ब्रायडल ज्वेलरी काय आहे खास

* पूजा भारद्वाज 

लग्नाच्या शॉपिंग लिस्टमध्ये लेहंग्यानंतर दुसरा नंबर ब्रायडल ज्वेलरीचाच असतो आणि जेव्हा इंडियन ब्रायडल लुकची गोष्ट येते, तेव्हा त्यात ज्वेलरीची वेगळीच शान असते. तसेही मार्केट दागिन्यांनी भरलेले आहे, परंतु योग्य ज्वेलरीनेच परफेक्ट ब्रायडल लुक मिळतो. त्यामुळे दागिन्यांची खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्यापूर्वी आणि शोरूमच्या फेऱ्या मारण्यापूर्वी दागिन्यांच्या वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्नबाबत जरूर जाणून घ्या.

रवि कपूर ब्रायडल ज्वेलरी रेंटवर देतात. त्यांचं म्हणणं आहे की आजकाल बाजारात कुंदन, पोल्की व रिवर्स अॅडी खूपच ट्रेंडमध्ये आहे. दुसरीकडे काही वधूंना राणीहार घ्यायलाही आवडतो. पण आपण ज्याची निवड कराल, ती खूप विचारपूर्वक करा. जेणेकरून आपल्याला परफेक्ट ब्रायडल लुक मिळेल.

जी.जे. इंटरनॅशनलचे अभिज्ञान वर्मा सांगतात, ‘‘आजकालच्या वधू सब्यसाची व हजूरीलाल ज्वेलरीची कॉपी मागतात. त्याचबरोबर, त्यांना पद्मावत व महाराणी कलेक्शन पाहायलाही आवडतं. लग्नाबरोबरच साखरपुडा, मेंदी व कॉकटेल पार्टीसाठी इंग्लिश ज्वेलरीलाही खूप मागणी आहे. त्यात डायमंड लुकचा फ्लोरल सेट व व्हाइट डायमंड फॅशनमध्ये आहे. याबरोबरच आपण पेस्टल कलरचा लेहंगा घालणार असाल, तर मिंट कलर मीनाकारी किंवा पिंक कलर मीनाकारीची ज्वेलरी आपल्यावर खुलून दिसेल.’’

ज्वेलरी फॅशनच्या या बदलत्या ट्रेंड्सवरही नजर ठेवा :

राणीहार

जर आपल्याला आपल्या लग्नात ट्रेडिशनल लुक हवा असेल, तर राणीहार आपल्यासाठी एक योग्य पर्याय आहे. हा एक हार आपल्या लुकला रॉयल आणि एलिगंट बनवतो. अर्थात, याच्या नावावरूनच कळून येतं की राणीहार. हा खूप मोठा व भव्य असतो. यात मोत्यांच्या माळांमध्ये सोन्याच्या तुकड्यांची डिझाइन बनवलेली असते. हा हार घालून आपण स्टनिंग दिसू शकता.

चोकर्स

हा ज्वेलरी ट्रेंड यावर्षीही खूप प्रचलित आहे. ट्रेडिशनल ड्रेस असो किंवा वेस्टर्न दोन्हीसोबत हा खूप शोभून दिसतो. बहुतेक वधू आजकाल चोकरला प्राधान्य देत आहेत, कारण हा खूप हलका आणि दिसायला स्टाइलिश दिसतो. खरे पाहिलं तर चोकर कंफर्ट आणि स्टाइलचा अद्भुत मेळ आहे. हा कुंदन, पोल्की व गोल्ड प्रत्येक व्हरायटीमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

कुंदन सेट

कुंदन कोणत्याही प्रसंगी उत्तम आहे आणि हा एक असा ज्वेलरी ट्रेंड आहे, जो कधी फॅशनमधून बाहेर जात नाही. आजही या ज्वेलरीची क्रेझ कमी झालेली नाही. ब्राइडचा लुक ज्वेलरीशिवाय अपूर्ण आहे आणि कुंदन ज्वेलरी या लुकला पूर्ण करते. नुकतेच अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्यात कुंदन ज्वेलरीचा बोलबाला पाहायला मिळाला.

लेयरिंग नेकलेस

वेडिंग ज्वेलरीमध्ये लेयरिंग नेकलेसबाबत बोलायचं, तर हा आजकाल ट्रेंडमध्ये आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नाच्या लाल पेहरावात लेयरिंग नेकलेस घालून खूप सुंदर दिसत होती. तसेच आपण ईशा अंबानीला लेयरिंग नेकलेसमध्ये पाहिलं असेल, तर तिच्यावरही तो खूप खुलून दिसत होता. ही ज्वेलरी नक्कीच आपल्याला एकदम हटके लुक देईल.

पोल्की

पोल्की ब्रायडल ज्वेलरीही खूप ट्रेंडमध्ये आहे. मुलींना ती आपल्या लग्नात घालायला खूप आवडते. पोल्की ज्वेलरीवर केलेली मीनाकारी याच्या सुंदरतेला आणखी खुलवतात आणि जेव्हा आपण ही घालून येता, तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावर खिळल्याशिवाय राहत नाहीत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें