त्वचेनुसार काळजी घेण्याच्या २० टीप्स

* सलोनी उपाध्याय

बहुतेक स्त्रियांना त्यांच्या त्वचेचा प्रकार माहित नसतो. त्या चेहऱ्यावर कोणतीही फेस क्रीम लावतात. बाजारात नवीन काही आले किंवा टीव्हीवर नवीन क्रीमची एखादी जाहिरात दिसली नाही की तो विकत घेतला आणि लावला. परिणाम म्हणजे डागांनी भरलेली त्वचा बनते. कुठे चेहरा कोरडा तर कुठे तेलकट दिसू लागतो, सुरकुत्या, चट्टे आणि काळेपणा चेहऱ्यावर दिसू लागतो.

जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्या त्वचेबरोबर ही असे होऊ नये तर सर्वप्रथम आपल्या त्वचेचा प्रकार काय आहे ते जाणून घ्या. नंतर त्यानुसारच कॉस्मेटिक उत्पादने निवडा. यासाठी कोणत्याही त्वचेच्या डॉक्टरांकडे जाण्याची किंवा ब्युटीशियनची आवश्यकता नाही. चला, आपल्या त्वचेचा प्रकार कसा जाणायचा हे आम्ही आपल्याला सांगत आहोत :

त्वचेचा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी, सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम आपला चेहरा टिश्यू पेपरने पुसून टाका.

नॉर्मल स्किन : जर टिश्यू पेपरवर कोणताही डाग दिसत नसेल, म्हणजे टिश्यू पेपर पूर्वीसारखाच स्वच्छ असेल तर याचा अर्थ तुमची त्वचा सामान्य म्हणजेच नॉर्मल आहे.

तेलकट त्वचा : जर टिश्यू पेपरने आपला चेहरा पुसल्यानंतर तुम्हाला टिशू पेपरवर तेल दिसले तर याचा अर्थ तुमची त्वचा तेलकट आहे. अशा त्वचेवर सुरकुत्या किंवा वृद्धत्वाची कोणतीही समस्या नसते.

ड्राय स्किन : जर टिश्यू पेपरवर कुठला डाग नसेल परंतु त्वचा ताणल्यासारखी जाणवत असेल आणि चेहऱ्यावर चमक नसेल तर याचा अर्थ त्वचा कोरडी आहे.

संवेदनशील त्वचा : जर आपल्या त्वचेला स्पर्श केल्यानेही जळजळ आणि खाज सुटत असेल तर आपली त्वचा संवेदनशील आहे.

काँबिनेशन त्वचा : जर त्वचेचा काही भाग कोरडा असेल तर काही भाग तेलकट असेल तर ती काँबिनेशन त्वचा आहे. आपल्या नाकावर टिश्यू पेपर लावला आणि त्यावर तेलाचे डाग दिसले परंतु जर तुम्ही तुमच्या गालावर टिश्यू पेपर लावल्यास तो कोरडा दिसला तर याचा अर्थ तुमची काँबिनेशन त्वचा आहे.

तेलकट त्वचेची काळजी

* तेलकट त्वचेसाठी दही खूप चांगले असते. दही आणि बेसनाचे पीठ मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

* बटाटयाचा रस काढा आणि चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या किंवा बटाटा बारीक करा आणि फेस पॅकप्रमाणे त्याचा उपयोग करा. यामुळे चेहऱ्याची चमक वाढेल.

* मुलतानी माती गुलाबजलबरोबर मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

* बेसनाच्या पिठात लिंबू पिळून पेस्ट बनवा आणि हे चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. लिंबू त्वचेचे तेल सहजतेने साफ करतो.

* अंडयाच्या पांढऱ्या भागामध्ये लिंबाचा रस घालून चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

कोरडी त्वचा

* चेहरा आणि मानेवर कापसाने कच्चे दूध लावा. वीस मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा. जर आपल्याला चेहऱ्यावर अधिक मॉइश्चरायझर हवे असेल तर मलईने मालिश करा आणि मग १०-१५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकदार होईल.

* कॉटन पॅड किंवा कापसामध्ये ऑलिव्ह तेल घ्या आणि हे मेकअप रीमूव्हरप्रमाणे वापरा. त्वचा स्वच्छ करण्याबरोबरच हे त्वचेला आर्द्रतादेखील देईल.

* कोरडी त्वचा प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांना अगदी सहज बळी पडते. म्हणून नेहमी सनस्क्रीन वापरा. याचा उपयोग त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवतो.

* पपईचा गाभा आणि केळीची पेस्ट बनवून ते चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

* दोन चमचे कोरफडीच्या जलमध्ये १ अंडयाचा पांढरा भाग मिसळा. मग या पेस्टने चेहऱ्यावर मालिश करा. मालिश केल्यानंतर चेहऱ्यावर हे अर्धा तास ठेवा.

संवेदनशील त्वचा

* क्लीन्सरने चेहरा स्वच्छ करा. यासाठी, सौम्य सल्फेट फ्री क्लीन्सर अधिक चांगला असेल.

* टोनिंगसाठी ग्रीन टी अधिक चांगला वापरला जातो. परंतु जर त्वचेवर काही मुरुम असतील तर अल्कोहोल फ्री टोनर वापरा.

* संवेदनशील त्वचेसाठी अशा मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सुगंध वापरला जात नाही अन्यथा यामुळे एलर्जी होऊ शकते.

* संवेदनशील त्वचा स्वच्छ करण्यासाठी, जास्त थंड पाणी किंवा जास्त गरम पाणी वापरु नका.

* अशा प्रकारच्या त्वचेवर प्रत्येक प्रकारचा फेस मास्क काम करत नाही. यासाठी दही आणि ओटचे पीठ मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

काँबिनेशन स्किन

* काँबिनेशन त्वचेच्या काळजीसाठी दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी अवश्य प्या. यामुळे त्वचा ओलसर राहील. पाणी त्वचेत असलेले विषारी द्रव बाहेर काढण्यास मदत करते.

* चेहऱ्यावर संत्री आणि दहीची पेस्ट लावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. संत्रीपासून त्वचेला व्हिटॅमिन सी मिळेल, ज्यामुळे त्वचा तरुण आणि चमकत राहील. दहीमुळे त्वचेत घट्टपणा येईल आणि यामुळे चेहऱ्यावर आर्द्रताही येते.

* काकडीचा रस मधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनी चेहरा धुवा. हे त्वचेला घट्ट आणि ओलसरपणा देईल, तसेच त्वचेची टॅनिंगदेखील दूर होईल.

* अर्धा चमचे तांदूळ पावडर, १ चमचे एलोवेरा जेलमध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर पॅक चेहऱ्यावरून स्क्रब करा आणि नंतर पाण्याने धुवा. याचा सतत वापर केल्याने त्वचा स्वच्छ राहील.

* दही आणि ओट्सची पेस्ट बनवून टी झोनवर लावा. हा पॅक गालांवर लावू नका. थोडया वेळाने कोमट पाण्याने धुवा. आठवडयातून एकदा हा पॅक अवश्य वापरा. नक्कीच त्वचेत उजळपणा येईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें