शेफ स्टाईल स्वीट्स

पाककृती सहकार्य : सेलिब्रिटी शेफ रणवीर बरार

गुलाबजाम

पाक बनवण्यासाठी साहित्य

* १ कप साखर

* १ कप पाणी

* थोडीशी वेलची पावडर

* १ चमचा लिंबाचा रस

* २ मोठे चमचे गुलाबपाणी.

गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य

* १ कप मिल्क पावडर

* ४ मोठे चमचे मैदा

* चिमूटभर बेकिंग सोडा

* १ मोठा चमचा रवा

* १ मोठा चमचा तूप

* १ मोठा चमचा दही

* ४-५ मोठे चमचे दूध.

अन्य साहित्य

* तळण्यासाठी तूप किंवा तेल

* गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स.

कृती

एका पॅनमध्ये साखर व पाणी मिसळून मंद आंचेवर जोपर्यंत पाक चिकट होत नाही, तोपर्यंत ढवळत राहा. मग वेलची पावडर टाका. आता क्रिस्टल बनू नयेत म्हणून त्यात लिंबाचा रस मिसळून झकून एका बाजूला ठेवा. मग गुलाबजाम बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये मैदा, मिल्की पावडर, रवा आणि बेकिंग सोडा घालून चांगल्याप्रकारे मिसळा. मग यात तूप व दही मिसळून चांगल्याप्रकारे ढवळत यात दूध मिसळत मऊ पीठ तयार करा. या पिठाचे छोटे-छोटे बॉल्स बनवून ते सोनेरी रंगावर तळून गरम पाकात टाकून ४० मिनिटांसाठी झाकून ठेवा. मग ड्रायफ्रूट्सने सजवून सर्व्ह करा.

 

गुळखोबरे पाक

साहित्य

* थोडेसे किसलेले खोबरे

* पाउण कप गूळ किंवा साखर

* पाउन कप दूध

* अर्धा कप मावा

* थोड्याशा केशरच्या काड्या

* थोडीशी वेलची पावडर
* थोडेसे बदामाचे काप.

कृती

खोबरे सोनेरी होईपर्यंत भाजून ते बाउलमध्ये काढून वेगळे ठेवा. एका पॅनमध्ये थोडेसे पाणी गरम करून गूळ वितळेपर्यंत ढवळा. गूळ वितळेल, तेव्हा त्यात भाजलेले खोबरे घालून चांगल्याप्रकारे मिसळा. मग यात दूध टाकून शिजवा. त्याचबरोबर मावा, वेलची, केशरच्या काड्याही मिसळा. आता गॅस बंद करून वरून बदाम टाका. मग मोल्डला तूप लावून पाक भरा आणि तो जवळपास १ तासासाठी फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर मोल्डमधून काढून आवडता आकार द्या आणि बदामाच्या कापांनी गार्निश करून सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें