नमाशी चक्रवर्ती ठरतोय चर्चेचा विषय !

* सोमा घोष

अभिनेता नमाशी चक्रवर्ती 28 एप्रिल 2023 रोजी ” बॅड बॉय ” या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. कमालीची गाणी, अप्रतिम अॅक्शन सीक्वेन्स, उत्साहवर्धक ट्रेलर आणि उत्तम स्टारकास्ट या सगळ्या गोष्टीमुळे सगळ्यांचा उत्साह वाढला आहे. आलम ना पुछो, जानाबे अली आणि तेरा हुआ ही गाणी सुपर ट्रेंडी, आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये टॉपला आहेत. चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुकतेने वाट बघतात. नमाशी आणि अमरीन यांनी नुकतंच जुहू येथे चाहत्यांसोबत एक खास गोष्ट केली !

एका चाहत्याने शेअर केले, “नमाशीने आपल्या आकर्षक अभिव्यक्ती आणि आकर्षक नृत्याने प्रेक्षकांना मनावर अधिराज्य गाजवले आहे.

नमाशीच्या चाहत्यांना तो किती देखणा दिसतो आणि नृत्यातून व्यक्त होण्याची पद्धत पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

एका चाहता सांगतो ” मिथुन आणि नमाशी यांना एकत्र पाहून खूप आनंद झाला.”

आणखी एका चाहत्याने शेअर केले, “नमाशी एक प्रतिभावान स्टार आहे.”

एका चाहत्याने असेही शेअर केले की, “मिथुन चक्रवर्तीचा मुलगा नमाशी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे आणि त्याच्या चाहत्यांना ते खूप आवडलं आहे”

नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन अभिनीत ” बॅड बॉय ” 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें