वर्ष नवं दृष्टिकोन नवा

– गरिमा पंकज

आपणा सर्वांनाच माहीत आहे की आयुष्य ४ दिवसांचं नाहीए. मग ते असंच का वाया घालवावं. आयुष्य एक अशी सुरावट आहे, जी सुरांसोबत गुणगुणलो तर आपल्या आजूबाजूचं वातावरणदेखील अधिक मंत्रमुग्ध होऊन जाईल.

ब्रेकअप ब्लूजला करा बायबाय

आयुष्यात प्रत्येक जण कधी ना कधी प्रेमात पडतोच. हे प्रेम आयुष्यात चांगल्यासाठी आणि पूर्णत्वासाठी योग्यच आहे. परंतु हे जर अश्रू ढाळण्यास कारण बनलं तर मात्र यापासून दूर राहाणंच अधिक योग्य आहे. अनेकदा मनात नसतानादेखील आपल्याला ब्रेकअपचं दु:ख सहन करावं लागतं. कारण कोणतंही असो या दु:खाला स्वत:वर कधीही हावी होऊ देऊ नका.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या अहवालानुसार भारतात ३.२ टक्के लोक प्रेमातील अपयशामुळे आत्महत्या करतात. प्रेमात अपयश वा रिजेक्शन डिप्रेशनचं कारण बनतं. २०१२ साली २,०२३ पुरुषांनी, तर १,८२६ स्त्रियांनी या कारणामुळे आत्महत्या केली होती.

गो अहेड : ज्याच्यावर तुम्ही प्रेम केलंत तो तुमचा होऊ शकला नाही, तर त्यासाठी चिंतित होऊ नका. आयुष्यात नक्कीच अजून काही चांगलं होणार असेल.

एका झटक्यात त्याला आपल्या आयुष्यातून बाहेर काढा. शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्यादेखील. यासाठी त्याच्याशी निगडित सर्व वचनांशी नातं तोडण्याचा प्रयत्न करा. त्याचे फोटो, पत्र, भेटवस्तू वगैरे नष्ट करा वा परत देऊन टाका. एवढंच नाही तर तुमच्या गॅजेट्समधूनदेखील त्याचे संपर्कसूत्र पूर्णपणे नष्ट करा.

आता असे अॅप्स उपलब्ध झाले आहेत, जे तुम्हाला या कामात मदत करतील.

अलीकडेच सोशल नेटवर्किंग वेबसाइट, फेसबुक नात्यांमुळे दुरावा वा नातं संपविण्याच्या स्थितीत तुमचं दु:ख कमी करण्यासाठी नवीन टूल घेऊन आलंय.

फेसबुकच्या या नव्या ब्रेकअप टूलने ब्लॉक न करताच तुमच्या एक्सची कोणतीही पोस्ट न्यूज फिडवर दिसणार नाही आणि नवा मेसेज येणं वा फोटो पोस्ट झाल्यावर एक्सचं नावदेखील दिसणार नाही. यामुळे तुम्हाला त्याला विसरायला मदतच मिळेल.

खऱ्या प्रेमाची वाट पाहा : तुमच्या आयुष्यात कोणा दुसऱ्याला येण्याचा मार्ग मोकळा ठेवा. प्रेमाची अनुभूती होतच असते. यामुळे आयुष्यात नवी पहाट होते. याउलट प्रेमाची उणीव मनात रिकामेपणाची भावना आणते आणि यामुळे आयुष्याबाबत नकारात्मक विचारसरणी येत राहाते. म्हणूनच स्वत:ला यापासून दूर ठेवा. तेदेखील अटीविना प्रेम करा.

आयुष्याचा स्वीकार करा : जेव्हा तुम्ही हसत आयुष्याचा स्वीकार करता तेव्हा आयुष्य तुमच्या फुलांचा वर्षाव करतं.

मनात उत्साह, सकारात्मकता आणि स्नेहाचे दीप उजळवा. प्रत्येकाला मोकळेपणाने भेटा. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या. आयुष्याला नवीन दिशा द्या. चांगले मित्र बनवा. मग पाहा, आयुष्य कसं तुमच्यासोबत पावलावर पाऊल टाकत चालतं.

अमेरिकेचा टीव्ही अँकर, अॅक्टीव्हिस्ट अश्वेत अरबपती ओपरा विनफ्रेच्या शब्दात, ‘‘तुम्ही जेवढं तुमच्या आयुष्याची स्तुती कराल आणि आनंद साजरा कराल, तेवढ्याच वेगाने तुमच्या आयुष्यात उत्सव साजरे करण्याच्या संधी येतील.’’

प्रसिद्ध ग्रीक तत्ववेत्ता अरस्तूच्या मते, ‘‘तुम्हाला जर फक्त तुमच्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमची विचारसरणी बदला, सर्व काही बदलेल.

लक्षात ठेवा, तुमच्याकडे जेवढं आहे, खूप आहे. ज्यांना आयुष्याने शारीरिक अपंगत्व, गरिबी आणि दुरावस्था दिली, तरीदेखील त्यांनी नवे कीर्तिमान स्थापित केले अशा लोकांची अजिबात वानवा नाहीए.

तुम्हाला माहीत आहे का, की आर्थिक परिस्थितीशी झुंजणारे धीरूभाई अंबानी, रिलायन्स कंपनीची स्थापना करून भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. लेखक मिल्टन कवी सूरदास आंधळे होते. इंग्लंडचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल तोतरे बोलत. तत्ववेत्ता सुकरातच्या पत्नीने कायम त्यांना त्रास दिला, त्यांना हवं असतं तर ‘त्यांनी आम्ही काहीच करू शकत नाही’चा राग आलापत राहिले असते.’’

आयुष्याचं महत्त्व समजा : आयुष्य एखाद्या नात्यावर वा व्यक्तिवर अवलंबून नसतं. आयुष्य एका उद्दिष्टासाठी मिळालंय. आपल्या आयुष्याचं एखादं उद्दिष्ट ठरवा आणि ते मिळविण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे समर्पित करा.

नियोजन

आयुष्यात नियोजनाला खूपच महत्त्व आहे. प्रत्येक काम नियोजनानुसार असावं. तेव्हाच आयुष्यात समाधान मिळतं.

मानसिक नियोजनबद्धता : मनाला नियंत्रित ठेवणं, ते निश्चित दिशेने पूर्व नियोजनानुसार एकाग्रचित्त करणं, सकारात्मकरित्या घेणं, स्वत:ची ऊर्जा जागवणं हे सर्व मानसिक नियोजनबद्धतेमध्ये येतं.

लेखक विलियम शेक्सपियरच्या शब्दांत, ‘‘कोणतीही गोष्ट चांगली व वाईट नसते. आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहातो त्यावर ते चांगलं वा वाईट ठरतं.’’

भावी आयुष्याच्या योजना : आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. आगामी काळ हा वर्तमानातील क्षणांच्या उंबरठ्यावर उभा आहे. मग आजपासून तुमचा भविष्यकाळ साकारण्याचा पाया रचायला हवा. तुमचा हा प्रयत्न मनाला शांती आणि आयुष्याला स्थिरता देईल.

आर्थिक योजना : डॉ. हर्षला चांदोरकर सीनियर व्हाइस प्रेसिडंट सिबिल यांच्या मते, नेहमी लोन, ईएमआयचं देणं वेळेतच भरावं व क्रेडिट बिल भरण्यासाठी दर महिन्याला आगाऊ रक्कम काढून ठेवा.

तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड बिलं आणि लोन ईएमआयचं देणं दर महिन्याला कोणत्या तारखेला भरणार हे सुनिश्चित करा.

भविष्यासाठी बचत : भविष्यात तुमची कोणती स्वप्नं आहेत आणि तुम्हाला काय करायचंय याचा एक रोडमॅप तयार करा. नंतर तुमचे खर्च आणि लोन यांचं नियोजन सावधनतेने करा.

व्यवस्था प्रत्येक ठिकाणी गरजेची : घर असो वा ऑफिस वा दुसरीकडे कुठे, आपण आपल्या वस्तूंना व्यवस्थित ठेवणं खूपच गरजेचं आहे. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि तुम्ही तणावमुक्तदेखील राहाता.

तुमची प्रत्येक वस्तू अशाप्रकारे व्यवस्थित ठेवा की जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही ती सहजपणे काढू शकाल अन्यथा काही लोकांचा अर्धा वेळ हा सामान शोधण्यातच निघून जातो.

स्वत:ला ओळखा

अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून दुसऱ्यांवर नाराज होत असतो आणि अशावेळी आपल्या डोक्यात फक्त हेच चालत असतं की समोरच्याने तुमच्या बाबतीत कायकाय चुकीचं केलंय. परंतु अशा परिस्थितीत स्वत:चं काय चुकलं ते प्रथम पाहायला हवंय, नंतर दुसऱ्याचं.

थंड डोक्याने विचार करा : कोणावर नाराज होणं खूपच सहजसोपं आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग येतो तेव्हा आतून गदारोळ माजतो. राग चिंतासमान आहे. यामुळे शरीराचं खूपच नुकसान होतं. परंतु याकडे आपण दुर्लक्षच करतो.

आपण त्वरित हावी होण्याऐवजी शांत डोक्याने विचार करायला हवा. कदाचित सत्य जाणून घेतल्यानंतर तुम्हाला वाटेल की विनाकारण संतापलो आणि राग जर काही कारणासाठी असेल तर समोरच्याला त्वरित क्षमा करून नाराजी विसरायला हवी. जेवढा वेळ रागात राहाल तेवढंच तुमच्या शरीराचं नुकसान अधिक होईल.

सल्ला देण्यापूर्वी त्यावर अंमल करा : आयुष्यात दुसऱ्यांना सल्ला देणं खूपच सहजसोपं आहे, परंतु तुम्ही याकडे लक्ष दिलंय का, की त्यापैकी आपण किती गोष्टी अंमलात आणतो?

समजा, तुम्ही तुमच्या मुलांना सांगता की खोटं बोलणं चुकीचं आहे. परंतु स्वत: सहजपणे खोटं बोलता. मग तुमचं मूल तुमचं म्हणणं मानेल का? जोपर्यंत प्रॅक्टिकली तुम्ही त्याला तसंच करून दाखवणार नाही, तोपर्यंत तो ऐकणारच नाही.

दुसऱ्यांना दोष देण्याच्या प्रवृत्तीचा त्याग करा : आपल्यापैकी अनेक लोकांची सवय असते की दुसऱ्यांचे अवगुण चारचौघांत दाखवायचे. परंतु स्वत:च्या चुकांकडे दुर्लक्ष करायचे. आपण विचार करतो की अमुक एक व्यक्ती माझ्याशी चांगली बोलली नाही वा खोटं बोलली अथवा स्वार्थी वागली. परंतु आपण व्यक्तिगत स्वार्थाचा त्याग करून तिला मदत केली का वा कधी तिला सोबत केली की मग तिच्याकडून अपेक्षा का करताय?

विवादाचं मूळ तुम्ही स्वत: तर नाही : कधी तुम्ही निरीक्षण केलंय का, की तुमचं आयुष्यात एखाद्याशी भांडण होतंय, त्याच्या मुळाशी कदाचित तुम्ही तर नाही?

एखाद्याला चुकीचं ठरवणं वा वाईटसाईट बोलण्यात एक क्षणदेखील लागत नाही. परंतु आपली चूक स्वीकारण्यात व क्षमा मागण्यात संपूर्ण आयुष्यदेखील कमी पडतं.

द्यायला शिका

तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का, की तुम्ही आयुष्यात इतरांकडून कितीतरी काही घेत असता. आईवडील, नातेवाईक, मित्रांकडून प्रेमलाड, वेळ, पैसा, अन्न, कपडा, गरजेच्यावेळी मदत, सुरक्षा, समाजदेखील तुम्हाला सुरक्षित वातावरण आणि व्यवस्था देतं. परंतु जेव्हा कधी यांना काही देण्याची वेळ येते, तेव्हा आपण मागे राहातो.

प्रेम आणि आनंद वाटा : ज्याप्रकारे काहीही विचार न करता आपण घेतो, तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी विचार करणं आपलं कर्तव्य नाही का? कधीतरी कोणाला मनात कोणताही स्वार्थ न आणता काहीही देऊन तर पाहा, आनंदाची एक अद्भूत अनुभूती तुम्हाला खूप काही मिळवून देईल.

वेळदेखील द्या : व्यक्तिला आर्थिक वा शारीरिकतेबरोबरच मानसिक मदतीचीदेखील गरज असते. जेव्हा एखाद्याला तुम्ही कायम त्यांच्यासोबत आहात ही जाणीव करून देता, त्यांना भावनात्मक सपोर्ट करता, तेव्हा त्या व्यक्तिसोबत तुमचं जे कनेक्शन जोडलं जातं ते कधीच तुटत नाही. ती व्यक्ती भविष्यात तुमच्या आनंदाचं कारण बनते. तुमच्या कक्षा रुंदावतात आणि आयुष्यात तुम्ही कधीही एकटे पडत नाही.

उपकाराची जाणीव करू देऊ नका : कोणाला काही देत आहात, कोणत्या प्रकारची मदत करत आहात, तर याबाबत उपकाराची जाणीव करू देऊ नका. तुम्ही किती देणार आहात याला महत्त्व नसतं, तर किती प्रेमाने आणि आपलेपणाने देत आहात याला महत्त्व असतं.

अपेक्षा ठेवू नका : कोणाला काही देत आहात तर एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की या बदल्यात काही मिळण्याची इच्छा तुमच्या मनात ठेवू नका

खरंतर, तुम्ही जेव्हा मनात अपेक्षा बाळगता आणि एखाद्या कारणाने ती व्यक्ती ते पूर्ण करू शकत नाही तेव्हा तुमचं मन दु:खी होतं. याउलट जेव्हा तुम्ही समोरच्याकडून अपेक्षाच ठेवत नाही तेव्हा तुमचं मन शांत असतं आणि ही गोष्ट आयुष्य सुखी समाधानी ठेवण्यासाठी गरजेची आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें