शेफ स्टाईल स्वीट्स

* पाककृती सहकार्य : सेलिब्रिटी शेफ रणवीर बरार

मोदक

सारणाचे साहित्य

*  थोडेसे पाणी

* १ कप किसलेला गूळ

* २ कप किसलेले खोबरे

* थोडीशी वेलची पावडर

* २ मोठे चमचे तूप

* थोडेसे बारीक कापलेले काजू.

पिठाचे साहित्य

* १ कप पाणी

* १ छोटा चमचा तूप

* १ कप तांदळाचे पीठ

* चवीनुसार मीठ.

कृती

एका पॅनमध्ये पाणी आणि गूळ टाकून मिडियम आंचेवर शिजवा. मग यात खोबरं टाकून १० मिनिटे चांगल्याप्रकारे ढवळा. मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स झाले की त्यात तूप, वेलची पावडर आणि काजू घालून चांगल्याप्रकारे ढवळा व आंचेवरून उतरून एका बाजूला ठेवा. पीठ तयार करण्यासाठी १ कप पाणी गरम करून त्यात तूप व मीठ टाका. पाणी जेव्हा चांगल्याप्रकारे उकळू लागेल, तेव्हा त्यात तांदळाचे पीठ टाकून चांगल्याप्रकारे ढवळत राहा, म्हणजे गठ्ठे बनणार नाही. मग ते झाकून १ मिनीट वाफवा आणि गॅस बंद करा. आता हे मिश्रण गरमागरमच चांगल्याप्रकारे मिक्स करत १० समान गोळे बनवून पुरीच्या आकारात लाटा. लाटल्यानंतर खोबऱ्याचे सारण भरून त्याच्या पाऱ्या बनवून बंद करा. मग स्टीमर प्लेटवर केळीचे पान ठेवून१०-१५ मिनिटे उकडून गरमागरम सर्व्ह करा.

 

स्टफ्ड मावा लाडू

साहित्य

* १ कप खवा किंवा मावा

* अर्धा कप पिठी साखर

* अर्धा मोठा चमचा तूप

* पाव कप मिक्स ड्रायफ्रूट्स

* ४ मोठे चमचे किसलेले खोबरे

* थोडेसे पिस्ते.

कृती

एका नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून मावा घालून २ मिनिटे परता. मग त्यात साखर मिसळून गॅसवरून उतरून थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर हाताला तूप लावून या मिश्रणाचे स्मूद बॉल्स बनवा. ते सपाट करून मध्ये खड्डा करून ड्रायफ्रूट्स भरून ते कडेने बंद करून पुन्हा स्मूद बॉल्स बनवा. मग पिस्ते आणि खोबऱ्यात लपेटून थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवा आणि मग सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें