेंडमध्ये असतात. विविद्य रंग आणि आकारांच्या कॅप आणि स्कार्फने मुलींचा वॉर्डरोब भरलेला असतो. मोठया लोकरीच्या टोप्याही ट्रेंडमध्ये आहेत, ज्या पटकन विणून होतात.

अशा प्रकारे तुम्ही हिवाळयातही स्मार्ट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसू शकता. त्यासाठी फॅशन ट्रेंड आणि आपला बांधा लक्षात घेऊन कपडयांची निवड करा. त्यामुळे थंडीपासून रक्षण होईल, सोबतच तुम्ही ट्रेंडी आणि सुंदर दिसाल

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें