– एस. ए. चौधरी
ही काळापूर्वीची गोष्ट आहे. एका प्रसिद्ध सेक्स तज्ज्ञाला एका स्त्रीचे पत्र मिळाले. त्यात लिहिले होते, माझ्या पतिचे वय ५४ वर्षांचे आहेत. त्यांनी निर्णय घेतला आहे की आता ते माझ्याशी कोणतेही शारीरिक संबंध ठेवणार नाहीत. त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांनी कुठेतरी वाचले आहे की पन्नाशीनंतर वीर्य रिलीज करणे पुरुषाच्या शरीरावर अतिरिक्त दबाव आणते आणि ते जर नियमित संभोग करत राहीले तर त्यांचे आयुष्य कमी होत जाईल म्हणजे अकाली मरण येईल. म्हणून त्यांनी संपूर्णत: लैंगिक सुखाचा त्याग केला आहे. हे सत्य आहे का? जर नसेल, तर आपण कृपया त्यांना सल्ला द्यावा.
मी आशा करते की यात काहीही सत्य नसावे, कारण सध्या मी पन्नाशीची आहे आणि अजूनही माझ्या इच्छा खूपच तरुण आहेत. मी या विचारानेच अतिशय उदास होते की आजन्म मला सेक्स मिळणार नाही. मी माझ्या पतिला समजावायचा खूप प्रयत्न केला.
मला विश्वास आहे की ते चूक आहेत. पण माझ्याजवळ कोणताही वैद्यकीय पुरावा नाही, म्हणून ते माझ्याकडे दुर्लक्ष करतात. मला खात्री आहे की जिथे मी पराभूत झाले, तिथे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
हे केवळ एका स्त्रीचे दु:ख नाही. जर सर्वे केला तर पन्नाशीच्या अधिकांश माहिला हीच कथा कथन करतील आणि महिलाच कशाला पुरुषांचीही अशीच परिस्थिती आहे. सेक्सबाबत अशा स्थितीचे कारण स्पष्ट आणि जगजाहीर आहे, पण एक गोष्ट जी स्वीकारणे अतिशय कठीण आहे. आधुनिक शोधांमधून सिद्ध झाली आहे, ती म्हणजे सेक्स न केल्यास व्यक्ती लवकर म्हातारी होते आणि त्याला अनेक आजार जडतात. एका ५५ वर्षांच्या महिलेला सेक्स केल्यावर जेव्हा तिचा प्रियकर म्हणाला की तू खूप तरुण दिसते आहे, तेव्हा तिने आरशात बघितले. तिला तिच्या शरीरात वेगळयाच लहरी जाणवल्या आणि तिला वाटले की ती आपल्या जीवनात २० वर्ष मागे गेली आहे. पन्नाशीनंतरच्या सेक्समधील स्वारस्य कमी होण्याची अनेक कारणं आहेत. तसे पाहता सध्या वैदिक काळाप्रमाणे कट्टरता राहिलेली नाही, पण अजूनही मानसिकता अशीच आहे की पन्नाशीनंतर गृहस्थी संपते आणि वानप्रस्थाक्रम सुरु होतो. म्हणून कदाचितच असे घर असेल ज्यात हे वाक्य बोलले गेले नसेल. नातवंडं झाली, आता हा रंगेलपणा पुरे झाला, लाज बाळगा, आता बालिशपणा सोडा. लेकसुनबाई काय म्हणतील? त्यांना काय वाटेल की म्हाताऱ्यांना अजूनही तृप्तता नाही.
खरे पाहता, भक्तिकाळात जेव्हा ब्रह्मचर्य आणि वीर्य सुरक्षित ठेवण्यावर जो जोर दिला गेला, त्यामुळे अशी मानसिकता विकसित होत गेली की सेक्सचे उद्दिष्ट आनंदित, स्वस्थ आणि तणावरहीत राहणे नाही तर फक्त निर्मिती करणे आहे. एकदा का अपत्य निर्मिती झाली की सेक्सवर विराम द्यायला हवा, अशा तथाकथित धार्मिक गैरसमजांवर विज्ञानाचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजे, अलीकडेच योगाशी संबंधित एका मासिकात लिहिले होते, ‘‘वीर्यात सेक्स हार्मोन्स असतात. ते सुरक्षित ठेवा आणि सेक्समध्ये गुंतून ते वाया घालवू नका. हे अमूल्य हार्मोन्स जर वाचवले गेले तर ते परत रक्तात जातात आणि शरीरात ऊर्जा आणि उत्साह येतो. शरीरातून जेवढयावेळा वीर्य निघते तेवढयाच वेळा किंमती रासायनिक घटकसुद्धा वाया जातात, हे घटक जे नर्व्ह आणि टिशूजसाठी महत्वाचे असतात. याच कारणास्तव अति उत्तेजक पुरुषांच्या बायका आणि वेश्यांचे आयुष्य फार कमी असते.
या मोठया प्रवचनासाठी एकच शब्द आहे, ‘निरर्थक’. सर्वात पहिली गोष्ट तर ही आहे की वीर्यातील शुक्राणूत मोठया प्रमाणात साखर, सिट्रिक असिड, एस्कोर्बिक असिड, व्हिटॅमिन सी, बायकार्बोनेट, फॉस्फेट आणि इतर पदार्थ असतात. जे बहुतांश एन्झाइम्स असतात. या सगळयांची निर्मिती अंडकोष, सेमिनल बेसिकल्स आणि एपिडर्मिस व चरबीच्या नलीकांमुळे होते. वीर्यात सेक्स हार्मोन्सच नसतात, हे सगळे घटक किंवा पदार्थ शरीरात खाण्याच्या पुरवठयामुळे बनतात, जी एक न संपणारी प्रक्रिया आहे. उत्सर्जित होण्याआधी वीर्य सेमिनल व्हेसिकल्समध्ये साचते, जर हे उत्सर्जित केले गेले नाही तर आपोआप होईल. जाहीर आहे की हे शरीरात साचण्याचा अर्थ हा आहे की शरीरात हे फिरण्याचा भाग राहातच नाही आणि ना अशी कोणती प्रक्रिया आहे ज्याने वीर्य परत रक्तात मिसळून ऊर्जा बनेल.
प्रख्यात वैज्ञानिक डॉ. इसाडोर रुबीन यांचे म्हणणे आहे, ‘‘जर अशा धारणा खऱ्या असत्या की वीर्य बाहेर पडल्याने किंवा स्त्रीला लैंगिक सुख मिळाल्याने शरीर अशक्त होते आणि आयुष्य कमी होते, तर अविवाहित पुरुषांचे वय विवाहीतांच्या तुलनेत अधिक असते, कारण अविवाहितांना संभोगाच्या संधी कमी मिळतात. वास्तविकता ही आहे की विवाहित व्यक्ती दीर्घ काळ जगतात.’’
अलिकडेच केल्या गेलेल्या संशोधनात असे कळले आहे की एखादी व्यक्ती खूप दिवस सेक्सपासून दूर राहिली तर काही प्रोस्टेटिक द्रव घट्ट होऊन ग्रंथीत उरते. यामुळे प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो आणि व्यक्तिला मूत्रविसर्जन करताना त्रास होतो, या समस्येकडे लक्ष दिले नाही तर प्रोटेस्ट सर्जरी टाळता येत नाही.
पन्नाशीनंतर सेक्स टाळण्याचे आणखी एक कारण हे आहे की तारुण्यात लोक व्यायाम आणि आपले शरीर सुडौल ठेवण्यासाठी खाण्यापिण्यावर बऱ्याचदा खास लक्ष देत नाहीत. यामुळे वयानुसार त्यांच्या शरीरावर चरबी जमा होऊ लागते, त्यामुळे ते लठ्ठ होतात. हे जाणून घेण्यासाठी फार ज्ञानी असण्याची गरज नाही की लठ्ठपणा एकूणच अनेक गंभीर आजाराचे मूळ असतो. एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याचे लक्ष सेक्सकडे कसे जाईल, शिवाय पुरुषाचे पोट जेव्हा सुटते आणि छातीसुद्धा स्त्रियांप्रमाणे सैल होते तेव्हा तो त्या उत्सुकतेने सेक्समध्ये सहभागी होऊ शकत नाही जसा तारुण्यात होत असे. स्त्रिया बेडौल आणि लठ्ठ झाल्या तर त्या पुरुषांना पूर्वीसारख्या आकर्षक वाटत नाही. म्हणून हे आवश्यक आहे की वयाच्या प्रत्येक वळणावर व्यायाम करायला हवा आणि आपले वजन नियंत्रित ठेवायला हवे.
तसेही सेक्ससुद्धा एक चांगला व्यायाम आहे. इतर फायद्यांशिवाय यात मांसपेशी एकत्र राहतात, रक्तदाब सामान्य आणि अतिरिक्त चरबी कमी होते. महत्वाचे हे की पुरुषांच्या गुप्तांगात जोश स्पंजी टिशूंच्या छिद्रांमधून रक्तप्रवाहामार्फत येतो. जर तुमच्या शरीरावर १ किलो अतिरिक्त चरबी असेल तर रक्ताचे २२ मिली. आणखी जास्त अभिसरण व्हायला हवे. जर व्यक्ती खूपच लठ्ठ असले तर चरबी सामान्य अभिसरणाला आणखीनच अशक्त करते आणि खास क्षणांच्या वेळी इतके रक्त उपलब्ध होत नाही की त्याच्यात संपूर्ण ऊर्जा येईल.
खरे तर खाण्यापिण्याच्या सवयी सामान्य आरोग्यालाच नाही तर सेक्स जीवनालासुद्धा प्रभावित करतात. यात काही दुमत नाही की पतिपत्नी जसे की ते एकाच छताखाली राहतात त्यामुळे अन्नही सारखेच घेतात. जर एखादे जोडप्याच्या जेवणात व्हिटॅमिन बीची कमतरता असेल तर याचा त्यांच्या जीवनावर अतिशय विचित्र प्रभाव पडेल. यामुळे पत्नीत अतिरिक्त एस्ट्रोजन (महिला सेक्स हार्मोन)उत्पन्न होतील आणि तिच्या सेक्सच्या इच्छा वाढतील उलट पतिवर याचा उलटा परिणाम होईल. इस्ट्रोजनच्या वृद्धीमुळे त्याच्या अँड्रोजन (पुरुष सेक्स हार्मोन)चा अभाव दिसून येईल.
वेगळया भाषेत सांगायचे तर स्थिती अशी होईल की पत्नीला तर सेक्सची जास्त इच्छा होईल, पण पतिच्या इच्छा कमी होतील. म्हणून संतुलित, हाय प्रोटीन आहार घेणं आवश्यक आहे. याशिवाय दारू आणि सिगरेटच्या अतिसेवनापासून दूर राहायला हवे, कारण या दोघांच्या सेवनामुळे व्यक्ती वेळेआधी तृप्तीच्या शिखरावर पोहोचतो आणि नंतर त्याला अतृप्त असल्यासारखे वाटू लागते.
सर्वात महत्वाचे हे की आंतरराष्ट्रीय सेक्सोलॉजी जर्नल -७ च्या म्हणण्याप्रमाणे व्हिटॅमिन आणि हार्मोन्सचा खोलवर संबंध आहे. वेदनामय मासिक पाळीपासून दिलासा मिळावा यासाठी जेव्हा टेस्टेस्टेरॉन हार्मोन दिले जाते तेव्हा त्याच्या अधिकतम सफलतेसाठी सोबत व्हिटॅमिन डीसुद्धा दिले जाते. अशाच प्रकारे गर्भपाताच्या संभावित धोक्यापासून वाचण्यासाठी प्रोजेस्टरोन हार्मोनसोबत व्हिटॅमिन सी दिले जाते.
पन्नाशीनंतर सेक्स टाळण्याचे एक कारण हेसुद्धा आहे की दोघानीही सुंदर दिसणे सोडून दिलेले असते. छान आकर्षक कपडे घालणे आणि केसांची छान रचना केल्यास नक्कीच स्त्रियांचे मानसिक धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. एवढे असूनही तुम्हाला रजोनिवृत्तीतून गेलेल्या अशा अनेक स्त्रिया दिसतील ज्या विचित्र कपडे घालतात, अशी केशरचना करतात जी सध्या प्रचलित नाही आहे. त्यांचे गाल लोंबलेले असतात. वरच्या ओठावर केस असतात, स्तन सैल झालेले असतात आणि पोट आणि पार्श्वभाग पसरलेला असातो. अशा पत्नीमध्ये कोणत्या पतिला रस वाटेल जेव्हा की थोडा प्रयत्न केल्यास सगळे बदलू शकेल. स्त्रियांनी एखाद्या चांगल्या ड्रेसच्या दुकानात जावे, आठवडयातून एकदा ब्युटी पार्लरमध्ये जावे, लोंबलेल्या त्वचेला आणि चरबीला योग्य आकार देण्याकरिता हेल्थ आणि ब्युटी जीममध्ये कोर्स करावा आणि दृढतेने ठरवावे की चरबीला घट्टपणा आणण्यासाठी त्या रोज थोडावेळ व्यायामासाठीसुद्धा काढणार. हे सौंदर्यवृद्धीचे उपाय आणि हलका व्यायाम ना केवळ त्यांचे मनोधैर्य वाढवेल तर कठोर जिम त्यांची सेक्शुअल सिस्टीमसुद्धा नीट ठेवेल आणि त्यांचे पती त्यांच्याकडे आकर्षित होतील. लक्षात ठेवा की आत्मविश्वाने परिपूर्ण सूंदर स्त्री जी आपल्या शरीराची देखभाल करण्यातसुद्धा प्रवीण असते, ती १६ वर्षाच्या मुलीपेक्षाही जास्त आपल्याकडे लक्ष वेधून घेते.
इथे हे सांगणे जरूरीचे आहे की याच प्रकारचे आकर्षण आणण्यासाठी पुरुषांनीसुद्धा व्यायाम करायला हवा, ब्युटी पार्लरमध्ये जायला हवे आणि छान कपडे घालायला हवे, शिवाय त्यांची बायको जेव्हा रजोनिवृत्तीतून जात असेल तेव्हा तिच्याकडे खास लक्ष द्यावे. बायको जितके मोकळेपणाने आपल्या नवऱ्याशी बोलू शकते तेवढे ती डॉक्टरशीसुद्धा बोलू शकत नाही. म्हणून जर रजोनिवृत्तीच्या काळात पतिने तिला सांभाळून घेतले तर पुढील सेक्स जीवन उत्तम होईल.
इतका वेळ जी चर्चा केली गेली, त्यातून स्पष्ट होते की उत्तम, स्वस्थ आणि दीर्घायुष्यासाठी पन्नाशीनंतरही सेक्स तेवढेच आवश्यक आहे जितके त्याआधी होते. पण ते उत्तम राखण्यासाठी आपला दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे आणि जर काही समस्या असेल तर मानसोपचारतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलण्यात लाज वाटू देऊ नका.