* टी. राठौड
दागिन्यांशिवाय नववधूचा साजशृंगार अपूर्ण असतो. भावी नववधू आतापासूनच ज्वेलरी शॉपिंगचा प्लान बनवू लागल्या असतील. यावेळी ब्रायडल ज्वेलरीची खरेदी करण्याआधी या काही अनोख्या अलंकारांकडेही लक्ष द्या :
निजामी झुमर
नवाबांच्या खानदानात मोठया आवडीने वापरला जाणारा दागिना म्हणजे निजामी झुमर, तो डोक्यावरील झुमरप्रमाणे कोपऱ्यात लावला जातो. तसं तर झुमरच्या अनेक डिझाईन अलीकडे प्रचलित आहेत, पण सगळयात सुंदर असते निजामी डिजाइन. यावरील बारीक नक्षीकाम पाहून कोणती नववधू याकडे आर्कषित होईल. याचा नवाबी लुक तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो.
बीड ज्वेलरी
जर तुम्ही ट्रेडिशनल लुकला कंटाळला आहात आणि विवाहप्रसंगी मार्डन लुकचा अवलंब करू इच्छित असाल, तर तुम्ही बीड ज्वेलरी नक्कीच वापरली पाहिजे. यात सोन्याच्या साखळया एकत्र जोडून मॉडर्न मॉर्डन लुक दिला जातो. ही ज्वेलरी घातल्यानंतर तुम्हाला इंडोवेस्टर्न लुक मिळतो.
गढवाली नथ
भारतात गढवाली स्त्रियांच्या सौंदर्याची चर्चा कायमच असते. त्यांच्या हेच सौंदर्य अधिक खुलवते. परंपरागत नथ, जिच्या सौंदर्यांसमोर सगळं फिकं वाटतं.
आजकाल गढवाली स्त्रियांव्यतिरिक्त ही नथ देशातील अन्य ठिकाणीदेखील महिला वापरू लागल्या आहेत. जर नववधू थोड्या वेगळया पध्दतीचा साज करू इच्छित असेल, तर गढवाली नथ तिच्यासाठी सर्वात सुंदर दागिना आहे.
खमेर ज्वेलरी
खमेर ज्वेलरी कंबोडीयाच्या परंपरागत डिजाइनच्या रूपात ओळखली जाते. खमेर प्रदेशातील स्त्रिया ही ज्वेलरी मोठया प्रेमाने वापरतात. अलीकडे खमेर ज्वेलरी भारतातही प्रचलित आहे. जर नववधूने आपल्या परंपरागत पोशाखासह खमेर ज्वेलरी वापरली तर तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडेल. खासकरून या ज्वेलरीचे कडे खूप प्रसिध्द आहेत.
घुंगरू असलेलं पैंजण
घुंगरू असलेलं पैंजन एक असा दागिना आहे, जो नववधूच्या पायांचं सौंदर्य तिप्पटीनं वाढवतो. त्यात मोत्याच्या आकाराचे बारीक बारीक घुंगरू लावले जातात, ज्यांची जाडसर पट्टी पायांना भव्यतेबरोबर सुंदर दिसायला मदत करतात. रॉयल लुक मिळवण्यासाठी होणाऱ्या नववधूने हे नक्कीच वापरले पाहिजेत.
उबिका माथापट्टी
माथापट्टीचं नाव घेताच नववधूच्या मनात दक्षिण भारतीय डिझाईन येते. पण याप्रकारची माथापट्टी आजकाल उत्तर भारतीय लग्नातदेखील नववधू घालणं पसंत करतात. याला परंपरागत रूप न देता मीनाकारी आणि कुंदनकारी डिझाईनने सजवलं जातं, ज्याने तिला एक रॉयल लुक मिळतो. ती डोक्यावर एखाद्या मुकूटाप्रमाणे सजते. ज्याने नववधूच्या सौंदर्याला चंद्राचं रूप प्राप्त होतं.
हसली नेकलेस
परंपरागत आणि जुन्या काळातील ज्वेलरीची आठवण देणारे हसली नेकलेस हल्ली मॉडर्न टच देऊन पुन्हा बाजारात आले आहेत. हा राजस्थानी ज्वेलरीचा एक प्रकार आहे, ज्यात हसली किंवा चंद्राच्या आकाराबरोबर नेकलेस बनवले जातात, जे घातल्यावर गळयाचा गोलाकार आकार उठावदार दिसतो. वेस्टर्न ज्वेलरीमध्येही या डिझाईनची चलती आहे, पण भारतीय पोशाखाबरोबर याचं ट्रेडिशनल रूप खूप पसंत केलं जातं.
लग्नानंतर कार्यक्रमासाठी वापरा असे दागिने
शक्यतो असं दिसतं की लग्नानंतर नवरीला दागिन्यांनी मढवलं जातं, ज्याकारणाने तिचा लुक बिघडतो. त्यामुळे तिने नेहमी काळजी घेतली पाहिजे की जर ती हेवी वर्कची डिझाईनर साडी नेसत असेल, तर तिने उठावदार ज्वेलरी सेट वापरू नये. जर बनारसी साडी वापरत असेल, तर त्याबरोबर झुमकेदेखील शोभून दिसतील. त्याव्यतिरिक्त खूप बांगडयाऐवजी रत्नजडीत कडयाच्या जोडयाही किंवा नेहमीच्या डिझाईनपेक्षा चोकर किंवा टेंपल ज्वेलरीही वापरू शकते.
कमी बजेट मध्ये अशी खरेदी करा ज्वेलरी
हल्ली रत्नजडीत चोकर वापरायचा ट्रेंड आहे, सोबत नववधू लहान गोलाकार इअररिंग्ज घालू शकते. जर बजेट कमी असेल तर सोन्याबरोबर सेमीप्रिशियस स्टोन्सचा वापर करून दागिने खरेदी करा. या स्टोन्समध्ये रूबी आणि पन्ना वापरलेला असतो, जे बीड्सच्या रूपात सोन्याने बनलेल्या पेडंटमध्ये लावतात. या बीड्सचा वापर तुम्ही रंगानुसार करू शकता. तुम्हाला हवं तर मोत्याचा वापरदेखील करू शकता.