जशी त्वचा टोन, तशी नेल पेंट

* पारुल भटनागर

जेव्हा पण आपण नेलपॉलिश निवडतो तेव्हा अनेक रंग आपल्याला आकर्षित करतात. ते आपल्याला आवडतात, जे आपण विचार न करता खरेदी करतो कारण ते आपल्याला आवडण्याबरोबरच ट्रेंडमध्ये असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की नखांवर स्किन टोननुसार नेल पेंट न लावल्यास हात आणि नखांचे सौंदर्य तसे दिसून येत नाही, जसे तुम्हाला हवे असते.

अशा परिस्थितीत तुमच्या स्किन टोननुसार नेल पेंट कसा निवडायचा ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या संदर्भात कॉस्मेटोलॉजिस्ट भारती तनेजा सांगत आहेत :

गडद त्वचा टोन

डस्की स्किन टोन हा एक अतिशय आकर्षक टोन मानला जातो कारण या स्किन टोनवर सर्वकाही सूट होते आणि ते खूप आकर्षकदेखील वाटते. अशा परिस्थितीत, जर तुमचा गोंधळ उडत असेल तर तुम्हाला सांगतो की गडद शेड्स, गुलाबी, केशरी, गाजर, गडद तपकिरी किंवा मग याशी मिळतेजुळते शेड्स तुमच्या त्वचेच्या टोनवर चांगले दिसतील.

कोणते रंग टाळावेत : या स्किन टोनवर सर्व रंग चांगले दिसतात, त्यामुळे कोणताही रंग टाळण्याची गरज नाही.

फेयर स्किन टोन

तुमची त्वचा खूप गोरी आहे आणि तुमच्यावर तर सर्व काही छान दिसेल असा जर तुम्ही विचार करत असाल तर कदाचित ही तुमची चूक आहे कारण काही न्यूड शेड्स तुमच्या नखांवर अजिबात छान दिसणार नाहीत. तुमच्या त्वचेच्या टोनवर गुलाबी, हलका जांभळा, मध्यम आणि गडद लाल, निळयाचे सर्व शेड्स, गुलाबी रंगाचे शेड्स खूप छान दिसतील.

कोणते रंग टाळावेत : काळा, गडद हिरवा, केशरी रंग यासारखे गडद शेड्स तुमच्या नखांना खूप जास्त चमकदार बनविण्याबरोबरच नखांचे सौंदर्य ही नाहीसे करण्याचे काम करतील. त्यामुळे त्यांना टाळा.

गडद त्वचा टोन

जेव्हा आपली त्वचा गडद असते, तेव्हा आपल्याला वाटते की आपली त्वचा तर आधीच गडद आहे, त्यामुळे गडद रंग आपल्याला शोभणार नाहीत. म्हणूनच आपण फक्त हलके रंग निवडले पाहिजेत.

पण प्रत्यक्षात ते आपल्या विचाराच्या अगदी विरुद्ध आहे कारण आपली त्वचा जर गडद असेल तर तुम्हाला गडद हिरवा, बरगंडी, गडद लाल इत्यादी रिच किंवा गडद शेड्स अधिक चांगले दिसतील. आपण चमकदार केशरी आणि चमकदार गुलाबी रंगदेखील अवश्य वापरून पहा.

कोणते रंग टाळावेत : तपकिरी रंगाचे नेलपेंट लावू नका कारण त्यामुळे तुमची नखे फिके दिसतील. सिल्व्हर, व्हाईट, निऑन शेड्स यांसारख्या उन्हाळयातील ट्रेंडी पेस्टल रंग तुम्ही पूर्णपणे टाळावेत.

पेल स्किन टोन

जेव्हा आपण गोऱ्या त्वचेबद्दल बोलतो तेव्हा आपण गोरे तर असतो, परंतु आपल्या त्वचेत थोडासा पिवळसरपणाही असतो आणि या प्रकारच्या त्वचेच्या टोनला पेल स्किन टोन म्हणतात. या त्वचेच्या टोनसाठी नेल पेंट थोडेसे पाहून निवडणे आवश्यक असते. अशा टोन असलेल्यांनी पेस्टल शेड्स, लाइट शेड्स, लाल, जांभळा इत्यादी हलक्या शेड्स लावाव्यात.

कोणते रंग टाळावेत : काळा, मरून असे फारसे गडद शेड्स अजिबात लावू नका. हातावर थोडासा पिवळसरपणा असल्याने पिवळा सोनेरी शेड्सदेखील टाळा.

बँडेड नेल पेंटच सर्वोत्तम

तुम्हाला आज बाजारात विविध रंग आणि प्रकारांमध्ये स्थानिक नेल पेंट्स मिळतील, जे तुमच्या बजेटमध्ये असल्याने तुम्ही एकावेळी अनेक शेड्स खरेदी करता, जे भले दिसायला चांगले वाटतील पण तुम्हाला माहिती आहे का की त्यात असे घटक असतात, जे हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात तसेच मधुमेहास कारणीभूत ठरतात, म्हणून जेव्हाही तुम्ही नेल पेंट खरेदी कराल तेव्हा याची खात्री करा की ते ब्रँडेड असण्याबरोबरच अधिकाधिक नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असतील, रसायनांचा वापर कमीत कमी झाला असेल आणि तसेच नखांना मॉइश्चरायझ करणारी गुणधर्मदेखील असावेत.

कसं रोखाल नेल पीलिंग

* अरुण भटनाग

चेहऱ्यावर पिंपल्स असो वा केसांमध्ये स्पीलिट एन्ड्स नाखुशीने यांना सामोरं जावच लागतं. हे आपलं सौंदर्य कमी करण्याचं काम करतात. अशा वेळी जेव्हा पीलिंग नेल्सची समस्या असेल तर ते आपल्या नेल्सच्या सौंदर्यात बाधा आणण्याचं काम करत असल्यामुळे आपल्यासाठी हे खूपच त्रासदायक होतं. अशा परिस्थितीत फक्त आपण हाच विचार करतो की या समस्येपासून कसं समाधान मिळेल, परंतु आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे, आम्ही काही अशा उत्पादनांबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

काय आहे नेल पिलिंगची समस्या

बदलत्या वातावरणाचा परिणाम त्वचेप्रमाणे आपल्या नखांवरदेखील होतो, ज्यामुळे आपल्या नखांच्या आजूबाजूची त्वचा सोलली जाते. अनेकदा रक्त निघाल्यामुळेदेखील खूप त्रास होतो, त्यामुळे सूजदेखील येते. सोबतच अनेकदा जीवनसत्व व लोह यांची कमतरतादेखील यासाठी जबाबदार असते. म्हणून आपण आपल्या आरोग्यप्रमाणेच क्युटिकल्सची काळजी करणेदेखील गरजेचे आहे. कारण ही आपली नखे सुरक्षा प्रदान करण्याचे काम करतात. अशावेळी आपल्याला या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खाण्यापिण्यात आरोग्यदायक पदार्थांचा समावेश करण्याबरोबरच काही सौंदर्य उत्पादनंदेखील वापरण्याची गरज आहे, त्यामुळे आपण या समस्येपासून लवकरात लवकर सुटका मिळवू शकतो.

नेल पीलिंग या कारणांमुळे होतं :

* त्वचा कोरडी होऊन त्यातील मॉइश्चर कमी होणं.

* हार्श साबणाचा वापर करणे.

* सॅनिटायझरचा अधिक वापर करणं.

* थंडीचा प्रभाव

* शरीरात पौष्टिक तत्त्वांची कमी इत्यादी.

कशी मिळवाल सुटका

सुपरफूड बेस कोड

जसं नाव तसंच काम, खरंतर जेव्हादेखील आपल्या क्युटीकल्सचं नुकसान होतं तेव्हा आपण अशा वेळेस बेस कोडच्या वापर करायला हवा. ज्यामध्ये अँटीऑक्सिडन्ट्स रिच बोटॅनिकल तत्त्व असतील कारण हे त्वचेला डिटॉक्स करण्याबरोबरच त्यांना एक्सफॉलिएट करण्याचं कामदेखील करतात. नखांच्या त्वचेवरचा रेडनेस कमी करण्याबरोबरच त्यांना हायड्रेटदेखील ठेवतात. सोबतच यामध्ये कॅराटीन असल्यामुळे नेल्सदेखील मजबूत करण्याबरोबरच त्यांना नरिश करण्याचं कामदेखील करतात, ज्यामुळे क्युटिकल्स सहजपणे बरे होतात.

फाउंडेशन बेस कोड

जर तुमच्या नखांच्या आजूबाजूची त्वचा निघालेली असेल आणि तुम्हाला होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळवायची असेल तर अशी नरिशिंग क्युटिकल रिपेअर क्रिम विकत घ्या ज्यामध्ये शी बटर आणि सोडियम ह्यालुरोनिक असेल जे त्वचेला हायड्रेशन देण्याचं काम करतात, सोबतच यामध्ये विटामिन ए, सी आणि ई देखील असेल, जे नखांना ताकद देण्याबरोबरच त्यांना पिवळं होण्यापासूनदेखील वाचवतात.

जेल बेस्ड क्युटिकल क्रिम

क्युटीकलचं कारण एकतर शरीरात न्यूट्रिशनची उणीव वा मग त्वचेत मॉइश्चरच्या कमीमुळे मानलं जातं, अशावेळी जेल बेस्ड क्युटिकल क्रीममध्ये जर सॅलिसीलिक अॅसिड असेल तर तुमच्या समस्येचे समाधान होईल, कारण हे एक्सफॉलिएटरचं काम करतं जे क्युटिकल्सने मृत त्वचा काढण्यात मदतनीस ठरतं. सोबतच हे क्रिमपेक्षा खूप लाइट असतं, ज्यामुळे तुम्हाला लावल्यानंतर जाणीवदेखील होत नाही की तुम्ही नखांवर काही लावलं देखील आहे.

मल्टीपर्पज बाम

जर तुम्हाला यावर फार खर्च करायचा नसेल, परंतु तुम्हाला क्युटिकलपासून देखील सुटका मिळवायची असेल तर तुम्ही एकच उत्पादन खरेदी करून वेगवेगळया प्रकारे वापरू शकता, ज्यामुळे तुमची समस्यादेखील कमी होईल आणि तुमचं सौंदर्यदेखील वाढेल. जे आहे मल्टीपर्पज बाम ज्यामध्ये शी बटर आणि नैसर्गिक तेलं एकत्रित असतात, जे तुम्ही क्युटिकलवर लावून त्यांना हायड्रेड ठेवून बरे करू शकता. ओठांवर लावून त्यांना शायनी बनवू शकता वा चिरलेल्या टाचानवरदेखील लावून आराम मिळवू शकता.

बटर क्युटिकल क्रीम

जेव्हा त्वचा कोरडी होते तेव्हा त्याला मॉईश्चरची गरज असते, जे बटर क्युटिकल क्रीमने मिळू शकते, कारण यामध्ये कोको सीड बटर, बदाम तेल आणि बिन्स वॅक्स असल्यामुळे हे पूर्ण दिवस हायड्रेशनच काम करतं. सोबतच यामध्ये विटामिन ई देखील असेल तर हे नखांनादेखील पिवळं होण्यापासून वाचवतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें