भाड्याने घ्या लग्नाचा सुंदर पोशाख

* पूनम वर्मा

प्रत्येक वधूसाठी लग्नाचा दिवस खूप खास असतो. वधू या खास प्रसंगी सौंदर्य खुलवण्याची एकही संधी सोडत नाही, परंतु जेव्हा वधूसाठी लग्नाचा पोशाख खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा ती मनाला मुरड घालू लागते.

उदाहरणार्थ, कोणाला डिझायनर मनीष मल्होत्रा किंवा नईम खान, तरुण तेहलानी यांनी डिझाईन केलेला लग्नाचा पोशाख परिधान करावासा वाटतो, तर कोणाला करिना कपूर खानच्या चित्रपटातील लग्नाचा पोशाख तिच्या लग्नात घालायचा असतो, पण याची किंमत लाखोंची आहे. प्रत्येकाला तो खरेदी करणे परवडत नाही. कधी वाटतं फक्त एका दिवसासाठी हजारो, लाखो रुपये कपडयांवर खर्च करणं योग्य आहे का? दुसरीकडे असेही वाटू लागते की, लग्नानंतर इतके महागडे कपडे काय करायचे, आपण ते पुन्हा घालूही शकत नाही.

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासोबतच आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही तुम्हाला लग्नातील पोशाख विकत घेण्याऐवजी भाडयाने घेण्याचा एक स्मार्ट मार्ग सांगत आहोत, जेणेकरुन जास्त पैसे खर्च न करता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लग्नाचा पोशाख निवडू शकता.

शहरे आणि खेडयातील सुशिक्षित मुलींना आता माहीत आहे की, कोणते कपडे कोणी डिझाइन केलेले आहेत आणि ते कसे आहेत.

ऑनलाइन भाडयाने मिळतात लग्नाचे कपडे

लग्नाचे पोशाख अनेक दुकानांमध्ये भाडयाने मिळत असले तरी त्यांची संख्या खूपच कमी आहे, तर काही खास ऑनलाइन वेबसाइटवरून तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून स्वत:साठी लग्नाचे कपडे मागवू शकता.

विविधतेसोबतच, तुम्हाला या वेबसाइट्सवर खास डिझायनर पोशाखदेखील सहज मिळतील. लग्नाचे पोशाख ऑनलाइन भाडयाने देण्याच्या वेबसाइटसाठी गूगलवर सर्च करा.

लग्नाच्या पोशाखांबरोबरच, यापैकी काही वेबसाइट्स वधूचे दागिने आणि हँड बॅग, सँडल इत्यादीही भाडयाने देतात.

लग्नाच्या पोशाखाचे मिळतील विविध प्रकार

दुकानांप्रमाणे, भाडयाने लग्नाचे पोशाख उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाइट्सवर, तुम्हाला लग्नाच्या पोशाखांमध्येही भरपूर वैविध्य मिळेल, जसे वधूचा लेहेंगा चोली, लग्नाची साडी, सरारा, साडी गाऊन, ब्राइडल अनारकली, इंडो वेस्टर्न ब्रायडल वेअर इ. काही वेबसाइट्सवर, संगीत, मेहंदी, हळदी, रिसेप्शन इत्यादीसाठीही प्रसंगानुसार पोशाख उपलब्ध आहेत, तर काही वेबसाइट्सवर तुम्हाला अभिनव मिश्रा, अनिता डोंगरे आणि बॉलीवूड अभिनेत्रींसारख्या डिझायनर्सच्या लुकसह लग्नाचे पोशाख मिळतील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लग्नाचे कपडे निवडता येतात.

किती असेल पोशाखाची किंमत?

वेगवेगळया वेबसाइट्सवर लग्नाच्या पोशाखांचे वेगवेगळे दर असले, तरी काही वेबसाइटसवर तुम्हाला ५० हजार रुपयांचे पोशाख ४ ते ५ हजार रुपयांना भाडयाने मिळू शकतात, तर काही वेबसाइट्सवर यापेक्षा कमी किंवा जास्त किंमत असते. तुम्हाला भाडयासोबत अनामत रक्कमही भरावी लागेल. काही वेबसाइट्सवर ठेव रक्कम भाडयाच्या रकमेच्या दुप्पट असते, जी अर्थातच पोशाख वापरून परत केल्यावर तुम्हाला परत केली जाते.

तुम्हाला मिळेल तुमच्या साईजचा पोशाख

ज्याप्रमाणे तुम्ही ऑनलाइन खरेदी करताना तुमच्या साईजचा पोशाख निवडता, त्याचप्रमाणे लग्नाचे कपडे भाडयाने खरेदी करताना, तुम्हाला तुमच्या साईजची माहिती ऑनलाइन द्यावी लागेल. तरीही जर लग्नातील पोशाख तुमच्या तुम्हाला बरोबर बसत नसेल तर तुम्ही तुमचे माप देऊन तो अल्टर करून घेऊ शकता.

चाचणीचीही सोय आहे

तुम्ही ज्या दिवशी ऑर्डर देत आहात त्याच दिवशी तुम्हाला तो पोशाख पाहण्यास किंवा परिधान करण्यास मिळेलच असे नाही. भाडयाने पोशाख घेण्यापूर्वीही, तुम्ही तो घरी ट्रायल अर्थात चाचणीसाठी मिळवू शकता. अनेक वेबसाइट होम ट्रायलसाठी पोशाख मोफत घरी पाठवतात, तर काही शिपिंग शुल्क आकारतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेबसाइट्स निवडू शकता.

तुम्हाला कधी मिळेल पोशाख?

लग्नाचे कपडे भाडयाने घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही ज्या दिवसासाठी तो बुक करता त्याच दिवशी तो तुमच्या घरी पोहोचवला जातो. काही वेबसाइट्सवर किमान १ किंवा २ दिवस अगोदर पोशाख बुक करणे आवश्यक असते, काही वेबसाइट्स आहेत ज्या बुकिंग केल्यानंतर ३ तासांच्या आत देखील पोशाख वितरित करतात.

तुम्ही हे पोशाख १ दिवसापासून ते ८ दिवसांपर्यंत तुमच्याकडे ठेवू शकता. सर्व वेबसाइट्स आपापल्या परीने पोशाखाचा दिवस ठरवतात. काही ठिकाणी २ किंवा ७ दिवसही पोशाख मिळायला लागतात. काही ठिकाणी पोशाख परत करण्यासाठी तुम्हाला कोणतेही प्रयत्न करण्याची गरज नाही, ते तुमच्या घरी येतात आणि ते स्वत: घेऊन जातात.

पेमेंट कसे करावे

बुकिंग दरम्यान तुम्हाला कोणतेही पेमेंट किंवा डिपॉझिट म्हणजे अनामत रक्कम देण्याची गरज नाही. ऑनलाइन शॉपिंग प्रमाणेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅश ऑन इत्यादी पेमेंटच्या अनेक पद्धती आहेत. तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायही निवडू शकता. अनेक वेबसाइट मोफत शिपिंग देतात तर काही शिपिंग शुल्क आकारतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवड करू शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

नमूद केलेल्या संकेतस्थळांना भेट देऊन, तुम्ही लग्नातील पोशाख, त्याचे भाडे, ऑर्डर करणे, घालून बघणे आणि परत करणे याबद्दल सर्व माहिती पाहू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही वेबसाइटवर दिलेल्या फोन नंबरवर देखील कॉल करू शकता. त्याचप्रमाणे, काही साइट्सवर लाइव्ह चॅटचा पर्याय देखील आहे, म्हणजेच तुम्ही लाइव्ह चॅटदेखील करू शकता.

सवलतीही आहेत उपलब्ध

लग्नाचे कपडे भाडयाने देणाऱ्या वेबसाइटवर अनेक ऑफर म्हणजे सवलतीही देतात. जसे की, तुम्हाला वधूचे दागिने किंवा अॅक्सेसरीज मोफत मिळतील (भाडयावर) म्हणजे तुम्हाला त्याचे भाडेही द्यावे लागणार नाही. काही वेबसाईट्सवर अशाही ऑफर आहेत की, जर तुम्ही दुसऱ्यांदा भाडयावर पोशाख खरेदी करत असाल तर तुम्हाला पैशांची काही सूट मिळू शकते. काही वेबसाइट्सवर, कूपन कोडद्वारे भाडयात सवलत उपलब्ध आहे.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें