हलकेफुलके पदार्थ

* पाककृती सहकार्य : लतिका बत्रा

चणा चाट

साहित्य

* १ वाटी उकडलेले काबुली चणे

* १ उकडलेला बटाटा

* अर्धा वाटी घट्ट दही

* १ लहान चमचा गोड चटणी

* १ लहान चमचा हिरवी चटणी

* पाव चमचा भाजलेले जिरे

* पाव चमचा चाट मसाला

* पाव लहान चमचा लाल मिरची पूड

* १ कचोरी

* थोडी बारीक शेव सजवण्यासाठी

* थोडी कोथिंबीर सजवण्यासाठी

* तळण्यासाठी तेल

* मीठ चवीनुसार.

कृती

एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि बटाटयाचे चौकोनी तुकडे कापून सोनेरी होईस्तोवर तळून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करून जिरे घाला. जिरे तडमडले की सगळे मसाले यात घाला. नंतर यात उकडलेले चणे घालून व्यवस्थित मिसळा. प्लेटमध्ये कचोरीचा चुरा ठेवा. त्यावर चणे ठेवा नंतर बटाटे सजवून ठेवा. दही घाला. दोन्ही चटण्या टाका वरून चाट मसाला भुरकवा. शेव आणि कोथिंबीरीने सजवा आणि सर्व्ह करा.

कोबी रोल

साहित्य

* १ कोबी मध्यम आकाराचा

* २५० ग्राम पनीर

* १ लहान चमचा तंदूरी मसाला

* १ मोठा चमचा मोझरेला चीज

* थोडे आल्याचे उभे काप

* पाव वाटी मटारचे दाणे

* १ मोठा चमचा तेल

* १ मोठा चमचा तांदळाचे पीठ

* १ मोठा चमचा लिंबू रस

* १ वाटी ब्रेडक्रंब्स

* तळण्यासाठी तेल

* मीठ चवीनुसार.

 

कृती

कोबीची अख्खी पानं वेगळी करून गरम पाण्यात घालून २ मिनिट झाकून मऊ होईपर्यत शिजवा. पाणी काढून ते थंड होऊ द्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून सगळे मसाले घाला. त्यानंतर मटर व बारीक चिरलेले पनीर टाकून चांगले एकत्र मिसळा. आच बंद करून त्यात लिंबाचा रस आणि चीज मिसळा. हे सारण तयार झालं. तांदळाचे पीठ भिजवून चांगले मिश्रण तयार करा. एका एका कोबीच्या पानात मिश्रण भरून चारही बाजूनी ते दुमडून रोल तयार करा. तांदळाच्या भिजवलेल्या पिठात हा रोल बुडवून ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी होईस्तोवर तळा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें