नववर्षात आनंदी जीवन जगण्याची २० सुत्रं

* सोमा घोष

यशस्वी आणि आनंदी जीवन सर्वजण जगू इच्छितात, पण कोणीही जीवनातील चढउतारांना सामोरं न जाता हे जगू शकत नाही, कारण जीवन आहे म्हटल्यावर नकारात्मकता तर येणारच. जरूरी नाही की हरक्षणी तुम्हाला सफलता मिळेल वा आयुष्यात कायम तुम्ही सुखी राहाल. जीवनातील कोरोनाच्या महामारीच्या अशा कठिण परिस्थितीमध्ये ताळमेळ कायम राखणं खूप जरूरी असतं. हा समतोल मेंदू आणि शरीराच्या माध्यमातूनच राखला जातो, पण कसा? नवीन वर्ष २०२१ येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो अशी २० सुत्रं, ज्यांचा अवलंब करून तुम्हीही आनंदी अन् सुखी जीवन जगू शकता.

  1. जीवन आपल्याला जगायच्या अनेक संधी उपलब्ध करून देते, ज्यांना जीवनात योग्य प्रकारे उतरवून व्यक्ती पुढे जाऊ शकते. जर काही कारणामुळे ही संधी हातून निसटली, तर निराश व्हायची गरज नाही. कारण यामुळे पुढे येणारी संधी तुम्ही गमावू शकता, नेहमी आपले लक्ष वर्तमानावर ठेवा.
  2. स्वत:साठी जगा, इतरांसाठी नाही. स्वत:वर प्रेम करा, तुम्हाला तुमचा आनंद कशात आहे हे ठरवावे लागेल. स्वत: वर प्रेम करणाराच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो.
  3. आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत चांगला वेळ घालावा. एखाद्या सण किंवा आनंदी प्रसंगी त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा.
  4. एखाद्याबाबत गैरसमज झाला असेल तर तो एकत्र बसून दूर करा, कारण जोशात येऊन आपण बोललेले एखादे वाक्य इतर कोणाच्या मनाला लागू शकते.
  5. आयुष्यात नेहमी काही नवे शिकण्याचा प्रयत्न करा, शिकणे थांबवले तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे पडू शकता.
  6. आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नका. एखाद्याला जर काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्याला मदत करा आणि त्या मोबदल्यात काही मिळावे असा प्रयत्न करू नका.
  7. जर एखादी व्यक्ती तुम्हाला नावे ठेवत असेल, तर त्याच्यापासून दूर राहिलेलेच बरे. शक्य असेल तितकं त्याच्या चुका माफ करा.
  8. जर काही समजवायचे असेल तर योग्य प्रकारे संवाद साधून समजावण्याचा प्रयत्न करा.
  9. जीवन सोपे नसते. नकारात्मकता तुमच्या सभोवताली कायम असली तरी त्यातही सकारात्मकता शोधा.
  10. आयुष्यात लोकांना महत्व द्यायला शिका. मजबूत नातीच तुमच्या मनाला स्वस्थ आणि मजबूत बनवतात, ज्यात आईवडील, सख्खे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने सहभागी होणे खूप जरूरी आहे. पण योग्य मित्रांची निवड करणे खूप मह्त्वाचे असते. जर मित्र योग्य असतील तर ते तुमचे आयुष्य आनंदाने भरून टाकतील. पण विश्वासघातकी आणि अप्रामाणिक मित्र तुमचे जीवन खराब करु शकतात.
  11. आपल्या भूतकाळातून बाहेर पडून वर्तमानकाळात जगायचा प्रयत्न करा टीकेचा सामना करण्याची क्षमता बाळगा.
  12. चूका स्वीकारायचे धैर्यसुद्धा दाखवा आणि त्यातून शिका. कोणाला त्यासाठी जबाबदार ठरवू नका.
  13. ऐकण्याची क्षमता वाढवा, यामुळे तुम्हाला कोणत्याही समस्येचे समाधान लवकर शोधता येईल.
  14. धन तुम्हाला आनंद देते, पण त्याने आपल्या आनंदाचे आकलन करू नका. मेहनत आणि कमिटमेंटने केलेले प्रत्येक काम धन घेऊन येते.
  15. गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करा.
  16. आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे नवीन वर्षात लक्ष ठेवा. जर एखादा आजार तुमच्या आसपास असेल तर त्यासाठी नियमित शारीरिक चर्चा आणि औषधांचे सेवन करा, कारण स्वस्थ शरीरातच स्वस्थ मानसिक अवस्थेचा वास असतो.
  17. जीवनाच्या वेगासोबतच आपल्या शरीराला आराम द्यायची गरज असते, यासाठी व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ काढून आपल्यासाठी ठेवा आणि त्यात जे तुम्हाला आवडेल, ते करायचा प्रयत्न करा.
  18. अनेक जण रोजच्या व्यस्त आयुष्यात आपले छंद विसरून जगत असतात, त्यांनी आपले छंद पूर्ण करायला वेळ नक्कीच काढावा, जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनातील नीरसता नाहीशी होईल.
  19. जीवन खूप किचकट असल्यामुळे नकारात्मकता तुमच्या आसपास नेहमी असते. अशावेळी योग्य मार्ग निवडणे कित्येकदा कठीण असते. लोक तुम्हाला सकारात्मक विचार करण्याचा सल्ला तर देतात, पण त्यातून सहीसलामत बाहेर पडणे कठीण असते. अशावेळी एखाद्या तज्ज्ञाचे मत घेणे काही वाईट नाही.
  20. अधिकाधिक हसायचा प्रयत्न करा, यामुळे तुमचे जीवन खूप प्रमाणात सोपे होईल. काही लोक सकाळी उठून ५ मिनिटं हसत राहतात, असे केल्याने दिवस छान जातो.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें