आंब्याचे रसरशीत पदार्थ

* प्रतिनिधी

आंब्याची आंबटगोड इडली

साहित्य

* अर्धा छोटा चमचा जलजीरा

* २०० ग्रॅम इडलीचे तयार मिश्रण

* २ मोठे चमचे लोणी

* पाव छोटा चमचा फ्रूट सॉल्ट

* साखर चवीनुसार

* २ आंबे

* पाव छोटा चमचा पांढरे तीळ लोण्यात थोडे भाजून घेतलेले

* अर्धा छोटा चमचा जीरे

* १ छोटा चमचा ओल्या खोबऱ्याचा कीस

* मीठ चवीनुसार.

कृती

आंब्याचा गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. काचेच्या भांड्यात आंब्याचा गर, इडलीचे मिश्रण, साखर, मीठ, पांढरे तीळ. २ मोठे चमचे आंब्याचे बारीक तुकडे मिसळा. मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालून इडली पात्रात थोडे तूप लावून इडली वाफवून घ्या. आंबटगोड इडलीवर तूप किंवा गरम गरम मँगो सॉस घालून सर्व्ह करा.

मँगो टिक्का

साहित्य

* २ आंबे

* थोडी वाटलेली साखर

* ७० ग्रॅम पनीर

* अर्धा छोटा चमचा काळी मिरीपूड

* ५० ग्रॅम चक्का

* पाव छोटा चमचा जलजीरा

* पाव छोटा चमचा भाजलेले व भरड कुटलेले जीरे

* मीठ चवीनुसार.

कृती

आंबा आणि पनीर आवडत्या आकारात कापून घ्या. काचेच्या भांड्यात चक्का, आंबा व पनीरचे तुकडे, साखर, मीठ, काळी मिरी पूड व थोडी जलजीरा पूड घालून व्यवस्थित मिसळून घेऊन फ्रिजमध्ये थंड करून काळी मिरी पूड व जलजीरा घालून मँगो टिक्का सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें