मान्सून स्पेशल : साजश्रृंगार पावसाळ्यातील

* प्रतिनिधी

पावसाळयाच्या दिवसांत जास्त मेकअप करणे जोखमीचे असते. कारण या दिवसांत मेकअप खराब होण्याची भीती असते. म्हणूनच पावसाळयाच्या दिवसांत हलका आणि वॉटरप्रूफ मेकअप केला पाहिजे. चेहऱ्यावर वॉटरप्रूफ फाउंडेशन, न दिसणारी लिपस्टिक आणि वॉटरप्रूफ आयलायनर इ. चा वापर केला पाहिजे. असे प्रॉडक्टच पावसाळयाच्या दिवसांत आवश्यक असतात. इथे आम्ही काही मेकअप टिप्स सांगत आहोत, ज्या पावसाळयाच्या दिवसांत मेकअप करताना आपल्याला उपयोगी ठरू शकतील.

चेहऱ्यावरील ऑइल स्वच्छ करा

सर्वप्रथम आपला चेहरा पाण्याने चांगल्याप्रकारे धुवा आणि ५-१० मिनिटे चेहऱ्याला आइस क्युब लावा. त्यामुळे चेहऱ्याचे तेल निघून जाईल आणि मेकअप दीर्घकाळ टिकेल.

ऑयली आणि ड्राय त्वचेसाठी

ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी बर्फाने मालीश केल्यानंतर टोनरचा वापर करून पाहा. त्यामुळे त्वचेत ओलावा येईल. शिवाय ज्यांची त्वचा ऑयली आहे, त्या अॅस्ट्रिजंटचा वापर करू शकतात.

बेस तयार करा

मेकअपचा बेस तयार करण्यासाठी फाउंडेशनचा वापर करू नका.

डोळयांसाठी

डोळयांना हलकासा आयलायनर लावा, त्यावर हलका ब्राउन, पिंक किंवा पेस्टल रंगाच्या आयशॅडोचा वापर करा. त्यानंतर वॉटरप्रूफ मस्कारा लावा.

ओठांसाठी

ओठांवर सॉफ्ट मॅटी लिपस्टिक लावा. अशाप्रकारची लिपस्टिकच पावसाळी मोसमात उत्तम ठरते. मात्र ओठांवर शाइन आणण्यासाठी तुम्ही पिंक ग्लॉसचा वापरही करू शकता.

वॉटरप्रूफ मॉइश्चरायजर लावा

पावसाळयाच्या दिवसांत वॉटरप्रूफ मॉइश्चरायजर लावणे टाळू नका. जर आपली त्वचा ऑयली असेल, तर हलका मेकअपच करा.

आपली हेअरस्टाईल सहजसोपी असावी

जर पावसाळयाच्या दिवसांत जास्त स्टायलिश हेअरस्टाईल ठेवाल, तर केस भिजल्यानंतर ते सोडविणे मुश्कील होऊ शकते किंवा केस तुटण्याची सर्वात जास्त भीती असते. पावसाळयात बँड किंवा लेअर हेअर स्टाईलला प्राधान्य द्या.

चमकदार ज्वेलरी टाळा

पावसाळयाच्या दिवसांत चमकदार ज्वेलरी शक्यतो टाळा. स्टोन ज्वेलरीचा जास्त वापर करा. हलके दागिने पावसाळयात आरामदायक असतात.

लाइट मेकअप करा

आपणाला जर सर्वांत उठून दिसायचे असेल, तर लाइट मेकअप आणि लाइट शेड्सचा वापर करा. उदा. पिंक, ब्राउन किंवा पिच रंगांचा.

आयब्रो पेन्सिलचा वापर टाळा

पावसाळयाच्या दिवसांत आपले आयब्रो नेहमी सेट ठेवा आणि आयब्रो पोन्सिलचा वापर चुकूनही करू नका. या दिवसांत पेन्सिलचा रंग ओघळण्याची शक्यता असते.

केस रोज धुवा

या दिवसांत आपले केस नियमितपणे धुवा, तसेच कोंडयापासून संरक्षणासाठी नियमितपणे मालीशही करा. केसांची देखभाल करा. पावसाळयाच्या दिवसांत केसांना एक्स्ट्रा केअरची आवश्यकता असते.

कॉटनचे कपडे वापरा

पावसाळयाच्या दिवसांत जीन्सचा वापर करू नका. हलके कॉटनचे कपडे वापरा. उदा. कॅप्री, कॉटन पँट किंवा थ्री फोर्थ इ.

सफेद कपडे टाळा

या दिवसांत सफेद कपडे वापरणे टाळा. कारण सफेद कपडे लवकर खराब होतात. म्हणून डार्क रंगाचे कपडे वापरा.

सँडल किंवा चप्पल वापरा

या दिवसांत लेदरचे शूज व सँडल वापरणे टाळा. हलके आणि मजबूत सँडल व चप्पल वापरा. शक्य असेल, तर स्नीकर्सच वापरा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें