पावसाळी मोसमात फिरून या हे ‘नॅशनल पार्क’

* प्रतिनिधी

पावसाळ्याच्या दिवसांत हिरवा शालू पांघरलेल्या डोंगरदऱ्यांतून फिरणे खूप आनंददायी असते आणि हे ठिकाण राष्ट्रीय उद्यान असेल, तर मजा अजूनच वाढते. मग वाट कसली पाहताय, या पावसाळी मोसमात फिरून या भारतातील प्रसिध्द नॅशनल पार्कमध्ये.

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय पार्क आहे. हे १९३६ मध्ये एनडेंजर्स बंगाल टायगरच्या रक्षणासाठी हॅली नॅशनल पार्कच्या रूपात स्थापन करण्यात आले होते. हे उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात आहे आणि याचे नाव कॉर्बेटच्या नावावर ठेवले होते, ज्यांनी याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. वाघ वाचवा मोहिमेसाठी पुढाकार घेणारे हे पहिले पार्क होते.

पेरियार नॅशनल पार्क

‘पेरियार नॅशनल पार्क’ ही भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य केरळातील इडुक्की आणि पथनामथिट्टा जिल्ह्यात एक रिझर्व्ह एरिया आहे. हा हत्ती आणि वाघांसाठी रिझर्व्ह म्हणून ओळखला जातो. ९२५ किलोमीटरमध्ये वसलेल्या या अभयारण्याला १९८२ मध्ये पेरियार नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आले होते.

ताडोबा नॅशनल पार्क

महाराष्ट्रातील ताडोबा अंधेरी टायगर रिझर्व्ह सर्वात जुने आणि सर्वात मोठे नॅशनल पार्क आहे. हे स्थान बंगाल टायगरसाठीही फेमस आहे. इथे जवळपास ४३ बंगाल टायगर आहेत. भारतात सर्वात जास्त टायगर याच पार्कमध्ये आहेत.

हेमिस नॅशनल पार्क

‘हेमिस राष्ट्रीय उद्यान’ भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्व लडाख क्षेत्रात सर्वात जास्त उंचावर असलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हेमिस भारतात सर्वात मोठे अधिसूचित संरक्षित क्षेत्र आणि नंदा देवी बायोस्फेयर रिझर्व्ह आणि आजूबाजूच्या संरक्षित क्षेत्रांनंतरचे दुसरे सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. हे नॅशनल पार्क अनेक दुर्मीळ सस्तन प्राण्यांच्या प्रजातींबरोबरच हिमचित्त्यांसाठीही ओळखले जाते.

नागरहोल नॅशनल पार्क

कर्नाटकात असलेले नागरहोल आपल्या वन्यजीव अभयारण्यासाठी संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. हे त्या काही ठिकाणांपैकी एक आहे, जिथे आशियाई हत्ती आढळतात. मान्सूनपूर्व पावसात इथे मोठ्या संख्येने रंगीबेरंगी पक्षीही आढळून येतात. वाइल्ड लाइफ आणि अॅनिमल लव्हर्सना इथे पाहण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी खूप काही आहे.

सरिस्का नॅशनल पार्क

‘सरिस्का वाघ अभयारण्य’ भारतातील सर्वात प्रसिध्द नॅशनलपार्कपैकी एक आहे. हे राजस्थानातील अलवर जिल्ह्यामध्ये आहे. १९५५ मध्ये याला ‘वन्यजीव आरक्षित भूमी’ म्हणून घोषित करण्यात आले होते. १९७८ मध्ये वाघ वाचवा परियोजनेनुसार याला नॅशनल रिझर्व्हचा दर्जा देण्यात आला. सरिस्कामध्ये वाघ, चित्ते, बिबटे, रानमांजर, कॅरकल, पट्टेवाला उद, कोल्हा स्वर्ण, चितळ, सांबर, नीलगाय, काळवीट, चौसिंगा मृग त्याला ‘छाउसिंगा’ही म्हणतात. रानटी डुक्कर, ससा, माकड आणि पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक प्रजातींबरोबरच भरपूर वन्यजीव पाहायला मिळते.

रणथंभोर नॅशनल पार्क

‘रणथंभोर नॅशनल पार्क’ उत्तर भारतातील मोठ्या नॅशनल पार्क्सपैकी एक आहे. हे जयपूरपासून १३० किलोमीटर, दक्षिण आणि कोटापासून ११० किलोमीटर उत्तर-पूर्वेकडे राजस्थानमधील दक्षिणी जिल्हा सवाई माधोपूरमध्ये वसलेले आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें