होली स्पेशल- होळीची रंगत स्वादिष्ट पदार्थांसंगत…

* प्रतिनिधी

मावा कचोरी

साहित्य

* २-२ मोठे चमचे काजू, पिस्ता, बदाम आणि अक्रोडाचे तुकडे

* अर्धा लहान चमचा तूप

* १ कप खवा

* ४ मोठे चमचे साखर

* अर्धा लहान चमचा हिरवी वेलची पावडर

* थोडेसे केशर

* ५-६ तयार कचोरी

* साखरेचा पाक व ड्रायफ्रूट्स सजविण्यासाठी

कृती

एका नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता त्यामध्ये टाकून २ मिनिटं परता. आता त्यामध्ये खवा व्यवस्थित मिसळा. मग गॅसवरून खाली उतरवून त्यामध्ये वेलची पावडर, केशर आणि साखर घालून चांगलं मिसळून घ्या. मिश्रण थंड झाले की याचे लहान लहान गोळे बनवा आणि कचोरी फोडून त्यामध्ये भरा.

पाकाची कृती

एका पॅनमध्ये साखर आणि पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये वेलची पावडर आणि केशर मिसळून गॅस कमी करा. पाक थोडासा घट्ट झाला की गॅस बंद करा. कचोरी देताना त्यावर १ चमचा पाक टाका आणि थोड्याशा ड्रायफ्रूटने सजवून सर्व्ह करा.

 

रो खीर

साहित्य

* ५० ग्रॅम ताज्या गुलाबांच्या पाकळ्या

* २ लिटर दूध

* १ कप साखर.

कृती

एका जाड बुडाच्या भांड्यात दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या घेऊन उकळत ठेवा. जेव्हा दूध घट्ट होऊन निम्मं होईल तेव्हा गॅस कमी करून सतत ढवळत राहा जेणेकरून ते भांड्याच्या तळाशी लागणार नाही. आता यामध्ये १ कप साखर मिसळून विरघळेपर्यंत उकळत ठेवा. यानंतर दूध गॅसवरून उतरवून खाली ठेवा. अधिक थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. मग सर्व्ह करण्यापूर्वी यामध्ये काही गुलाबाच्या पाकळ्या टाकून थंडथंड सर्व्ह करा.

उत्सवी स्वाद -3

* प्रतिनिधी

1) मेवा मोदक

साहित्य

* २५० ग्रॅम गव्हाचे पीठ
* २०० ग्रॅम काजू, बदाम व पिस्त्याचे तुकडे
* २५ ग्रॅम मनुका
* २५ ग्रॅम मगज
* २५ ग्रॅम डिंक
* १०० ग्रॅम किंवा चवीनुसार पिठीसाखर
* २०० ग्रॅम देशी तूप.

कृती

कढईत तूप गरम करून डिंक तळून घ्या. डिंग फुलताच तो तुपातून काढून घ्या. त्याच कढईत पीठ घालून मंद आंचेवर सोनेरी रंगावर भाजून घ्या. आता यात काजू, बदाम, पिस्ता, मनुका, बिया व डिंक मिसळून वाटून मिक्स करा. २-३ मिनिटे अजून परता. मग साखर मिसळून गॅसवरून खाली उतरा. थोडं गरम असतानाच या मिश्रणाचे मनपसंत आकाराचे मोदक बनवा.

2) लच्छा रोल

साहित्य

* २००ग्रॅम खवा
* ६० ग्रॅम पिठीसाखर
* अर्धा कप अक्रोड
* १ कप बदामाचा कूट
* २०-२५ खारका
* अर्धा कप पिस्त्याचा चुरा
* १५-२० बादाम.

कृती

खारका ४-५ तास पाण्यात भिजवा. मऊ झाल्यानंतर बिया काढून मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवा. अक्रोडही जाडसर वाटा. खवा कढईमध्ये टाकून मंद आचेवर चांगल्याप्रकारे भाजून घ्या. खारकांची पेस्ट व अक्रोड पावडर मिसळून सतत ढवळत अजून थोडे परतून घ्या. जेव्हा मिश्रणाला तूप सुटू लागेल, तेव्हा आचेवरून खाली उतरा. थोडं थंड झाल्यावर साखर मिसळा. तयार खव्याचे मनपसंत आकारात रोल बनवा. ताटात बदामाचा कूट व पिस्ता चुरा पसरवा. रोल्स ताटात ठेवून चांगल्याप्रकारे फिरवा. जेणेकरून बदामाचं कूट व पिस्त्याचा चुरा त्यावर चिकटेल. प्रत्येक रोलवर बदाम ठेवून सर्व्ह करा.

3) काजू स्टार्स

साहित्य

* २०० ग्रॅम खवा
* ५० ग्रॅम साखर
* १ मोठा चमचा काजूचा चुरा
* चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग
* ८-१० केशरच्या काड्या
* आवश्यकतेनुसार पिस्त्याचे काप.

कृती

खवा कुस्करून कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्या. साखरेत थोडेसे पाणी, पिवळा रंग व केशरच्या काड्या मिसळून घट्ट पाक बनवा. मग यात भाजलेला खवा व काजूचा चुरा मिसळून जोपर्यंत मिश्रणाचा एक गोळा बनत नाही, तोपर्यंत परता. मग गॅसवरून उतरवून तूप लावलेल्या ट्रेमध्ये थंड करा. स्टार कटरने कापून स्टार्सचा आकार द्या. प्रत्येक स्टारवर पिस्ता लावा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें