ग्लोइंग मेकअप लुक

* पारुल श्री.

मित्र, पाहुणे, फॅमिली गेट-टुगेदर दरम्यान उत्सवाचं सेलिब्रेशन खास असायला हवे. यासोबतच खास असायला हवा तुमचा लूकदेखील. पारंपरिक वेशभूषेसोबतच या उत्सवाला इंडो वेस्टर्न आऊटफिटसोबत कशा प्रकारचा मेकअप असावा, सांगत आहेत स्किन थेरपिस्ट व मेकअप आर्टिस्ट अल्का गुप्ता :

फेशियल

फेशियलसाठी आपल्या त्वचेच्या अनुरूप फेशियल करा. जर तुमच्या त्वचेला सूट करत असेल, तर रोज वाइन फेशियल करू शकता. यात गुलाबाच्या पाकळयांसोबत वाईन मिसळून फेशियल केले जाते. या फेशियलने मृतत्वचा पेशी हटतात व रक्ताभिसरण वाढते. रेड वाइनमध्ये असणारे केमिकल पिग्मेंटेशन कमी करण्यात खूप कार्यक्षम असतात. याने टॅनिंगदेखील दूर होते. गुलाबाच्या पाकळयांनी चेहऱ्यावर गुलाबी रंग येतो. उत्सवाच्या काही दिवस आधी हे फेशिअल करून घ्या, म्हणजे उत्सवाला तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण चमक दिसेल.

क्लींजिंगची कमाल

त्वचेला मेकअप करण्यासाठी तयार करणे खूप गरजेचे असते. यासाठी चेहऱ्यासोबतच मानेच्या भागांचीदेखील स्वच्छता करायला हवी. यासाठी क्लींजिंग करा. आपल्या त्वचेच्या अनुरूप कोणतेही क्लिंजर वापरू शकता. जर तुमची त्वचा खूप जास्त रूक्ष आहे, तर तुम्ही मॉइश्चरायझर असणारे क्लिंजर घ्या. यामुळे त्वचेचं पीएच बॅलन्स समतोल राहील व त्वचा रुक्ष होणार नाही. जर तुमची त्वचा तेलयुक्त आहे, तर लिंबू वा कडूलिंबाचे तत्व असणारे क्लिंजर वापरू शकता.

क्लींजिंगचे घरगुती उपाय

होममेड क्लिंजरसाठी कच्च्या दुधात कापसाचा बोळा बुडवून चेहरा व गळयाच्या भागांची स्वच्छता करा. याचा कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी उपयोग केला जाऊ शकतो. जर त्वचा जास्त तेलयुक्त आहे, तर वापरलेल्या टी बॅगचा उपयोग करा. टी बॅग त्वचेतून अतिरिक्त तेल शोषून घेते. याशिवाय एक चमचा लिंबाच्या रसात एक चमचा मध मिसळूनदेखील क्लिंजर म्हणून वापर केला जाऊ शकतो.

क्लिंझिंगनंतर टोनिंग करणे खूप आवश्यक असते. यासाठी गुलाब जलचा उपयोग करा. मेकअप जास्त वेळेपर्यंत टिकावा व चेहऱ्यावर घाम येऊ नये यासाठी आइसिंग टेक्निकचा वापर करा.

क्लिंझिंगनंतमॉइश्चराय

कोणताही मेकअप करण्याआधी मॉइश्चरायझर वापरणे खूप गरजेचे असते. आजकाल बाजारात असेही प्रॉडक्ट उपलब्ध आहेत, जे मॉइश्चरायझर प्लस प्रायमरचे काम करतात. तुम्हाला हवे असल्यास प्रायमरऐवजी याचा उपयोग करू शकता.

प्रायमर

मॉइश्चरायझर व प्रायमरच्या दरम्यान दोन तीन मिनिटांचा गॅप द्या. प्रायमर फिंगर टिपने कपाळ, डोळयांच्या खाली, हनुवटी जवळ, कानांच्या वर व गळयाच्या भागात डॉट डॉट करून लावा व नंतर फिंगर टीपनेच चांगल्याप्रकारे ब्लेंड करा. प्रायमरने त्वचा जेव्हा मऊ होईल, तेव्हा चेहरा मेकअपसाठी तयार आहे. मेकअप वॉटरप्रुफ असेल, तर जास्त चांगला राहतो.

कन्सीलर प्लस फाउंडेशन

जर त्वचेवर डाग आहेत, तर कन्सीलरने त्यांना कन्सिल करा. बाजारात कन्सीलर, फाउंडेशन व कॉम्पॅक्टचा सेट उपलब्ध आहे, जो तुम्ही बेस मेकअपसाठी सहजरित्या अप्लाय करू शकता. फाउंडेशन लावण्यासाठी फिंगर टीपने चेहऱ्याच्या सर्व भागांना, कानांवर व गळयाच्या भागाच्या आजूबाजूला फाउंडेशन लावा व त्याच फिंगर टिपने डॅप डॅप करून ब्लेंड करा. फिंगर टिपने त्वचेवर फाउंडेशन डॅप केल्याने त्वचेची रोम छिद्रेदेखील चांगल्याप्रकारे भरली जातात. याने एअर ब्रशसारखा लूक मिळतो. फाउंडेशन चांगल्याप्रकारे ब्लेंड केल्यानंतर दोन्ही तळहात एकमेकांवर घासून उष्णता निर्माण करा व आपल्या चेहऱ्याला व गळयाच्या भागाला उष्णता मिळू द्या.

जर तुमची त्वचा पॅची आहे, तर फाउंडेशननंतर मेकअप ब्लेंडर पाण्यात बुडवून चांगले पिळून चेहऱ्याच्या त्वचेला हलक्या हातांनी अथवा जर कंटूरिंगची गरज असेल तर यानंतर कंटूरिंग करा. कंटूरिंगनंतर लूज पावडरने मेकअप सेट करा. नंतर हायलायटर व ब्लशर अप्लाय करा. काळजी घ्या, की हायलायटर व ब्लशर चांगल्यातऱ्हेने ब्लेंड होतील.

आय मेकअप

आयब्रोज हायलाइट करण्यासाठी आयब्रो पेन्सिल वा पावडर ब्रश, क्रिमी फॉर्मचा वापर करा. आयब्रो पेन्सिलने आयब्रोजना आकार द्या व नंतर हेअर ग्रोथच्या दिशेने पावडर ब्रशच्या सहाय्याने पावडर भरा. ब्रश असा चालवा, की पावडर बरोबर सेट होईल किंवा मग क्रीमी आयब्रो मस्करा लावा. तुमचा आय मेकअप तुमच्या ड्रेसच्या अनुरूप असायला हवा. जर तुमचा ड्रेस खूप भारी आहे, तर न्यूड आय मेकअप करा व जर सोबर व हलका असेल, तर आय मेकअप डार्क करा.

लिपस्टिक

मल्टीपर्पज लिप लाइनअरने ओठांना शेप द्या व न्यूड शेडमध्ये ब्राऊन, चॉकलेट कलर, पीच, पिंक किंवा वाइन शेड लावा. डार्क शेडसाठी रेड किंवा मजेंटा मॅजिक ट्राय करू शकता. जर ओठ चमकदार बनवायचे आहेत, तर त्यांच्यामध्ये गोल्डन स्पार्कल डस्टचा खूपच हलका टच द्या.

जर तुमच्या ओठांचे बाहेरील कोपरे गडद रंगाचे असतील, तर डार्क लिप लाइनर लावा. लिप लाइनर लावल्यानंतर आपल्या आवडीची एक हलक्या व एक डार्क शेडची लिपस्टिक घ्या. अप्पर लिपच्या वरील भागावर एक शेड व खालील भागावर दुसरा शेड लावून ते मिसळा. अशाच प्रकारे लोअर लिपवर देखील दोन्ही शेड वाल्या लिपस्टिक लावून चांगल्याप्रकारे मिसळा.

हेअर स्टाईल

जर तुम्ही मांग टीका लावणार असाल, तर मधील केसांचे पार्टिशन करा व खालच्या बाजूला केसांचा अंबाडा बांधा. तुम्हाला हवे असल्यास साइड बनही बनवू शकता. जर केस मोकळे ठेवायचे असतील, तर बाहेरील खालच्या बाजूला कर्ल करा सध्या. मॅगी कर्लदेखील ट्रेंडमध्ये आहे.

छोटया केसांसाठी पर्याय

साडीसोबत जॅकेट घालून इंडो-वेस्टर्न लुक मिळवायचा असेल व आपल्या छोटया केसांनादेखील मोठे दाखवायचे असेल, तर मार्केटमध्ये हेअर एक्सटेन्शन उपलब्ध आहेत. अडीचशे रुपयांपासून मिळणारे हे हेअर एक्स्टेंशन वेगवेगळया शेड्समध्येदेखील मिळतील.

आकर्षक नखे

रात्रीच्यावेळी नखांची चमक वाढवण्यासाठी ग्लिटरवाले नेलपेंट लावा. तुम्हाला हवे असल्यास दोन बोटांच्या नखावर एका रंगाचे ग्लिटर नेलपेंट व बाकीच्यांवर दुसऱ्या रंगाचे ग्लिटर नेलपेंट लावा. यावर बीड्सदेखील लावू शकता. जर नखांना सर्वांपेक्षा वेगळे दाखवायचं असेल, तर त्यांच्यावर तुम्ही तुमच्या फोटोसोबत आपल्या पती वा बॉयफ्रेंडचा फोटोदेखील बनवू शकता किंवा मग एखाद्या शेप किंवा डिझाईनचे नेल आर्ट बनवू शकता. तुम्ही फेस प्रिंट नेल आर्ट एक महिन्यासाठी करू शकता.

डेटिंग मेकअप टीप्स

* पारूल भटनागर

डेटिंगवर जायचे असेल पण बिझी शेड्युलमुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांतच स्वत:ला उत्तम लुक देऊन मित्र-मैत्रिणींमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकता.

यासंदर्भात ब्यूटी एक्स्पर्ट बुलबुल साहनी यांनी दिलेल्या काही टीप्स जाणून  घ्या :

मेकअप करण्यापूर्वी काय करावे

तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर झटपट उजळपणा हवा असेल तर मेकअप करण्यापूर्वी १० मिनिटे आधी आपल्या चेहऱ्यावर दही लावा. दही ब्लीचचे काम करते. यामुळे त्वचा उजळण्यासोबतच मेकअपचाही खूप छान रिझल्ट मिळतो.

उजळ त्वचेसाठी तुम्ही आठवडयातून तीन दिवस दह्यात लिंबू किंवा टोमॅटो मिसळून लावू शकता. त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावण्याचीही गरज भासणार नाही. हे प्रायमरचे काम करते.

घरात ठेवा कॉस्मेटिक प्रोडक्ट्स

तुम्ही घरात मेकअप किटमध्ये क्रीम, कन्सिलर, फाउंडेशन, ब्रश, कॉम्पॅक्ट, आयशॅडो, काजळ, लायनर, ब्लशर, लिपस्टिक, लिप पेन्सिल, हेअर अक्सेसरीज, टिकली, नेलपॉलिश इत्यादी नक्की ठेवा. यामुळे तुम्हाला काही मिनिटांतच मेकअप करणे सोपे होईल.

मेकअप कसा करावा

त्वचा जास्त कोरडी दिसत असेल तर मेकअपचा तितकासा इफेक्ट जाणवणार नाही. म्हणून सर्वप्रथम त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासाठी चेहऱ्यावर कोल्ड क्रीम लावा. हे काळी वर्तुळे लपविण्याचे काम करते.

त्यानंतर चेहऱ्यावर चांगले फाउंडेशन लावा. मानेवरही फाउंडेशन लावायला विसरू नका. यामुळे नॅचरल स्किन टोनसह त्वचा स्वच्छ दिसू लागते. बेस तयार झाल्यावर ब्रशच्या मदतीने कॉम्पॅक्ट लावा. ते तुम्हाला परफेक्ट लुक देण्याचे काम करेल. लक्षात ठेवा की कॉम्पॅक्ट नेहमी अँटीक्लॉकव्हाईस लावा. यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो.

त्यानंतर आयशॅडो वापरून डोळयांचा मेकअप करा. आजकाल स्मोकी डोळयांची खूप क्रेझ आहे, त्यामुळे तुम्ही गडद रंगापासून स्मोकी डोळयांसह भुवयाही त्याच पण सौम्य रंगाने रंगवून त्यावर थोडे ग्लिटर लावा. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार डोळयांवर पातळ किंवा जाड लायनर लावा. नंतर मस्कराचे ३-४ कोट लावा. मस्करामुळे पापण्या दाट दिसू लागतील. आता काजळ लावा. यामुळे तुमचे डोळे अधिक सुंदर दिसतील.

यानंतर नाकाजवळून ते भुवयांपर्यंत ब्लशर लावा आणि बोटांनी सर्वत्र नीट पसरवा. ब्लशरनंतर हाइलायटर लावा. यामुळे थोडया वेळाने मेकअप चमकू लागतो. आता पेन्सिलने ओठांची रेषा काढा आणि त्यामध्ये लिपस्टिक लावा. यामुळे लिपस्टिक पसरत नाही.

सर्वात शेवटी, केस तुमच्या मनाप्रमाणे बांधा. तुम्ही ते मोकळेदेखील सोडू शकता किंवा केस लहान असतील तर आधी हळू हातांनी मागून विंचरा आणि बन बनवून पिन व डोनटने चांगले झाकून घ्या. पुढील केसांना थोडे प्रेस करून चांगल्याप्रकारे सेट करा. हा लुक तुमच्या मेकअप आणि आउटफिटसाठी खुलून दिसेल. अशाप्रकारे, तुम्ही डेटिंगवर जाण्यासाठी स्वत:ला अगदी काही मिनिटांतच तयार करू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें