वॅक्सिंगचे नवीन उपाय

– गरिमा पंकज

त्वचेला सुंदर, कोमल आणि केशविरहित बनवण्यासाठी वॅक्सिंगपेक्षा उत्तम कुठचाच पर्याय नसतो. वॅक्सिंग केल्याने केवळ नको असलेले केसच काढले जात नाही तर टॅनिंगसारखी समस्याही दूर होते. वॅक्सिंग केल्यानंतर सामान्यपणे दोन आठवडे तरी त्वचा मऊमुलायम राहाते. शिवाय जे केस पुन्हा उगवतात तेही बारीक आणि मऊमुलायम उगवतात. नियमित वॅक्सिंग केल्याने ३-४ आठवडे केस येत नाहीत. हूळहळू केसांची वाढही कमी होत जाते.

एल्प्स ब्यूटी क्लीनिकची डायरेक्टर भारती तनेजा सांगते की वॅक्स अनेक प्रकारचे   असतात :

सॉफ्ट वॅक्स म्हणजे रेग्युलर वॅक्स

हे सर्वात जास्त कॉमन आणि वापरले जाणारे वॅक्स आहे, जे मध किंवा साखरेच्या द्रावणापासून तयार केलं जातं. हेअर रिमूव्ह करण्याबरोबरच हे टॅनिंगही रिमूव्ह करतं आणि सोबतच त्वचेला मऊ आणि गुळगुळीत बनवतं.

चॉकलेट वॅक्स

या वॅक्समुळे त्वचेचे पोर्स मोठे होतात, ज्यामुळे केस सहज उपटले जातात आणि जास्त वेदनाही होत नाही. त्याचबरोबर चॉकलेटच्या आतमध्ये सूदिंग घटक आढळतात जे बॉडीला रिलॅक्स करतात. कोको पावडर बेस्ड या वॅक्समुळे केस पूर्णपणे रिमूव्ह होतात आणि त्वचा मऊ आणि कोमल दिसू लागते. हे वॅक्स केल्याने लाल चट्टे उठण्याची शक्यताही राहात नाही. हे वॅक्स संवेदनशील त्वचेसाठीही चांगली ठरते. त्याचबरोबर चॉकलेटचा अरोमा खूपच आकर्षक असतो जो आपल्याला एका विशिष्ट आनंदाची जाणीव करून देतं.

अॅलोव्हेरा वॅक्स

अलोव्हेराच्या गरापासून तयार केलेलं हे वॅक्स त्वचेला नरीश करण्याबरोबरच रिझविनेटही करतं. हे शरीराचे संवेदनशील भाग जसं की अंडरआर्म्स आणि बिकिनी पार्टसाठी फार चांगलं असतं.

ब्राजीलियन वॅक्स

हादेखील हार्ड वॅक्सचाच एक प्रकार आहे, जे विशेष करून बिकिनी एरियासाठीच बनवलं गेलं आहे. याने सगळीकडे नको असलेले केस जसं की पुढचे, मागचे, आजूबाजूचे आणि मधले रिमूव्ह केले जाऊ शकतात. वॅक्सिंगची वेदना कमी करण्यासाठी हे वॅक्स लवकर लवकर करणं गरजेचं असतं.

लिपोसोल्यूबल वॅक्स

हे वॅक्स ऑइल बेस्ड असतं. केसांच्या मुळांवर तर याची ग्रिप चांगली असतेच, पण त्याचबरोबर हे स्किनवरही डेलिकेट होतं. हे वॅक्स वापरण्यापूर्वी त्वचेवर तेल लावलं जातं आणि केस रिमूव्ह करण्यासाठी लहान लहान स्ट्रिप्स यूज केल्या जातात. हे वॅक्स जास्त गरम झाले तरी त्वचेला काही अपाय होत नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा

स्किन लेझर क्लीनिकचे डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर मुनीस पाल सांगतात की वॅक्सिंग करण्यापूर्वी आणि नंतर काही सावधगिरी बाळगणं फार जरुरी आहे. वॅक्सिंग करतेवेळी त्वचा होरपळू शकते, लाल होऊ शकते, त्वचेवर संसर्ग होऊ शकतो. जिथे वॅक्सिंग केलं आहे तिथे वेदना होणं, त्वचा जळजळणं, त्वचेचा रंग बदलणं, पापुद्रे निघणं, त्वचेचं टेक्स्चर बदलणं, खाज येणं यांसारख्या समस्याही उद्भवतात.

चेहऱ्यावर वॅक्सिंग

चेहऱ्यावर अत्याधिक लव असणं काही स्त्रियांसाठी फार मोठी समस्या असते. काही पार्लर्समध्ये यापासून सुटका मिळवण्यासाठी वॅक्सिंग करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांच्या मते चेहऱ्यावर वॅक्सिंग करणं अपायकारक ठरू शकतं. चेहऱ्याची त्वचा अतिशय मऊ असते, त्यामुळे त्यावर वेळेआधीच सुरकुत्या पडू लागतात. जर केस जाड असतील तर लेझर हेअर रिमूव्हल सर्वश्रेष्ठ पर्याय आहे. तुम्ही ब्लीचिंगचा पर्यायही निवडू शकता. वॅक्सिंगमुळे हेअर फॉलिकल्सला खूप अपाय होतो, ज्यामुळे संक्रमण आणि सूज येऊ शकते. यामुळे डागही पडू शकतात, ज्यावर उपचार करणं कठीण असतं.

वॅक्सिंग करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा :

* वॅक्सिंग करणाऱ्यांचे हात अगदी स्वच्छ असावेत.

* ज्या भागाचं वॅक्सिंग करायचं आहे तो भागही अगदी स्वच्छ असावा.

* वॅक्सिंग एखाद्या चांगल्या पार्लरमध्ये जाऊनच करावं.

* वॅक्स आणि पट्टया चांगल्या ब्रॅण्डच्या असाव्यात.

* वॅक्सिंग करायच्या एक दिवसाआधी त्वचेचं स्क्रबिंग करून घ्या. यामुळे मृतत्वचा निघून जाते, ज्यामुळे हेअर फॉलिकल्स बंद होतात, ज्याच्यामुळे हेअर इनग्रोनची समस्या होऊ शकते.

वॅक्सिंगनंतर

वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा लाल होऊ शकते आणि त्यावर रॅशेज उठू शकतात, जे काही तासांनी आपोआपच निघून जातात. हे हिस्टामिन रिअॅक्शनमुळे होत असतं; कारण वॅक्सिंग केसांना मुळापासून काढून टाकतं. त्यामुळे तो भाग स्वच्छ आणि बॅक्टेरियामुक्त ठेवणं फार गरजेचं असतं.

* वॅक्सिंग केल्यानंतर २४ तास तरी उन्हात जाऊ नका.

* १२ तास सनबाथिंग करू नका.

* २४ तास क्लोरीनयुक्त स्विमिंग पुलामध्ये स्विमिंग करू नका.

* स्पा आणि सोनाबाथही घेऊ नका. कोणतंही सुवासिक क्रीम लावू नका. नाहीतर जळजळ होऊ शकते.

* त्वचेवरील बॅक्टेरियाचा विकास थांबवण्यासाठी टीट्रीयुक्त प्रसाधन लावा.

* जर वॅक्सिंगनंतर त्वचा लाल झाली असेल तर अर्ध्या वाटी मलईविरहित दुधामध्ये अर्धी वाटी थंड पाणी मिसळा. यामध्ये पेपर टॉवेल भिजवा आणि तो त्वचेवर ठेवा, दीड दोन तासांनी ही प्रक्रिया तोवर करा जोपर्यंत तुम्हाला आराम पडत नाही. दुधामध्ये आढळणारं लॅक्टिक अॅसिड त्वचेला आराम देतं.

* इनग्रोन हेअर ग्रोथ थांबवण्यासाठी वॅक्सच्या जागी ताबडतोब बर्फ लावा. त्याने त्वचेची रंध्रं बंद होतील आणि बॅक्टेरियाचा प्रवेश थांबेल. काही वेळाने वॅक्स केलेला भाग सॅलिसिलिक अॅसिडयुक्त क्लींजरने धुऊन घ्या.

* जर वॅक्सिंग केल्यानंतर जळजळ होत असेल तर अॅलोव्हेरायुक्त क्रीम लावा. लक्षात ठेवा, यामध्ये अल्कोहोल नसावं. जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही बर्फाचाही वापर करू शकता.

* वॅक्सिंग केल्यानंतर तुम्ही लगेचच जिमला जाऊ नका. कारण यामुळे गुळगुळीत त्वचेवर बॅक्टेरिया पसरण्याची भीती जास्त असते.

* वॅक्सिंग केल्यानंतर काही तास घट्ट कपडे घालू नका. कारण यामुळे त्वचा घासून जळजळ होऊ शकते.

काळजी घ्या

* कोणत्याही समारंभाला जाण्याच्या अगदी आधी वॅक्सिंग करू नका. कारण तुम्हाला हा अंदाज नसतो की तुमची त्वचा वॅक्सिंग केल्यानंतर काय प्रतिसाद देणार?

* तुम्ही जर वॅक्सिंग करत असाल तर अधूनमधून शेव करू नका. त्याने केस कडक होतात आणि वॅक्सिंग करायला अडचण येते. ज्यांना त्वचेची एखादी समस्या असेल जसं की एक्द्ब्रिमा, कापलेली त्वचा किंवा जखम, त्यांनी वॅक्सिंगपासून लांबच राहावं.

* जर वॅक्सिंग केल्यानंतर २४ तासांपर्यंत त्वचेमध्ये जळजळ किंवा वेदना होत असेल तर ताबडतोब त्वचारोग तज्ज्ञांना दाखवा.

लेर तंत्रज्ञान

डॉक्टर मुनीस पाल सांगतात की तुम्हाला जर आपला चेहरा किंवा शरीरावरील नको असलेल्या केसांपासून सुटका हवी असेल तर वॅक्सिंग किंवा लेझरचा पर्याय निवडा. कारण यामध्ये त्वचा शेविंगच्या तुलनेत जास्त काळ मऊ राहाते.

लेझर नंतरही काही स्त्रियांमध्ये पुन्हा केसांची वाढ होते. पण प्रत्येकामध्ये केसांच्या विकासाचा कालावधी हा वेगवेगळा असतो. लेझर ट्रीटमेंटनंतर जे केस येतात ते पातळ, मऊ आणि फिकट रंगाचे असतात. म्हणूनच लेझर ट्रीटमेण्ट नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवण्याचा सर्वात चांगला पर्याय समजला जातो. लेझर उपचाराच्या किती सिटिंग्ज घ्याव्या लागतील आणि त्यावर किती खर्च येईल हे शरीराच्या कोणत्या भागावरील त्वचेचे केस काढायचे आहेत आणि तिथे केसांची किती वाढ आहे त्यावर अवलंबून असतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें